एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

CIBIL SCORE विषयी थोडेसे

सिबील स्कोर काय प्रकरण आहे 
बघा मुळात माणसांच्या दोन प्रकारच्या सवयी असतात .
1) पै पै गोळा करून ठेवतील ( Depositing Habit) 
2) दुसऱ्या कडून घेतलेली पै न पै परत करतील ( Repayment Habit) 

या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही .

पूर्वी लोक काय करायचे कि पन्नास बँकातून लोन काढायचे , एका बँकेला दुसऱ्या बँकेचा पत्ता नसायचा .
जे काही डॉक्युमेंट आवश्यक असायचे ते म्हणजे नो ड्युज सर्टीफिकेट .

आत्ता हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून 
या कंपनीची स्थापना झाली Aug 2000 मध्ये .

*Credit Information Bureau Ltd.*
 या कंपनीची  स्थापना झाली.

आज या कंपनीचे नाव *TransUnion CIBIL Ltd* असे आहे.

ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे.

आणि यावर *RBI* ची मॉनीटरींग आहे.

समजा आपण बँकेत गेलो , आणि कर्जासाठी अर्ज दिला.
तर बँक म्हणते दोन,तीन दिवसांनी या ! 
आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ? 
तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा *CIBIL* रिपोर्ट मागावते.
आणि त्याची पेमेंट हिस्टरी, तसेच त्याचा *CIBIL* स्कोर चेक करते ? 

जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर , नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे हे़. 

CIBIL स्कोर हा 
300- - - -- - - ते -- -- -- --900 
मध्ये मोजला जातो.

जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळेल.

पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा ! 
कर्ज मिळतच नाही.

म्हणजे समजलं ! 
कि बँका कर्ज  देणे का नाकारतात ? 
तर CIBIL Score नीट नसतो.

*CIBIL Score कमी का होतो ?*

1) कर्जाचा EMl वेळेवर न भरणे.
2) कर्जाची परतफेडच न करणे.
3) चेक बाऊन्स होणे 
4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे 
5) स्वतःवर असणारे कर्ज *NPA* मध्ये जाऊ देणे 
6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे.

यामुळे *CIBIL score* वर वाईट परिणाम होतात.

बघा , मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी, शेवटी आतून त्या एकच असतात, त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते.

याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण  बँकांना मूर्ख बनवू शकत नाही

बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे , पण लोन अमाऊंट  योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते.

तर मग कसं काय करावं कि ज्यामुळे CIBIL Score सुधारेल ?

1) *EMI* वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नका.

2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट ) 

3) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan कसंही लोन असू दया , त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत , ही शिस्त सांभाळा.

4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या.

5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही.

6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा.

CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे  म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन  सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते.

या मध्ये 
NA - No Activity.
NH - No History. 

असे पर्याय दिसू शकतात .

तर काय करा कि , एखादं छोटं पर्सनल लोन घेऊन वेळेवर परतावे भरा  , अशा प्रकारे  CIBIL मध्ये आपली History तयार होईल.

बँकींग सिस्टीम कशी काम करते ? याबाबत आपल्या मराठी पोरांमध्ये बऱ्यापैकी जागृती नाही , आपण बँकांना , त्यांच्या मॅनेजर्सला कर्ज का  देत नाहीस ? म्हणून धारेवर धरतो .
बँकेसमोर बँड वाजवतो , आंदोलनं करतो , धरणे देतो.

पण राजे हो , कर्ज मिळण्या पाठीमागे 
एवढा सगळा पसारा असतो.
इथे सबकुछ CIBIL असतं .
त्याच्या  बाहेर जाऊन कोणतीही बँक कर्ज देणार नाही.

म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज , 
बुडवू तर नकाच , परंतु वेळेत फेडा ! 

नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी रहाणार नाही.

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे

#घे_भरारी... 

........ एका यशोगाथेची कथा. 

....... 

नाव कल्पना सरोज. रा: रोपरखेडा ता: मूर्तिजापूर. जिल्हा: अकोला. 
वडील पोलीस कॉन्स्टेबल. महिना तीनशे रुपये पगार. त्यात तीन बहिणी, दोन भाऊ, आई, आजी आजोबा, काका काकी एवढा परिवार. 
एका सडकेचं गाव. गावात वीज नाही. शाळेतून येताना शेण वेचत यायचं, घरी आल्यावर गोवऱ्या थापायच्या. सुट्टी दिवशी सरपण गोळा करायचं, शेतमजूरीच्या कामावर जायचं. दलित म्हणून शाळेतही उपेक्षित. कशीबशी सातवीपर्यंत शिकली. बाराव्या वर्षी लग्नाचं स्थळ आलं. समाजाच्या दबावापोटी वडिलांना लग्न लावून द्यावं लागलं. दुप्पट वयाचा नवरा. मुंबईचं सासर.

सासरी छळ होवू लागला. तरीही त्रास सहन करत ही तशीच राहत होती. एकदा वडील भेटायला आले. पोरीची पार दशा दशा झाली होती. वडिलांना रहावलं नाही. त्यांनी तिला घरी आणलं.

 "नवरा सोडून घरी राहतेय, ही रीत नाही." 
समाज नावं ठेवू लागला.

 इथंही उपेक्षा सुरू झाली. मुलीने पुढे शिकावे अशी वडिलांची इच्छा पण लोकांनी टोमणे मारून तिला बेजार केलं. सगळं असह्य झालं. घरात ढेकूण मारण्याच्या तीन बाटल्या शिल्लक होत्या. आजीची नजर चुकवून तिने तीनही बाटल्या पिवून टाकल्या. आजी चहा घेऊन दारात आली तर हिच्या तोंडाला फेस आलेला. धावपळ केली, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पोरीचा जीव वाचला.

"जगू पाहतेय तर माणसं जगू देत नाहीत अन मरु पाहतेय तर मरुही देत नाहीत." 

मुंबईला एक काका होता. ही त्याच्याकडे आली. शिलाई मशीनचं जुजबी काम शिकलेली. काकाने एका गारमेंट फॅक्टरीमध्ये हिला कामाला लावलं. पण मशीनवर शिलाईकाम येईना म्हणून मग हिला धागे कापायचे काम दिले. पगार होता दिवसाला दोन रुपये. थोडसं बरं चाललं होतं तर वडिलांची नोकरी गेली. सगळे मुंबईला आले. स्वतःची शिलाई मशिन घेवून घरी ही सोळा सोळा तास काम करू लागली. अशातच बहिणीला कॅन्सर झाला होता, तिचा औषधाअभावी मृत्यू झाला.

" पैसा असेल तरच माणूस जगवता येईल" 
हे अटळ सत्य आ वासून समोर होते.

स्वतःचा बिझनेस हवा, तरच पैसा कमावता येईल. एक माणूस होता. तो लोकांना सरकारी योजनेतून कर्ज मिळवून द्यायचा. हिने त्याच्याकडे अनेक खेटे घातले. 
पण "
पन्नास हजार कर्ज हवे असेल तर दहा हजार वाटावे लागतील, "
त्याने मार्ग दाखवला. तिने नकार दिला. शासकीय योजना समजून घेतल्या. स्वतःच्या हिमतीवर महात्मा फुले योजनेतून तिने पन्नास हजार कर्ज मिळवले. स्वतःचे बुटीक टाकले, छोटंसं फर्निचरचं दुकानही टाकलं.

आपल्यासारखे अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनाही मार्ग दाखवायला हवा, या विचाराने तिने सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना काढली. शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू झालं. जनमानसात एक ओळख निर्माण झाली. फर्निचर व्यवसाय चांगला चालला होता. एका फर्निचर व्यापाऱ्याशी हिचं दुसरं लग्नही झालं पण हे लग्नसुद्धा सुख देवू शकलं नाही. पदरात एक मुलगा व एक मुलगी टाकून नवरा मृत्यू पावला.

आता चार पैसे हातात येत होते. एक माणूस तिच्याकडे आला. त्याचा स्वतःचा एक प्लॉट होता तो त्याने हिला अडीच लाखाला देवू केला. पण हिच्याकडे एवढे पैसे नव्हते. कशीबशी एक लाखाची जुळणी करुन राहिलेले पैसे नंतर देण्याच्या बोलीवर हा व्यवहार झाला. तिने काही दिवसांनी सगळे पैसे फेडले. ताबा घ्यायला गेल्यावर कळालं की हा प्लॉट वादग्रस्त आहे. अनेक वर्षे घालवून, कोर्टाच्या अनेक चकरा मारुन हिने सगळे वाद मिटवले. अडीच लाखाच्या प्लॉटची किंमत पन्नास लाखावर गेली. हिने त्या जागेवर स्वतःचे कन्स्ट्रक्शन सुरू करण्याचा निश्चय केला.
झालं एक महिला, त्यातही बुद्धिस्ट महिला, ती बांधकाम व्यवसायात उतरणार म्हणल्यावर बिल्डर लॉबी अस्वस्थ झाली. एका बिल्डरने तिच्या खूनाची सुपारी दिली. ही बातचीत एका इसमाने ऐकली. त्याने सगळी कहाणी तिच्या कानावर घातली. तिला गावी निघून जाण्याचा सल्ला दिला. पण आता मरणाची भितीच उरली नव्हती. त्यावेळी ठाण्याचे पोलीस कमिशनर भुजंगराव मोहिते होते. हिने त्यांना सगळी कहाणी सांगितली. त्यांनी तपासाचे आदेश दिले. धरपकड झाली दुर्घटना टळली.

" तुम्ही आता या क्षेत्रात येतच आहात तर मग तुम्ही पोलीस संरक्षण का घेत नाही ?" कमिशनर म्हणाले. 

