एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ९ जुलै, २०२०

ग्राम पंचायत विषयी माहिती

*🏡 ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती ----*

➡ कायदा - १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

➡ लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :
६०० ते १५०० - ७ सभासद
१५०१ ते ३००० - ९ सभासद
३००१ ते ४५०० - ११ सभासद
४५०१ ते ६००० - १३ सभासद
६००१ ते ७५०० - १५ सभासद
७५०१ त्यापेक्षा जास्त - १७ सभासद

➡ निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

➡ कार्यकाल - ५ वर्ष

➡ विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.

➡ आरक्षण :
👉 महिलांना - ५०%
👉 अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात
👉 इतर मागासवर्ग - २७% (महिला ५०%)

*➡ ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :*
👉 तो भारताचा नागरिक असावा.
👉 त्याला २१ वर्ष पूर्ण झालेली असावीत.
👉 त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.

*➡ ग्रामपंचायतीचे विसर्जन :*
विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

*➡ सरपंच व उपसरपंच यांची निवड :*
निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

*➡ सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल :*
५ वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.

*➡ राजीनामा :*
👉 सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.
👉 उपसरपंच - सरपंचाकडे

*➡ निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :*
सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी १५ दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.

*➡ अविश्वासाचा ठराव :*
👉 सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून ६ महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून १ वर्षापर्यंत मांडता येत नाही.

👉 बैठक : एका वर्षात १२ बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)
👉 अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच
👉 तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.
👉 अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.
👉 आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.
_________________________
*➡ ग्रामसेवक / सचिव :*
निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.
नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी.
नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी.
कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-३ चा.

*➡ कामे :*
👉 ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
👉 ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
👉 कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.
👉 ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.
👉 व्हिलेज फंड सांभाळणे.
👉 ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
👉 ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.
👉 गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.
👉 जन्म-मृत्यूची नोंद करणे.

*➡ ग्रामपंचातीची कामे व विषय :*
कृषी
समाज कल्याण
जलसिंचन
ग्राम संरक्षण
इमारत व दळणवळण
सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा
सामान्य प्रशासन

👉 ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

👉 बैठक : आर्थिक वर्षात (२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोंबर)

👉 सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

👉 अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच

👉 ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या १५% सभासद किंवा एकूण १०० व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.
____________________________

*📑 ग्रामपंचायतींची कार्ये 🗒*

१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन.

२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे.

३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.

४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास.

५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा.

६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने.

७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे.

८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे.
_______________________________

*✔आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.*

👉 गाव नमुना नंबर - १ - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.

👉 गाव नमुना नंबर - १ अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

👉 गाव नमुना नंबर - १ ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - १ क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.

👉 गाव नमुना नंबर - १ ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - १ इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - २ - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ३ - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.

👉 गाव नमुना नंबर - ४ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ५ - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ६ - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ६ अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ६ क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ६ ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ७ - (७/१२ उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ७ अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ८ अ - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ८ ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ९ अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - १० - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - ११ - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - १२ व १५ - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - १३ - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - १४ - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - १६ - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - १७ - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - १८ - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

👉 गाव नमुना नंबर - १९ - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - २० - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

👉 गाव नमुना नंबर - २१ - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते .

बुधवार, २४ जून, २०२०

बुधवार, ११ मार्च, २०२०

गझल विषयी संग्रहित माहिती

गझल एक वृत्तप्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक काव्यप्रकार व गायनप्रकारही आहे. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या सुगम गायनप्रकाराचा समावेश होतो. 