" साहेब पोलीस संरक्षणात मी किती दिवस राहणार ? तुम्हाला जर काही द्यायचे असेल तर मला रिवॉलव्हरचे लायसन्स द्या..." कल्पना म्हणाली. 
अश्चर्य म्हणजे फक्त पाच सहा तासातच तिला रिवॉलव्हरचे लायसन्स मिळाले. 

एका सिंधी पार्टनरला घेऊन ६५ - ३५ टक्केवारी मध्ये हे कन्स्ट्रक्शन पूर्ण झाले तेंव्हा या प्लॉटचे तिला साडेचार कोटी रुपये मिळाले. 
बांधकाम व्यवसाय वाढू लागला पण शत्रूही वाढले.

 पण "जोपर्यंत आपल्या रिवॉलव्हर मध्ये सहा गोळ्या आहेत तो पर्यंत आपण मरु शकत नाही." अशी ठाम भूमिका घेवून बेडरपणे कल्पना आव्हानाला सामोरी जात राहिली. 

एकेदिवशी कमानी ट्युबज कंपनीचे काही कामगार तिच्याकडे आले. 

"ही कंपनी तुम्ही टेक ओव्हर करा." अशी त्यांनी विनंती केली.
 एक नवीनच आव्हान समोर आलं होतं. तिने चौकशी केली. 
१९६० मध्ये ही कंपनी सुरू झाली होती. १९८५ मध्ये कामगार आणि मॅनेजमेंट मध्ये वाद झाले. कंपनी बंद पडली. १९८८ साली सुप्रिम कोर्टाने या कंपनीचा मालकी हक्क कामगारांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. पण कंपनीवर कर्जच एवढे प्रचंड होते की कामगार ही कंपनी चालवू शकले नाहीत. 

कंपनीवर ११६ कोटीचे कर्ज होते. कंपनीविरुद्ध १४० लिटिगेशन्स पेंडिंग होते. ही कंपनी कायमस्वरूपी बंद झाली तर ३५०० कामगार रस्त्यावर येणार होते. कल्पनाने हे आव्हान पेलण्याचे ठरवले. दहा एक्स्पर्टची एक कमेटी स्थापण केली. अभ्यास केला. पाच कोटी कर्जाचे व्याज, दंड मिळून पंचवीस कोटी कर्ज, अशा पद्धतीने प्रत्येक कर्जाचा आकडा वाढत गेला होता. सगळा मिळून ११६ कोटी चा अकडा झाला होता. तिने फायनान्स मिनिस्टरची भेट घेतली. त्यांना सविस्तर माहिती दिली, कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न समजावून सांगितला. कर्जावरील व्याज, दंड माफ करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. 

मंत्र्यांनी लक्ष घातले. बॅंकांशी चर्चा केल्या. कंपनी बंद पडली तर काहीच मिळणार नाही. त्यापेक्षा मुद्दलाची रक्कम तरी मिळेल. बॅंका राजी झाल्या. त्यांनी व्याज माफ केले. न्यायालयाने सात वर्षांत कर्जफेड करायला सांगितली होती. कल्पनाने एका वर्षातच सगळे कर्ज फेडून टाकले. बॅंकांनी पण खूष होवून मुद्दलातही पंचवीस टक्के सुट दिली. कामगारांचे थकलेले पगार तीन वर्षांत अदा करायचे होते तिने ते तीन महिन्यांतच देवून टाकले. एवढे करुनही कंपनीकडे साडेचार कोटी शिल्लक नफा रक्कम राहिली. 
एका आजारी कंपनीचे तिने फायद्यात चालणाऱ्या कंपनीमध्ये रुपांतर केले. कल्पना कमानी ट्युबज या कंपनीची मालक झाली. कल्पना आज या  ७०० कोटीच्या कंपनीची मालक आहे. या व्यतिरिक्त कमानी स्टील्स, केएस क्रिएशन्स, कल्पना बिल्डर्स अॅंड डेव्हलपर्स, कल्पना असोशिएट्स या सारख्या उद्योग समूहाची मालकी आज कल्पनाकडे आहे. 

कल्पना हिने शैक्षणिक संस्था काढली. समाज उपयोगी संस्था स्थापन केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार सुरु केले.  या कार्याची दखल घेऊन शासनाने सन २०१३ मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने गौरवले, भारतीय महिला बॅंकेच्या बोर्डावर डायरेक्टर म्हणून नियुक्त केले. 

कोणतीही मॅनेजमेंटची डिग्री पदरी नसताना केवळ सातवी पास मागासवर्गीय महिला स्वतःच्या कर्तबगारीवर एवढी मोठी यशाची गरुड भरारी घेऊ शकते ही कल्पनाच अशक्यप्राय वाटणारी, पण ही कल्पना सत्यात उतरवली आहे पद्मश्री कल्पना सरोज यांनी. 

सत्य हे कल्पनेपेक्षाही आचंबित करणारे असते हे दाखवायला यापेक्षा दुसरे कोणते उदाहरण असू शकते? 

या महत्त्वाकांक्षेला लाखो सलाम 🙏
(लेखन- संजन मोरे)

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

देवमाणूस

" देव-बीव सगळं झूठ आहे..थोतांड आहे..'मेडिकल सायन्स' हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे जेवढे प्राण वाचले असतील,तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत..मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे 'ऑपरेशन थेटर ' च्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात.."

डॉक्टर कामेरकरांच्या या वाक्यावर, सभागृहात एकंच हशा उठला..डॉक्टर कामेरकर एका 'मेडिकल कॉन्फरन्स' मध्ये बोलत होते..डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर..त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत..कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले..वाटेतच त्यांच्या 'मिसेस' चा मेसेज होता कि "मी आज किटी-पार्टीला जात आहे.मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत..जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय..घरी गेलात कि जेवा"...

डॉक्टर घरी आले..हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले..जेवण आटोपल्यावर लक्षात आलं,कि बरंचसं जेवण उरलंय..आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं..म्हणून उरलं-सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणातरी भुकेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले..

लिफ्ट मध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं.."देव-बिव सगळं झूट आहे" -हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं..डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक..देव अशी कुठलीही गोष्ट,व्यक्ती,शक्ती जगात नाही यावर ठाम..जगात एकंच सत्य..'मेडिकल सायन्स'..बाकी सब झूट है'..

डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले..जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं..ते त्या दिशेने चालू लागले..जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि एक मध्यम वयाची बाई,आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे.ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं..ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती..डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली..आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई,तिच्या मुलाला म्हणाली 

"बघ बाळा..तुला सांगितलं होतं ना..आज आपल्याला जेवाया मिळेल..देवावर विश्वास ठेव..हे बघ..देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलंय"......

हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळ-पायाची आग मस्तकात गेली..ते त्या बाईवर कडाडले, "ओह शट-अप..देव वगैरे सगळं खोटं आहे..हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय..देव नाही..हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो..पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय..काय देव देव लावलंयस..नॉन-सेन्स.."

"साहेब..हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलंत यासाठी मी तुमची आभारी आहे..पण साहेब..देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो..माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस,हा देवच आहे..आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधाया जातो एवढंच..माझ्यासाठी तुम्ही ' देव 'च आहात साहेब..आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलंत..तुमचं सगळं चांगलं होईल...हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला.."

डॉक्टर कामेरकर, त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले..एक रोगट-भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती..आणि ते याच विचारात दंग झाले कि ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ? 

चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो...चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे..चांगल्या माणसात देव आहे..प्रत्येक 'सत्कृत्यात' देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही?

आपण 'देवावर विश्वास' ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ?तर आपल्याला चांगली माणसं भेटतील,चांगली परिस्थिती निर्माण होईल यावरच तो विश्वास असतो...

डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं..आपल्या भुकेल्या लेकराला ती माऊली भरवत होती..त्यांच्या चेह-यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..

एक कणखर डॉक्टर त्या दोन अश्रूंत विरघळला होता...

डोळे मिटून,ओघळत्या अश्रूंनी,डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते.....!!
👏

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

मी म्हणजे कोण?

रिऍलिटी 3-

आज आपण या लेखाचा तिसरा भाग बघणार आहोत. 
मजा म्हणून येथे एक छोटीशी गोष्ट सांगतो एका प्रचंड महान अद्वैतवादी संताची.
रमण महर्षि.
एकदा एक व्यक्ती रमण महर्षि यांच्याकडे आली. ती व्यक्ती रमाना महर्षींना म्हणाली, "मी अद्वैतवादी नाही. तुम्ही प्रत्येकाला एकच सांगता की मी कोण आहे हे शोधून काढ. परंतु मी तर विष्णूचा भक्त आहे. तर मी तुमच्या पद्धतीप्रमाणे मी कोण आहे याचा विचार न करता फक्त विष्णूची भक्ती केली तर चालेल का?"
रमण महर्षि म्हणाले "हो".
" मग मेल्यानंतर मी वैकुंठात जाईन का?"
रमण महर्षी म्हणाले, "हो का नाही जाणार?"
"मग माझ्याशी प्रत्यक्ष विष्णू बोलू शकतील का?"
"हो, विष्णू तुझ्याशी बोलतील."
" अरे वा, ते माझ्याशी काय बोलतील?"
रमण महर्षी म्हणाले," विष्णू हेच सांगतील मी म्हणजे कोण हे शोधून काढ."
🙂🙂😂😂😂😁

थोडक्यात मी म्हणजे कोण हे शोधून काढणे हे कोणत्याही मार्गाचे शेवटचे ध्येय आहे. असे रमण महर्षींना सांगायचे असावे. मग तो भक्तिमार्ग असो किंवा राज योगाचा मार्ग असो. 

आता आपण मुख्य विषयाकडे वळू.
तिसऱ्या भागाकडे डायरेक्ट जाण्याआधी मी फक्त थोडीशी उजळणी करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे लिंक लवकर लागू शकेल
अद्वैत वेदांत नुसार तीन प्रकारच्या रियालिटी असतात. 
1. स्वप्नावस्था
2. जागृत अवस्था
3. तुर्या अवस्था
यापैकी आपण नेहमी स्वप्न किंवा निद्रावस्था आणि जागृतावस्था यामध्ये जगत असतोच.  निद्रा अवस्थेमधील किंवा स्वप्नामधील भीती किंवा दुःख हे आपण जागे झालो की क्षणामध्ये नष्ट होऊन जातात. जागृत अवस्थेमधील आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही दुःख किंवा भीती अनुभवत असतो ती आपल्याला कशी बरे नाहीशी करता येईल? त्याकरता तिसऱ्या रियालिटी चा विचार केलेला आहे. 
हे एका प्रकारचे तिसरे डायमेन्शन म्हटले तरी चालेल. तर या डायमेन्शन मध्ये करण्याकरता तीन स्टेप्स सांगितलेल्या आहेत.
1. श्रवण
2. मनन
3. निधीध्यास

यापैकी श्रवण म्हणजे ज्ञानी अशा गुरूंकडून सत्य वचन ऐकत राहणे. अद्वैत वेदान्ताचा बेस हा मुळात या एका वाक्यावर आहे ते वाक्य म्हणजे "अहम ब्रह्मस्मी" किंवा ब्रम्हे एकच सत्य आहे बाकी सर्व मिथ्या. ब्रम्ह हे एकमेव सत्य. 

तर मागच्या भागांमध्ये आपण श्रवण म्हणजे काय हे बघितले. त्यामध्ये गुरूच्या या शिकवणीला शिष्य किती प्रकारे प्रश्न विचारू शकतो त्याला मर्यादा नाही. किती प्रश्न विचारले त्याला उत्तर द्यावेच लागतात. जितक्या शंका तितकी उत्तरे.

मागील भाग वाचून बघितला असता आता या प्रकारच्या गुरूने दिलेल्या उत्तरामुळे मेंदूचे समाधान होते. किंवा बुद्धीचे समाधान होते असे वाटू शकेल. परंतु त्यामुळे मी म्हणजेच ब्रम्ह आहे हीच स्थिती अनुभवता कसे बरे येईल?

खरेतर अद्वैत वेदांत हा सगळ्यात सोपा आणि सहज मार्ग. ज्यामध्ये प्रत्यक्ष ध्यानधारणा किंवा जप-तप याची खरी गरज लागत नाही. कारण प्रत्येक दुःखाचे मूळ हे अज्ञान असते. जर का ते अज्ञान दूर करुन ज्ञान मिळवले की आपोआप दुःखाचे निराकरण झालेले असते. 

समजा मला माझ्या आयुष्यात प्रचंड दुःख झाले आहे. माझे आवडते व्यक्ती मला सोडून गेली, किंवा माझा उद्योग धंदा बुडुन गेला आणि गरिबी आली किंवा अशा अनेक प्रकारे मी दुःखी झालेलो आहे. तर यावरील उत्तर हे असेल का? की मला सोडून गेलेली व्यक्ती मला परत मिळाली. किंवा माझा बुडलेला धंदा व्यवस्थित चालू लागला. त्यामुळे त्यात पुरते दुःखाचे निवारण होईल. परंतु कायमस्वरूपी दुःखाचे निवारण शक्य आहे का? तर नाही. 
परंतु जर का हे लक्षात आले की ज्या प्रमाणे स्वप्नांमध्ये आपण जे धन मिळवतो किंवा एखादी प्रिय वस्तु मिळवतो. आणि स्वप्नातून जागे झाल्याबरोबर ते सर्वजण आणि ती वस्तू आपल्यापासून नाहीशी झालेली असते. म्हणजेच आपल्याला ज्ञान झालेले असते की जे काही आपण बघत होतो ते सत्य नव्हते. तसेच ज्ञान जर का आपल्याला या जागृत जगामध्ये झाले तर समोरील परिस्थिती बदलणार नाही परंतु त्यामुळे दुःख मात्र होणार नाही. 

अद्वैत वेदांत हे सांगत नाही की तुमच्या वर वाईट प्रसंग येणार नाही किंवा संकट येणार नाहीत. ते जशी यायची आहेत तशीच येतील. प्रचंड वाईट गोष्टी घडतील देखील. परंतु त्याचा तुमच्या समाधान वर आणि आनंदावर कोणताही फरक पडणार नाही याची शाश्वती अद्वैत वेदांत देतो. ज्याप्रमाणे आपण जागे असताना आपण स्वप्न काय पडणार आहे त्याला फारसे घाबरत नाही. आणि वाईट स्वप्न जरी पडले तरीदेखील आपण त्याची फारशी चिंता करत नाही तसेच. 

म्हणजेच थोडक्यात आपल्याला दुःख होते ते अज्ञानामुळे. जर का हे समजले की मी म्हणजे ब्रह्म आहे म्हणजेच ज्ञान मिळाले की त्यानंतर दुःखाचे कारण राहणारच नाही.

पण गुरूच्या तोंडून फक्त हे ज्ञान ऐकल्यामुळे मी ब्रह्म आहे याची जाणीव प्रत्येकाला होईलच असे नाही. काही जीव जन्मतःच अत्यंत समजदार व कमी गुंतागुंतीचे असतील त्यांना ही गोष्ट गुरूने सांगितल्या सांगितल्या काही वेळात लक्षात येईल व त्याची जाणीवही होईल. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना याची जाणीव लगेच होत नाही म्हणून त्यासाठी पुढील भाग येतो तो म्हणजे मनन आणि निधीध्यास

मनन:
तर मनन म्हणजे काय?
गुरूकडून ज्ञान ऐकल्यानंतर त्यावर विचार करणे. जे आपल्या बुद्धीला पटले आहे त्याला आत पर्यंत घेऊन जाणे. परंतु बुद्धीला पटलेल्या गोष्टी अनुभवायला येत नसल्यामुळे मनाला पटतील असे नाही. त्याचे कारण काय?
आता आपण याचा शोध स्टेप-बाय-स्टेप घ्यायला सुरुवात करू.
कोणतीही गोष्ट आपल्याला अनुभवास येऊ शकते ते फक्त त्या वेळेला जेव्हा आपली एकाग्रता अत्युच्च पातळीची असेल. गुरु जे काही सांगत आहेत त्या गोष्टीवर 100% एकाग्रचित्त असेल तर त्याची जाणीवही ही त्या क्षणी होईल. परंतु आपले चित्त हे बऱ्याच गोष्टींमध्ये विखुरलेले असते. त्यामुळे गुरु यांनी सांगितलेले ज्ञान " मी म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आहे" हे बुद्धीला थोडेफार पटले तरी देखील मनावरील असलेल्या अनेक कश्यामुळे ते सरळसोट आत पर्यंत जात नाही.
यालाच दोष असे म्हणतात. याला विक्षेप असे नाव या संस्कृतमध्ये दिलेले आहे. 

तर विक्षेप म्हणजे काय?
गुरूने आपल्याला ज्ञान दिले तरीदेखील ते मनाच्या वर पर्यंतच राहणे व आत पर्यंत न जाणे. त्याची जाणीव न होणे. त्याचे कारण आपले चित्त व मन हे कायम विखुरलेले असते. त्यामुळे गुरूने कितीही वेळा सांगितले तरी देखील ते ज्ञान आज पर्यंत पोहोचत नाही. 
मग त्यावर शिष्य तक्रार करतो कि मी तुम्ही सांगितलेले ऐकले आहे परंतु ते आज पर्यंत जाणिवेला का येत नाही बरे? 
त्याचे कारण आहे विक्षेप.

चित्त एकाग्र नसणे म्हणजेच विक्षेप या दोषाला कसे घालवावे बरे? कारण जर का चित्त एकाग्र नसेल तर गुरूकडून तीच गोष्ट हजार वेळा ऐकून किंवा त्याचा विचार करून फायदा होत नाही. मग त्यासाठी आपल्याला चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच जप किंवा ध्यानधारणा किंवा त्राटक किंवा अन्य काही उपाय. 

म्हणजेच अद्वैत वेदांत यामध्ये खरातर या गोष्टींचा उपयोग वरवर दिसून येत नाही परंतु चित्त एकाग्र करण्याकरता मात्र यांचा साधन म्हणून उपयोग करावा लागतो आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना. ध्यानधारणा व व विविध एकाग्रतेची साधने यांचा वापर करून सर्वप्रथम मनावर असलेली आवरणे हळूहळू दूर होऊ लागतात. यासाठी कोणाला किती कालावधी लागेल याचा नेम नाही. जितकी जास्त तीव्रता तितके लवकर यश. 

जसे मनावरील आवरण हळूहळू दूर व्हायला लागेल तसे जास्त स्पष्ट सत्य दिसू लागते जे गुरुने सांगीतलेले आहे. आता आपण हे छोट्या उदाहरणांमधून लक्षात घेऊ म्हणजे जास्त लक्षात येईल.

समजा एखाद्याच्या गुरूंनी बुद्धीच्या सर्व शंका दूर करून एका शिष्याला पटवून दिले की तू म्हणजे ब्रह्म आहेस. शिष्य घरी जाऊन हेच वारंवार बोलू लागला परंतु त्याला काही अनुभवायला येत नव्हते किंवा त्याला ही जाणीव होत नव्हती की मी म्हणजे ब्रम्ह आहे. 
मग तो शिष्य तक्रार करतो कि तुम्ही मला सर्व सांगितलेत तरीदेखील मला काही समजत नाहीये की मी म्हणजे ब्रह्म आहे. याचे काय कारण?
मग त्याचे कारण असते ते म्हणजे विक्षेप. म्हणजेच वर्षानु वर्ष इकडे-तिकडे भरकटलेले मन. मग त्यावर उपाय असतो जप किंवा ध्यानधारणा वगैरे. राजयोग किंवा हटयोग या ठिकाणी वापरला जातो. अद्वैत वेदांत यामध्ये राजयोग आणि हटयोग एक साधन म्हणून जेणेकरून त्याचा उपयोग मनाची एकाग्रता साधण्याकरता होईल. 
आता शिष्य प्राणायाम करू लागतो किंवा ध्यानधारणा करू लागतो परंतु अजून एक प्रॉब्लेम त्याच्या समोर येतो. तो म्हणजे आहे ध्यान करताना देखील मन इकडे-तिकडे धावत राहते. त्याला झोप यायला लागते नाहीतर पन्नास विचार मनामध्ये यायला लागतात. मग तो पुन्हा गुरूंकडे जाऊन म्हणतो हे काय मला ध्यान व इतर साधने देखील जमत नाहीयेत जी एकाग्रता करण्यासाठी लागतात.
मग मग अजून एक प्रॉब्लेम सांगितलेला आहे त्याचे नाव चित्तं मल.. म्हणजेच मनावर साठलेली अनेक पुट. या जन्मातील अनेक वर्षांमधील केलेली बरेच कामे व विचार ज्यामुळे मन व चित्त हे दूषित झालेले असते. जोपर्यंत ते गढूळ आहे तोपर्यंत पलीकडील दिसेल कसे?
त्यामुळे या दोषावरती अद्वैत वेदांता मधील उपाय आहे निष्काम कर्मयोग. म्हणजेच जास्तीत जास्त लोकांना निरपेक्षपणे मदत करीत राहणे हा उपाय. अशाप्रकारे लोकांसाठी काम केल्यामुळे आपोआप चित्त आणि मनावरील दोष आणि गढूळता नाहीशी होते व त्यामुळे त्या शुद्ध होण्यास मदत होते.

आता आपण वरती बरेच काही बोललो त्यामुळे गोंधळ होण्याचा संभव जास्त. त्यामुळे एक उजळणी करू या. 
आपला खरा प्रॉब्लेम काय आहे आणि त्याचा उपाय काय हे आपण खाली एकदम थोडक्यात बघू.

1.अज्ञाना वरील उपाय असतो ज्ञान.
2. मी कोण आहे व मला दुःख का आहे अज्ञान आहे त्यावरील उपाय एकच असू शकतो तो म्हणजे मी कोण आहे हे ओळखणे.
3. मी कोण आहे हे जरी गुरूंनी सांगितले तरी देखील ते मनाच्या आत पर्यंत किंवा चित्ता पर्यंत पोहोचत नाही. म्हणजे येथे दोष आहे त्याला म्हणतात विक्षेप. आणि विक्षेप याचा उपाय म्हणजे मनाची एकाग्रता. म्हणजे राजयोग किंवा हटयोग यांचा सहारा घेऊन आपले मन एकाग्र करणे जेणेकरून ज्ञानाची प्राप्ती होईल. 
4. ध्यानधारणा किंवा राज्य योगामधील उपाय वापरून देखील मन एकाग्र करताना अडचण येत आहे. याचे कारण मलीन चित्त. व त्याचा उपाय आहे कर्मयोग. त्यामुळेच गीता या उपनिषदांमध्ये कर्मयोगाचे महत्व सर्वात जास्त आहे. कारण मुळात मनच मलिन असल्यामुळे पुढील कोणत्याच गोष्टी आपल्याला करणे शक्य होत नाही व आपण ज्ञानापासून दूर राहतो. त्यामुळे निष्काम कर्म योगामुळे मनावरील गढूळता नष्ट होऊ लागते मन निर्मळ होऊ लागते.

यामध्ये उपाय कोणता आणि त्याचे खाद्य कोणते किंवा साधना कोणती आणि त्याचे साधन कोणते हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे.
कर्मयोग हे मी म्हणजे कोण हे माहिती करून घ्यायचे साधन नाही किंवा मन एकाग्र करण्याचे देखील साधन नाही. कर्मयोगाचे साध्य हे मनाची गढूळता आणि मलिनता दूर करणे.
ध्यान किंवा प्राणायाम किंवा जप या साधनेचे उद्दिष्ट मी म्हणजे कोण याचे ज्ञान होणे नाहीये. तर यांचे उद्दिष्ट आपले मन एकाग्र होणे हे आहे. कारण एकाग्र मन असेल तरच ज्ञानप्राप्ती होऊ शकते. 

अर्थात हे एक मेकाला ट्रेनच्या डब्यात सारखे जोडलेले असतात तरीदेखील यामधील साध्य काय आणि त्यासाठी लागणारे साधन काय हे लक्षात येणे फार गरजेचे आहे. 

या प्रकारे चालत असताना मनन आणि निदिध्यास हे एकत्रपणे चालू राहतात.
वरील सर्व उपाय केल्यानंतर ज्यावेळेला शिष्य मनन करीत असतो त्या वेळेलाच काही क्षणांसाठी त्याला अचानक मी म्हणजे कोण याची जाणीव होते. परंतु ती जाणे हो 24 तास राहत नाही. त्यामुळे सतत ती जाणीव ठेवण्याचा प्रयत्न किंवा ती अवस्था टेकवण्याचा प्रयत्न म्हणजे निदिध्यास. 

म्हणजेच मी कोण हे काही काळासाठी लक्षात आल्यामुळे दुःखांचे किंवा प्रॉब्लेम्स चे कायमस्वरूपी निराकरण होणे शक्य नाही कारण काही वेळाने आपण मी म्हणजे कोण हे विसरून जातो. किंवा इतर देहाच्या व मनाच्या कारभारामध्ये अडकल्यावर त्याचा विसर पडतो. त्याचा विसर कसा पडला नाही पाहिजे या अभ्यासाला नीदिध्यास असे म्हणतात. म्हणजेच एका प्रकारे अनुसंधान. 

शिष्याला काही क्षणांसाठी किंवा काही वेळासाठी मी म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आहे हे ज्ञान झाल्यावर त्याला आपसूकच लक्षात येते हे मला कशाचीही भीती नाही. सर्वकाही तयार झाले आहे ते माझ्यापासून. व सर्व काही विलीन होते ते देखील माझ्यात. त्यानंतर आपसूकच त्याला ही अवस्था 24 तास टिकावी असे वाटायला लागते. त्यामुळे त्याचा त्या दिशेने प्रयत्न चालू राहतो.

अद्वैत वेदांत म्हणजेच मी प्रत्यक्ष ब्रम्ह आहे या जाणिवेने पर्यंत पोहोचण्याचा ज्ञानमार्ग आणि अत्यंत सरळ मार्ग. हा मी तिसऱ्या भागात थोडक्यात सांगून संपवत आहे. अर्थात याचे तत्त्वज्ञान प्रचंड मोठे आहे व त्यातील विविध गोष्टींसाठी मी अजून भरपूर काही लिहिणार आहे. 
परंतु रियालिटी या मालिकेचा हा शेवटचा लेख आहे. 
यानंतर अनेक प्रश्न मनात तयार झाले असणार. जसे की, मी म्हणजे ब्रम्हा ही अवस्था प्राप्त झाल्यावर काय होते? दुःख आणि वेदना संपून जातात म्हणजे काय? याचा व्यवहारावर किंवा नोरमल लाइफ जगत असताना त्रास होतो का?? असे अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये अनुत्तरीत आहेत.

त्यासाठी मी यापुढे वेगवेगळे स्वतंत्र लेख लिहिणारच.
त्यात पुरते रजा घेतो.

#mayurthelonewolf

रिऍलिटी लेखक मयूर जोशी

रिऍलिटी - 1

मॅट्रिक्स सिनेमा कोणी कोणी बघितलेला आहे? आधुनिक काळामध्ये अत्यंत अवघड विषयाला हात घातलेला हा अत्यंत गुंतागुंतीचा सिनेमा. या सिनेमामध्ये व्हर्च्युअल जगामध्ये सामान्य लोक जगत असतात. त्यांना माहित नसते की आपण प्रत्यक्षामध्ये एका ठिकाणी झोपून आहोत व आपण जगत आहोत ते स्वप्नामधील जग आहे. काही लोकांना मात्र या झोपलेल्या अवस्थेत मधून जाग येते व सत्य काय आहे ते लक्षात यायला सुरुवात होते. हा माझा प्रचंड आवडता सिनेमा आहे कारण भारतामधील अद्वैत वेदांत किंवा तशा पद्धतीचेच तत्त्वज्ञान यामध्ये दाखविण्यात आलेले आहे एका वेगळ्या प्रकारे.

जास्त खोला मध्ये जात नाही परंतु सरळ आता मुद्द्याला हात घालतो. 

काही माणसांचे चरित्र वाचले असता किंवा त्यांना समजावून घ्यायचा प्रयत्न केला असता असा प्रश्न पडतो की ही माणसे नक्की कोणत्या दुनियेमध्ये जगत होती??

उदाहरणार्थ
1. रामकृष्ण परमहंस: गळ्याचा कॅन्सर झाला होता. गळ्याला भोक पडले होते. खाणेपिणे जवळपास बंदच. या अवस्थेमध्ये देखील हा माणूस तितकाच आनंदी. प्रचंड हसतमुख. कोणी एका भक्ताने त्यांना विचारले, " ठाकूर, खूप जास्त दुखत आहे का?" रामकृष्ण म्हणाले हो खूप दुखतयं. तेवढ्यात बाजूला बसलेले दुसरे भक्त रामकृष्णांनी कडे बघून म्हणाले "तरीदेखील आत्मनंदामध्ये तल्लीन आणि मजा घेतायत.'
त्याच्याकडे बघून रामकृष्ण शरीराला सोसत नव्हते तरी जोरात हसले, म्हणाले "साला,  याला बरोबर समजले" 

2. येशू ख्रिस्त: क्रॉस ला हातापायांना खीळे मारून लटवल्यानंतर, प्रचंड मारहाण झाल्यानंतर हा माणूस प्रार्थना करतो, हे माझ्या परमेश्वरा, बापा, यांना माफ कर यांना समजत नाहीये ते काय करत आहेत.

3. साईबाबा: अत्यंत शरीराची कठीण अवस्था, परंतु येणाऱ्या जाणाऱ्याशी अत्यंत शांत आणि हसतमुख. कोठेही वेदनेची तक्रार नाही.

असे असंख्य जण होऊन गेले. प्रचंड शारीरिक किंवा आर्थिक त्रासांमध्ये असताना या लोकांनी व्यवहारांमधील उपाय वापरले. म्हणजेच रामकृष्ण परमहंस हे डॉक्टरी उपचार घेत होते. परंतु कालीमाते कडे त्यांनी एकदाही प्रार्थना केली नाही की मला बरं वाटू दे. उलट त्यांना काही लोकांनी सुचवले होते की तुमची मनाची शक्ती इतकी जास्त आहे ती थोडा वेळ जरी तुम्ही आपल्या आजाराकडे लक्ष केंद्रित केले तर तो बरा होऊ शकेल. त्यावर रामकृष्णांनी रागावून सांगितले, म्हणजे मी या घाणीने भरलेल्या शरीरासाठी माझ्या आई (कालीमाता) वरील लक्ष एक सेकंदासाठी तरी हलवू काय?? 

या लोकांना व्यवहारांमधील गरिबी, लोकांनी दिलेली अत्यंत घाणेरडी वागणूक, शरीरावर आलेले दुखणी कशाचेच काही पडलेले नव्हते. यामधील बऱ्याच जणांना आपल्या मधील लोक गुरु किंवा संत म्हणतात. त्यांना मानतात आणि त्यांच्या समोर नतमस्तक होतात. परंतु खरोखरच हे लोक असे का होते याला मात्र चमत्कार असे एकच नाव दिले जाते. असेल देखिल. परंतु तो चमत्कार जर का ते लोक करू शकत होते तर मग आपण का नाही हा प्रश्‍न कोणाच्याच मनात येत नाही. 

कोणत्या जगात जगत होते हे लोक? काय या लोकांची रियालिटी वेगळी होती?? वेगळ्या डायमेन्शन मध्येच जगत होते की काय? असे बरेच प्रश्न मनामध्ये यायचे यांना वाचताना. यांना समजून घेताना. कारण हे सर्व मानवी कक्षाच्या बाहेरचे वाटायचे.

मग काही काळाने अद्वैत वेदांत वाचनामध्ये आला. त्यामधून काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या त्या खाली देण्याचा प्रयत्न करतो.

मांडक्योपनिषद, केन उपनिषद, तैतिर्या उपनिषद, अशी अनेक उपनिषदे थोडीफार वाचनामध्ये आली. त्यामध्ये मुख्यतः तीन प्रकारच्या अवस्था किंवा रियालिटी सांगण्यात आलेले आहे.

1. जागृतावस्था व त्यामधील रियालिटी: 

आपण जागे असताना जे काही करत असतो ते सर्व काही या रियालिटी मध्ये येते. या रियालिटी मध्ये शरीर आणि मन आणि बुद्धी हे तिने पूर्णपणे कार्यरत असतात. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत जे काही सत्य आपण जगत असतो ते हे. 

2. स्वप्नावस्था व गाढ निद्रा (deep sleep) : 

दिवसभरामध्ये जे काही सुख आणि दुःख किंवा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये येतात, त्यापैकी खूप सार्‍या गोष्टी आपण झोपल्यानंतर विसरून जातो. बऱ्याच वेळेला शरीराच्या दुखणे देखील विसरून जातो. एखादे व्यसन असेल तर त्याची जाणीव आपण जागे असताना आपल्याला असते. परंतु झोपल्यानंतर मात्र त्या व्यसनाची देखील जाणीव आपल्या मनाला होत नाही. या अवस्थेमध्ये शरीराचा भाग अत्यल्प असतो. शरीर नावासाठी असते. ते निद्रितावस्थेत व अचेतन अवस्थेमध्ये असते. बऱ्याच वेळेला दिवसभर घडलेल्या घडामोडी आणि स्वप्न यांमध्ये काडीचेही साम्य नसते. आपण जवळपास सहा ते आठ तास या जगामध्ये जगत असतो. म्हणजेच जागृत अवस्थेमधील प्रॉब्लेम किंवा आनंद विसरून जाऊन आपण स्वप्नांमध्ये चाललेल्या गोष्टीं जगत असतो. या सहा ते आठ तासांसाठी आपले जग बदललेले असते, आपले सुख बदललेली असतात, माणसे बदललेली असतात, व भीत्या देखील. 

प्रत्येक रात्री काही सेकंदांसाठी किंवा अत्यंत कमी कालावधीसाठी माणूस गाढ निद्रे मध्ये प्रवेश करतो. त्या वेळेला कोणताही विचार मनामध्ये येत नाही. त्यामुळे कोणतेही स्वप्न देखील मनासमोर नसते. पूर्ण ब्लँक. फक्त शरीर चालू असते, मन चालू असते परंतु मनाचा व्यवहार ठप्प झालेला असतो.

3. याला सुशुप्ती किंवा तुर्या अवस्था असे आपण नाव देऊ. म्हणजेच आत्मसाक्षात्कार.

ही अवस्था फार कमी लोकांना लाभलेली असते. व त्यामधील फार कमी लोकांना कायमस्वरूपी लाभलेली असते. या अवस्थेचे वर्णन मी नंतर करण्याचा प्रयत्न करेन. त्याआधी पहिल्या दोन अवस्था आहेत याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

स्वप्नावस्था सर्वसाधारण माणसासाठी फारशी महत्त्वाची नसते. जोपर्यंत त्या अवस्थेत अति आनंद किंवा आती वेदना नसतात. सर्वसाधारण आपण रोज स्वप्न बघतो व उठल्यानंतर विसरून जातो. परंतु एखादे स्वप्न अत्यंत भयानक व अत्यंत घाणेरडी परिस्थितीचे असले, तर दिवसभर त्या स्वप्नाची सावली आपल्या दिनचर्या वर पडलेली असते. बऱ्याच वेळेला अत्यंत भीतीदायक पडलेले स्वप्न आपण उठल्यानंतर विसरुन जाण्याचा प्रयत्न करतो, हे सांगून की ते फक्त स्वप्न होते खरेखुरे काहीही नव्हते. 

थोडक्यात स्वप्नातून उठल्यानंतर जे काही स्वप्नात चांगले किंवा वाईट घडले असेल त्याला आपण कमी दर्जा देतो. आपण स्वतःला समजावते की हे फक्त स्वप्न होते व मनाचे खेळ होते. आता खरा दिवस आणि करे आयुष्य चालू झालेले आहे त्यावर लक्ष देऊया.

ज्याप्रमाणे स्वप्नावस्थे मधून जागृतावस्थेत आल्यानंतर स्वप्नातील भीत्या किंवा दुःख आणि वेदना याचा आपण फारसा विचार करत नाही, त्याच प्रमाणे अजून अशी कोणती अवस्था असू शकते का? जेथे जागृत अवस्थेमधील गोष्टी या खोट्या वाटतील??? ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्टी आपल्याला भासमय वाटतात उठल्यानंतर.

मला माहिती आहे, हे थोडेसे गुंतागुंतीचे असू शकते समजण्याकरता. परंतु जास्तीत जास्त सोपे व त्यामुळे लांबलचक लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. 

आता आपण उदाहरण घेऊ स्वप्नातील एखादे भयानक देखाव्याचा. आपल्या समोर जंगल आहे आणि तेथे एक भयंकर नाग आपला पाठलाग करीत आहे. आपण धापा टाकत पाळण्याचा प्रयत्न करत असतो. प्रचंड घाबरलेले असतो. आता आपली सुटका नाही व आपण मरणार ही भीती आपल्याला वाटत असते. आणि तेवढ्यात आपले डोळे उघडतात. डोळे उघडल्याबरोबर दोन सेकंदांनी आपण भानावर येतो. आपण हुश्श शकतो. मनातल्या मनात छान वाटते की ते स्वप्न होते. 

परंतु आपण कधी असा विचार केलेला आहे का? स्वप्नामध्ये जे समोर जंगल होते ते कुठून आले बरं?? स्वप्नामध्ये जो नाग होता तो कुठून आला?? आपल्याच मनाने जंगलही तयार केले होते व आपल्याच मनाने नाग नही तयार केला होता व आपलेच मन मी बनून सैरावैरा धावत देखील होते. म्हणजेच ते जंगल आणि तो नाग हे माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत अशी समज स्वप्नामध्ये आपल्याला होती. त्यामुळे आपण त्याला घाबरून पाळायचा प्रयत्न करत होतो.

आता एक प्रश्न विचारतो.

ज्याप्रमाणे स्वप्नांमध्ये आपल्यापासूनच सर्व गोष्टी तयार होऊन देखील आपल्याला हे अज्ञान होते की ते जंगल आणि नाग हे माझ्यापेक्षा वेगवेगळे होते. परंतु ते जंगल आणि तो नाग म्हणजे मीच आहे हे ज्ञान स्वप्नांमध्ये नसल्यामुळे आपण त्याला घाबरत होतो. 

तसेच जर का जागृत अवस्थेमध्ये देखील असले तर?????????????

म्हणजेच जागृत अवस्थेमध्ये आपल्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट हि आपणच तयार करत असलो तर?? प्रत्येक चांगली परिस्थिती आणि वाईट परिस्थिती आपणच तयार करत असलो तर??? केवळ आपल्याला स्वप्नांमध्ये हे ज्ञान नव्हते की आपणच ते जंगल आणि त्यातील भीती वाटणाऱ्या गोष्टी आहोत. तसेच जागृत अवस्थेमध्ये देखील आपल्याला ज्या गोष्टींनी आनंद होतो किंवा दुःख होते ते सर्व आपल्यापासूनच तयार झालेले असेल तर???

जसे स्वप्नामधून उठल्यावर जागृतावस्थेत येतो आणि स्वप्नांमधील दुःख, वेदना आणि भीत्या संपून जातात. तसेच एखादी अवस्था जागृत अवस्थेच्या वरती एखादी व्यवस्था असेल जेथे उठल्यानंतर जागृत अवस्थेमधील गोष्टी या अजिबात भीतीदायक दुःखदायक किंवा आनंददायी देखील वाटणार नाहीत?? आपण जागृत अवस्थेमधील कोणत्याही गोष्टीला फारसे महत्त्वच देणार नाही मग. 

तीच अवस्था आहे तुर्यावस्था. जेथे जागृत अवस्थेमधून उठल्या सारखे वाटते. जे काही आपण जागृत अवस्थेमध्ये चांगले आणि वाईट उपभोगत होतो हे सर्व मायाजाळ आहे हे लक्षात येते. हे सर्वकाही आपल्याच इच्छेने घडून आले आहे याची जाणीव होते. आपल्याला त्रास देणारे आणि आनंद देणारे सर्वच घटक, माणसं हे आपल्यापासूनच तयार केलेले आहेत हे लक्षात येते. ज्याप्रमाणे स्वप्नामधील प्रत्येक घटक हा आपल्या मनाने तयार केलेला होता. 

याकडे फक्त एक तत्त्वज्ञान म्हणून बघा किंवा एक विचार म्हणून बघा किंवा एक सत्य परिस्थिती म्हणून बघा. परंतु पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या या गोष्टी किती प्रचंड चिंतन करून आणि विचार करून लिहिले असतील याचे मला कौतुक वाटते. 

पाश्‍चात्त्य जगतामध्ये आणि सायन्समध्ये मनाचा किंवा अंतर्मनाचा अभ्यास हा गेल्या शंभर ते दीडशे वर्षांमध्ये खरा चालू झाला. ग्रीक किंवा इजिप्तमधील संस्कृती हे आपल्यासारखेच जुने परंतु तेथे अशा प्रकारचा वैचारिक उहापोह कोठेही झालेला दिसत नाही. अरिस्टोटल आणि प्लेटो, यांच्यासारखे विचारवंत नक्कीच आढळतात परंतु ते उपनिषदांत सारखे अत्यंत खोलवर गेलेले दिसत नाहीत. 

 परंतु याबाबत इतक्या सखोलपणे आपल्या उपनिषदांमध्ये लिहिलेले आहे हे बघून आश्चर्य आणि आनंद याला पारावार राहत नाही. त्याचबरोबर इतके प्रचंड वैचारिक खाद्य आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी तयार करून ठेवले आहे त्याचा लाभ आपण भारतीयच घेत नाही याचा खेदही वाटतो.

स्वप्ना अवस्थे मधून जागृत अवस्थेमध्ये उठायला आपल्याला तितकेसे प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यामुळे त्या दोन अवस्था आपण कधीही नाकारत नाही. परंतु तुर्यावस्था या अवस्थेत जाण्याकरता सखोल चिंतन फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी मार्ग देखील सांगण्यात आलेले आहेत. 

अद्वैत वेदांत यामध्ये तीन टप्प्यांमध्ये तुर्या अवस्थेमध्ये जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे. 

श्रवण
मनन
निदिध्यास

याच्या पुढच्या भागांमध्ये मी या तीन टप्प्यांचा खुलासा करत जाईन. 
मी लांबलचक लिहीत आहे परंतु त्याचे कारण इतकेच आहे की सर्वजण असामान्य बुद्धीचे नसतात. माझ्यासारखे अल्पमती लोक देखील असतात त्यांना अत्यंत सोप्या गोष्टी करून सांगितले की लवकर लक्षात येऊ शकते. यासाठी हा खटाटोप.

क्रमशः

#mayurthelonewolf

पोर्टेट फोटो ग्राफी टिप्स मयूर जोशी

पोर्ट्रेट फोटोग्राफी: टिप्स

माणसांच्या भावना टिपणे हे एक दिव्य असते.
एक फोटोग्राफर म्हणून बर्‍याच जणांच्या भावना टिपायला बराच वाव मिळतो. काही वेळेला त्या भावांना मुद्दामून पोज देऊन तयार केलेले असतात. परंतु त्यात कधी मजा येत नाही.

फोटोग्राफर म्हणून फ्री वेडिंग किंवा वेडिंग किंवा मॅटर्निटी अशा अनेक प्रकारचे शूट मी करत असतो. परंतु त्यामध्ये मी मुद्दामून पोज द्यायला सांगत नाही. समोरच्या लोकांना किंवा कपल असेल त्यांना मी निवांतपणे एखादी थीम सांगतो. 
त्यांना हे सांगतो की आता या थीमवर तुम्ही इमॅजीन करा की तुम्ही जर का तसे जगत असतात तर काय केले असते. तुम्ही एकमेकांशी काय बोलला असतात तसे वागला असतात, कसे चालला असतात. मग त्या दोघांना मी पूर्णपणे मोकळे सोडून देतो एकमेकांच्यात involve होण्यासाठी आणि त्या एका प्रकारच्या इमॅजिनेशन मध्ये घुसण्यासाठी. आणि मग मी निवांत जास्तीत जास्त नैसर्गिक फोटो घेण्याचा प्रयत्न करतो. 

प्री वेडिंग शूट मध्ये एक गोष्ट मी कटाक्षाने पाळतो जी बरेचसे फोटोग्राफर मला कधीही करताना दिसले नाहीत. बरेचसे फोटोग्राफर ऑर्डर घेतात आणि डायरेक्ट त्या कपल ला प्री-वेडिंग च्या दिवशी किंवा वेडिंग च्या दिवशी भेटतात. परंतु मी मात्र ज्यांच्याबरोबर प्री-वेडिंग फोटोशूट असते त्यांच्याबरोबर कमीत कमी एक ते दोन वेळा निवांतपणे कॉफी शॉप मध्ये त्यांना बोलावून गप्पा मारत बसतो. जरी समोरचे लोक ओळखीतले असले तरीदेखील. आणि ओळखीचे नसले तरी. 

कारण त्यामुळे तुमचे तुमच्या समोरील लोकांबरोबर एका प्रकारे ट्युनिंग जुळून येते. त्यांना जुजबी काही गोष्टी तोंडी सांगितल्या जातात. मुख्यतः फोटोग्राफर आणि समोरील माणसे यांच्यामध्ये त्या पद्धतीचे कम्युनिकेशन आणि बॉण्ड असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे समोर बसलेल्या कपल ला नर्वस नेस कमी असतो. शूटिंग चालू केल्यानंतर पहिले एक-दीड तास नाहीतर त्यांच्याबरोबर ट्यूनिंग जमवण्या मध्येच जातो. 

आत्तापर्यंतच्या फोटोशूटमध्ये हाच अनुभव आहे की मुले असतात कॅमेरासमोर प्रचंड शाय आणि लाजाळू. मुलींना साधारण दहा वर्षांमध्ये बऱ्याच वेळा स्वतःकडे बघायची सवय असते त्याचप्रमाणे आपण कशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगले दिसतो याची त्यांना जाण मुलापेक्षा जास्त असते. मुली त्यामानाने कॅमेरासमोर प्रचंड बोल्ड असतात. मुलांना मात्र कायम एका पद्धतीचा तणाव असलेलाच मला दिसलेला आहे. 

परंतु स्ट्रीट फोटोग्राफी मध्ये किंवा नॅचरल फोटोग्राफीमध्ये मात्र अशी अडचण येत नाही. अर्थात तुमच्या डोळ्यांनी तो क्षण टिपणे आणि बोटाने कॅमेराचे बटण त्याच शहाणी दाबणे फार गरजेचे असते कारण एखादा सेकंद देखील फार महत्त्वाची गोष्ट किंवा ॲक्शन मिस करू शकते. खाली काढलेले बरे च फोटो या प्रकारात काढलेले आहेत. 

लोकांना वाटते फ्लॅश ही अंधारात वापरण्याची गोष्ट आहे परंतु ते पूर्णत चुकीचे आहे. फ्लॅश आणि जास्तीचा लाईट नेहमी दिवसाढवळ्या उजेडा मध्ये वरून असतानाच सगळ्यात जास्त उपयोगाला येतो. अर्थात या गोष्टी कमी शब्दात येथे समजावून सांगू शकणार नाही की...... का आणि कसे?

खालील फोटोंचा आस्वाद घ्या व काही सुधारणा सुचवायचे असल्या तरी त्या देखील नक्की सांगा. कारण कोणताही फोटो बरोबर आणि चुकीचा नसतो परंतु प्रत्येक जणांची बघण्याची दृष्टी वेगळी असल्याने छोट्या सूचना देखील अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. 

#mayurthelonewolf

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

PF चे फायदे


*१. कर फायदा -*

कर्मचाऱ्याच्या पगारातून ईपीएफ कपात करण्यात आलेली रक्कम म्हणजेच कर्मचाऱ्यांचे योगदान कलम ८० सी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे.

जोपर्यंत कर्मचारी नोकरी करत असतो तोपर्यंत त्याच्या पगारामधून ईपीएफ कपात होत राहते. नोकरी सोडल्यावर अथवा बदल झाल्यांनतर ईपीएफ खाते ट्रान्सफर करणे किंवा ते बंदकरता येते व त्या तारखेपर्यंतची सर्व रक्कम व्याजासह कर्मचाऱ्याच्या मिळते. ही रक्कम करमुक्त असते.

*२. वेळेवर पैसे काढण्याचा पर्याय -*

● ईपीएफओ खात्याचा वापर बँक खात्याच्या रूपात वापर करता येत नसला तरी, वैद्यकीय उपचारांसह, गृह कर्ज परतफेड आणि शैक्षणिक खर्च यासारख्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी ठराविक कालमर्यादेंतर (५ ते १० वर्षे) आंशिक पैसे काढण्याची सुविधा आहे.

● उदाहरणार्थ, सात वर्षानंतर ईपीएफमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या ५०% पर्यंत रक्कम विवाह किंवा शैक्षणिक खर्चासाठी पैसे काढता येऊ शकतात.

*३. विमा लाभ -*

● एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इंश्युरन्स स्कीम (EDLI), द्वारा विमा स्वंरक्षण कर्मचारी भविष्य निधीला दिले जाते.

● सेवा कालावधी दरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, नोंदणी केलेल्या नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाते.

● कोणताही ईपीएफ खातेधारक या योजनेसाठी पात्र ठरतो. त्याला त्यामध्ये कोणतेही योगदान करण्याची आवश्यकता नाही.

*४. दीर्घकालीन गुंतवणूक -*

● प्रतिमाह भरण्यात येणारी रक्कम आणि पैसे काढण्यासाठी असणारे काळाचे निर्बंध यामुळे ईपीएफमध्ये गुंतवलेली रक्कम एकप्रकारे दीर्घकालीन गुंतवणूक असते.

● तसेच, यावर मिळणारे व्याजदेखील चांगले असल्यामुळे यामधून एकरकमी चांगला परतावा मिळतो.

● एकप्रकारे ही आपल्या भविष्याची साठवणूक किंवा तरतूद असते.

*५ . निवृत्तीवेतन योजना -*

● ईपीएफ योजना निवृत्तीवेतन योजना म्हणून देखील वापरली जाते, कारण नियोक्त्याच्या १२% पैकी ८.३३% भविष्य निर्वाह निधी पेन्शन योजनेसाठी (ईपीएस) वापरले जातात.

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

दोन महापुरुषांची भेट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या भेटीचे प्रसंग

प्रसंग पहिला -

ही घटना १४ जुलै १९४९ रोजी दादार येथे घडलेली आहे. गाडगेबाबांना पंढरपूर येथील चोखामेळा धर्मशाळा डॉ.बाबासाहेबांकडे सोपवायची होती. परंतु त्यावेळी गाडगेबाबांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे कागदपत्रे पूर्ण होऊनही बाबासाहेबांना देणे शक्य होत नव्हते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी भारताचे कायदेमंत्री होते. त्याचप्रमाणे ते भारताचे संविधान लिहिण्यात व्यग्र होते. त्यांना मुंबईहून दिल्लीला सायंकाळी जायचे होते. त्याचवेळी गाडगेबाबांचे सहकारे महानंद स्वामी डॉ.बाबासाहेबांकडे येऊन म्हणाले की, गाडगेबाबा मुंबईत असून त्यांची तब्येत बरी नाही.
डॉ.बाबासाहेबांनी दिवसभराचे कार्यक्रम रद्द करून तडक गाडगेबाबांना भेटण्यासाठी निघाले. गाडगेबाबा कोणत्याही प्रकारची वस्तू भेट म्हणून स्वीकारीत नव्हते. तरीही
डॉ.बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी दोन घोंगड्या घेतल्या.
डॉ.बाबासाहेब भेटीला आलेत हे समजताच गाडगेबाबा अंथरुणावरुन उठून बसले व म्हणाले, ‘आपण कशाला आले,बाप्पा. आपले एकेक मिनिट लाखमोलाचे. आम्ही फकीर.आपला केवढा अधिकार?’ त्यावर डॉ.बाबासाहेब गहिवरून
आले व म्हणाले, ‘बाबा आमचा अधिकार दोन दिवसाचा.
उद्या खुर्चीवरून उतरलो की आम्ही कोण? आपला अधिकार अजरामर आहे. तो आपण अतिशय कष्ट करून मिळविला आहे .
लोक आपल्याला विनाकारण मानीत
नाहीत. आपण आपली योग्यता कसोटीवर घासून सिद्ध केली आहे. ती योग्यता, तो अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही. 
आपल्याला बरे नाही असे कळताच आपल्या भेटीला धावतच आलो. आपण दुसरे काही स्वीकारणार नाही. म्हणून या दोन घोंगड्या आपणासाठी आणल्या आहेत. 
चोखामेळा धर्मशाळेच्या हस्तांतराची कागदपत्रे आणली आहेत. त्यावर गाडगेबाबांनी अंगठा उमटविला व डॉ.बाबासाहेबांकडे दिलीत. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील व रावबहादुर जगताप हे सुध्दा गाडगेबाबांना भेटण्यासाठी आले होते.

करुणा सागर गौतम बुद्ध


झोपडीतून कण्हण्याचा आवाज येत होता. तो थबकला. आत गेला. आतमध्ये एक अत्यंत कृष म्हातारा अंथरूणात पडून होता...आजारी, खंगलेला. कित्येक दिवसापासून पडला असावा असा? अंगातून वास मारत होता त्याच्या. अंथरूणातच मलमूत्र केल्याने झोपडीत प्रचंड दुर्गंध पसरला होता. त्याच्यासोबत आलेल्यांनी नाकावर हात धरला. हा सरळ जाऊन त्याच्या जवळ बसला, त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला- "आनंदा, जा थोडं पाणी घेऊन ये जा.." आनंद त्वरेने गेला आणि वाडग्यात पाणी घेऊन आला. त्याने त्याला पाण्याने साफ करून घेतलं. त्याच्या जखमांवर झाड-पाला बांधला. थोडी तरतरी आल्यावर म्हाताऱ्याने कष्टाने डोळे उघडून पाहिले, अजूनही अंधारी मारत होती. थरथरत्या ओठांनी तो म्हणाला- "भल्या माणसा, कोण आहेस तू..?" 
मांडीवर घेतलेलं त्याचं डोकं खाली ठेवत तो म्हणाला- "मी तुझ्यासारखाच एक श्रमण आहे मित्रा. लोक मला बुद्ध बोलतात.."
म्हाताऱ्याने हात जोडले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
अपार करूणेने त्या वृद्धाकडे पहात तो उठला. बरोबरच्या भिक्खूंना म्हणाला- "हा वयस्क श्रमण आजारी आहे, त्याच्यातून दुर्गंधी येते म्हणून तुम्ही त्याला असे एकट्याला सोडणे योग्य नाही. गरजूला योग्य त्यावेळी योग्य मदत करणे, आजारी मनुष्याची सेवा करणे हाच तथागतांचा धम्म आहे.."
भिक्खू वरमले. तो संथ पावलं टाकत चालू लागला...अशा असंख्य गरजूंच्या दिशेने...
 फेसबुकवरून संकलित

दोन महापुरुष

प्रसंग दुसरा – प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या चरित्र ग्रंथात

कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांच्याशेजारी गाडगेबाबा,त्यांच्याजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माईसाहेब आंबेडकर असा तो दुर्मिळ फोटो आहे. त्याबाबत माईसाहेबांनी
सांगितलेली ही हकीकत आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी भारताचे कायदेमंत्री व घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. दिल्लीहून परत येतांना गाडगेबाबांच्या मिशनसाठी त्यांनी १०० घोंगड्या घेऊन आले होते. त्यांचा मुक्काम सिद्धार्थ कॉलेजच्या वरच्या
मजल्यावर होता. दुसऱ्या दिवशी गाडगेबाबांना भेटण्यासाठी जाणार असतांना त्यांना कळले की गाडगेबाबांची तब्येत बरी नसून ते जे.जे.हॉस्पिटलमध्ये आहेत. म्हणून त्यांनी ड्रायव्हरला गाडी हॉस्पिटलकडे नेण्यास सांगितली. 
गाडी त्या दिशेने जात असतांना गाडगेबाबा उलट दिशेने झपझप पाउले टाकत फुटपाथवरून येत असल्याचे दिसले.
बाबासाहेबांनी तिथेच गाडी थांबवून गाडगेबाबांना भेटले.
बाबासाहेब म्हणाले, ‘बाबा कुठे निघालात?’ गाडगेबाबा म्हणाले, ‘बाप्पा, तुमच्याकडेच.’ डॉ.बाबासाहेबांनी गाडगेबाबांचा हात हातात घेतला. तेव्हा त्यांना जाणवले की,
गाडगेबाबांच्या अंगात ताप आहे. डॉ.बाबासाहेब त्यांना तसे म्हणाले. 
तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, ‘होय साहेब, तब्येत बरी नाही. तुमच्यासोबत फोटो काढण्यासाठी तुमच्याकडे चाललो होतो. तेथे जवळपास फोटो स्टुडीओ नव्हता. पण
पुढच्या चौकात एम्पायर इमारतीमध्ये कोपर्डेकर यांचा स्टुडिओ होता. त्यावेळी तो फोटो तेथे काढण्यात आला
होता.

असे हे दोन प्रसंग दोन क्रांतिकारकांच्या सहृदय भेटीची
आहेत

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

सिंहच जंगलाचा राजा का?

*I am Inspired..*

जर जंगलाचा विचार केला तर...

1) कोणता प्राणी सगळ्यात मोठा आहे?

उत्तर - *हत्ती*

2) कोणता प्राणी सगळ्यात उंच आहे?

उत्तर - *जिराफ*

3) कोणता प्राणी सगळ्यात चलाख  आहे?

उत्तर - *कोल्हा*

4) कोणता प्राणी सगळ्यात वेगवान आहे?

उत्तर - *चित्ता*

असं असलं तरी *सिंह जंगलाचा राजा आहे.* वरीलपैकी एकही क्वालिटी नसताना सिंह जंगलाचा राजा आहे हे विशेष. असं का बरं? 

*सिंह धैर्यवान आहे. तो कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करतो. तो कशाचीही भीती बाळगत नाही, कधी घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत सिंहाला कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात जास्त जोखीम घेणारा सिंह आहे. सिंहाला विश्वास आहे की, कोणताही प्राणी त्याच्यासाठी अन्न होवू शकतो. सिंह कोणतीही संधी सहजा-सहजी सोडत नाही. तो शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो. वरील गोष्टींचा विचार केला तर आपण सिंहाकडून काय शिकू शकतो.*

आपण वेगवान नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात हुशार नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात स्मार्ट नसलो तरी काही फरक पडत नाही.

मग गरज कशाची आहे? तर तुमच्याकडे धैर्य असले पाहिजे. तुमच्याकडे प्रयत्न करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. तुमचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास असाला हवा. मी हे करू शकतो, हा तीव्र विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक सिंह दडलाय. 

 *तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता.*
  *फक्त गरज आहे ती प्रबळ इच्छाशक्तीची !*

रविवार, १ सप्टेंबर, २०१९

निष्ठा......

निष्ठेचे इमले
क्षणात कोसळले
सत्तेच्या मोहापायी
भले भले नमले....

सुरजकुमार निकाळजे

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

व्‍यवहारज्ञानाचे धडे

एका शहरात दररोज संध्‍याकाळी एक महात्‍मा प्रवचन देत असे. त्‍यांची ख्‍याती एका धान्‍याच्‍या व्‍यापा-यानेही ऐकली होती.

तो आपल्‍या मुलासोबत प्रवचन ऐकण्‍यास आला. प्रवचन सुरु झाल्‍यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते.
काही ज्ञानाच्‍या गोष्‍टी सां‍गत असताना ते म्‍हणाले,

*''या जगात जितके प्राणी आहेत. त्‍या सर्वांमध्‍ये आत्‍मा वावरत असतो.''*

ही गोष्‍ट व्‍यापा-याच्‍या मुलाला हृदयस्‍पर्शी वाटली.
त्‍याने मनोमन हा विचार आचरणात आणण्‍याचा संकल्‍प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्‍हा त्‍याच्‍या वडिलांनी त्‍याला काही वेळ दुकान सांभाळण्‍यास सांगितले. ते स्‍वत: दुस-या कामासाठी बाहेर निघून गेले. त्‍यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्‍य खाऊ लागली. मुलाने त्‍या गायीला हाकलण्‍यासाठी लाकूड उचलले पण त्‍याच्‍या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.
मग भेदभाव का मानायचा?
ती धान्‍य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्‍यापारी तेथे आले त्‍याने गायीला धान्‍य खाताना पाहून मुलाला म्‍हणाले,
'' अरे तुझ्यासमोर ती गाय धान्‍य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्‍यासारखा गप्‍प बसून का आहेस?
आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्‍पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?'' मुलगा म्‍हणाला,'' बाबा, काल तर महाराज म्‍हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्‍ये पण एक जीव पाहिला'' तेव्‍हा व्‍यापारी म्‍हणाले,''मूर्खा, अध्‍यात्‍म आणि व्‍यापार यात गल्‍लत एकसारखे करायची नसते.''

तात्‍पर्य :-
सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्‍यास जीवन सुखदायी होते.

सोमवार, २९ जुलै, २०१९

श्रद्धा

एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वतःला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले.

प्रो. : तर तुझा देवावर विश्वास आहे का ?

वि. : हो निश्चितच सर..

प्रो. : देव हा चांगला आहे?

वि. : हो सर

प्रो. : देव हा सर्व शक्तिमान आहे ?

वि. : हो सर अर्थातच ..

प्रो. : माझा भाऊ कॅन्सरने वारला त्या आधी त्याने देवाची खुप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही ? का देव चांगला नाही?
(सर्व वर्ग शांत झाला).
कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो.'

प्रोफेसर पुढे बोलू लागले.

प्रो. : राक्षस चांगले आहेत ?

वि. : नाही सर ..

प्रो. : कोणी बनवले यांना देवानेच ना.?

वि. : हो सर...

प्रो. : दुष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत?

वि. : नाही सर ..

प्रो. : त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?

वि. : हो सर...

प्रो. : या जगातील आजारपण,अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?'

(विद्यार्थी शांत होता)

प्रोफेसर पुन्हा म्हणाले.

प्रो. : विज्ञान सांगते तुम्हाला ५ ज्ञानेंद्रीय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता. सांग मित्रा तू कधी देवाला पाहीलेस?

वि. : नाही सर ...

प्रो. : कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहिलीस ? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान प्राप्त झाले आहे?

वि. : नाही सर... असे काहीही नाही.

प्रो. : मग निरीक्षणार्थ, परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मग याला तू उत्तर काय देशील?

वि. : मी म्हणेन माझी श्रद्धा आहे.

प्रो. : हो यस, श्रद्धा आणि इथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणुस विचार करणे सोडतो आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो.

वि. : माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का?

प्रो. : अवश्य ...

वि. : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? .

प्रो. : हो आहे ना.

वि. : आणि शीतलता?

प्रो. : हो अर्थातच ...

वि. : नाही सर.. असे काहीच अस्तित्वात नाही.(वर्गात एकदम पिनड्रॉप शांतता झाली) सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शून्य डिग्रीच्या २७३ डिग्री खाली जातो आणि त्या तापमानाला 'नो हीट' तापमान म्हणतो. म्हणजेत उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता.'

(वर्ग लक्षपूर्वक ऐकत होता)

वि. : अंधाराबद्दल काय मत आहे सर आपले.
ते अस्तित्वात आहे ?

प्रो. : हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच ना?

वि. : तुम्ही पुन्हा चुकत आहात. आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे .

प्रो. : कसे काय सिद्ध करुन दाखव.

वि. : जर आपण सृष्टीच्या द्वैत तत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात.

विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्लेशीत करु शकत नाही. ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पारितोषिक देऊन सन्मान करते. जरा विचित्र नाही वाटत? .

विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगमस्त्रोत माहीत नसुनही हे वेडेपणाचे नाही वाटत ...

मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही .. फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु.

सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडांचे वंशज आहोत ..

प्रो. : हो मी मानतो . उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा.

वि. : मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली ? नाही. मीही नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत ....

(सर्व वर्गात हशा पिकला)

सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो .. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहिलाय ... कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ?

प्रो. : वेलss त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल ..
(आता प्रोफेसर हासत होते. पहील्यांदा त्यांना तोडीस तोड कोणीतरी भेटले)

वि. : एक्झॅक्टली .. सर .. देव आणि माणुस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा ...दुर्दैव..म्हणजे श्रद्धेचा अभाव दुसरे काही नाही....

( सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या )
पुढे जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो मने प्रज्वलित केली . करोडो ध्येयवेड्या माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी अग्नी पंख ( 'Wings of Fire' ) दिले .. हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम ...

रविवार, २८ जुलै, २०१९

Quick heal एक जिद्द, चिकाटीची कहाणी

*Quikheal Antivirus चार मालक फक्त १०वी पास...!!*

नाव *कैलास काटकर. गाव मूळचं सातारा जिल्ह्यातलं *रहिमतपूर*.

राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये.

*वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब*

नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं.
*कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच.*

*घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला इंग्लिश मिडीयम शाळेत घातलेलं.*

  *पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसबस रडत खडत दहावी पर्यंत पोहचला.*

*पण दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण.*

तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती.

*वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती.* त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता.

*काही तरी करू असा आत्मविश्वास होता.* दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केली.

एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली, *एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती.*

*कैलासने आयुष्यात कधी  कॅलक्युलेटर बघितलासुद्धा नव्हता.* त्याने तरी अप्लाय केले. नशिबाने *मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली.*

*अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फसेट मशिन अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.*

नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत *स्वतःचा दुरूस्तीच दुकानं सुरु केलं.*  सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला.

त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले.

*एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली, *कोणी तरी सांगितलं तो काॅम्म्यूटर आहे,*

कैलाश विचारात पडला. येणार युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे.

*पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.*
*नव्वदच्या दशकातला तो काळ.*

कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता.

त्याच्या येण्यान आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या.

कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे.

*कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.*

*एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं  ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने कैलाश तिथे आले होते. त्यांनी पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले.*

*टाईम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर  कैलाशच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला.*

*कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाच बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या.*

पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झालं.

*स्वतःच शिक्षण अर्धवट सुटल पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही.*

धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी *मॉडर्न कॉलेजमध्ये* कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेजकरून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.

*त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात.*

*मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषध यालाच म्हणतात अँटी व्हायरस.*

या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे.

*लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात काय करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे.*

त्यांच्या धाकट्या भावाने संजयने *सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.*

*त्याच वेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार.*

त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला.

*दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. *त्याला नाव देण्यात आलं "Quick heal"*
*संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला,* पकेजिंग तयार केलं.

कैलास काटकर कंपन्याच्या दारोदारी फिरून आपल प्रोडक्ट खपवू लागले.

*कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असण किती गरजेचे आहे हे पटवून संगे पर्यंत त्यांना नाकीनऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.*

त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटीपार्क उभं राहत होत.

*अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं.*

*क्विक हिल अँटी व्हायरस* बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.
अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले.

*पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली.*

*मंगळवर पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुट च्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले कळले देखील नाही.*

*तिथ तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस*
*उघडलेले आहेत.*

*आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस बसवेल दिसेल.*

*आणि*

*हे सगळ साम्राज्य उभ केलंय एका दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं.*
            👍👍