प्राचीन इराणमधील (पर्शियामधील) या प्रेमगीताचा प्रकार भारतात सूफी संतांच्यामुळे रुजला. ईश्वर-भक्ताचे नाते प्रियकर-प्रेयसीमधील संबंधाच्या परिभाषेत स्पष्ट करणाऱ्या या संतांनी आपली प्रार्थनागीते गझल या काव्यप्रकारात रचली आणि त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय रागतालांचा उपयोग केला. भारतातील संगीतपरंपरा आणि संगीत निषिद्ध मानणाऱ्या इस्लामचा विजय या दोन्हींचा परिपाक म्हणजे हा गायनप्रकार होय, तेराव्या शतकातील सूफी संत ⇨ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती  व खल्जी आणि तुघलक साम्राज्यांचा राजकवी ⇨अमीर खुसरौ  यांच्यामुळे पुढे हा प्रकार फोफावला. अनेक मोगल बादशहांनीही पुढे या प्रकारास राजाश्रय दिला. शेवटचा मोगल बादशहा बहादूरशाह जफर याच्या पदरी ⇨गालिब  व जौक हे प्रसिद्ध गझलरचनाकार शायर असून स्वतः जफर एक प्रसिद्ध शायर होता.

गझल हा एक वृत्ताचाकाव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझल हा प्रकार प्राचीन असून, अरबी काव्यात ह्या प्रकाराचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापनेअगोदरचा आहे.[१]

गझलेमधे साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा शेर असते. शेरामधील ओळींना मिसरह असे म्हणतात.

गझलेतला प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.[२]गझलाचे अनेक चरण असून दर दोन चरणांच्या प्रत्येक खंडास ‘शेर’ म्हणतात. एका गझलात कमीत कमी पाच व अधिकात अधिक सतरा शेर असतात. पण यासंबंधी कोणताही काटेकोर नियम नसतो. शेरातील दोन सारख्या चरणांना मिळून ‘मिसरा’ म्हणतात. शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना ‘रदीफ’ म्हणतात. यांचे यमकाशी साम्य आहे. या रदीफच्या आधी येणाऱ्या व सारखे ध्वनी असणाऱ्या शब्दांना ‘काफिया’ म्हणतात. यांचे अनुप्रासांशी साम्य आहे. ज्या शेराच्या दोन्ही मिसरांमध्ये रदीफ आणि काफिया सारखे असतात, त्या शेरास ‘मतला’ म्हणतात. गझलाच्या आरंभी बहुधा मतला असतोच.गझलाच्या पहिल्या शेरास ‘स्थायी’ म्हणतात. उरलेल्या सर्व शेरांना ‘अंतरे’ म्हणतात. बहुधा सर्व अंतऱ्यांची चाल सारखी असते. ज्या रागांत ⇨ठुमरी  व ⇨टप्पा हे गायनप्रकार आविष्कृत होतात, त्यांचाच उपयोग गझलांच्या बाबतीतही बहुधा केला जातो. अर्थात रागविस्तार वा रागाची शास्त्रोक्तता यांवर भर नसतो. गझलाबरोबरचा ठेका दुसऱ्या शेरापासून किंवा पहिल्या शेराच्या चरणार्धापासून सुरू होतो. दादरा, रूपक, केरवा, पुश्तो हे ताल बहुधा वापरले जातात. पहिला शेर विलंबित लयीत आणि बाकीचे मध्य लयीत गायले जातात. 


शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

PPF म्हणजे काय? योजनेचे फायदे व तोटे

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी किंवा Public Provident Fund (PPF):

  • ही योजना भारत सरकारने १९६८ मध्ये सुरू केली होती. ही एक बचत ठेव योजना आहे.
  • या योजनेद्वारे आपण आपले पैसे बचत म्हणून सरकारकडे जमा करतो आणि योजनेचा कालावधी संपल्यावर सरकार आपले पैसे व्याजासहित परत करते.
  • या योजनेमागचा सरकारचा मुख्य उद्देश लोकांमध्ये बचतीची सवय वाढवणे हा आहे.
  • या योजनेसाठीचे आपले खाते आपण जवळचे पोस्ट ऑफिस, भारतीय स्टेट बँक वा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये सुरू करू शकतो.

योजनेची वैशिष्ट्ये:-

  • या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य असे की ही एक कर बचत योजना आहे. अर्थात या योजनेद्वारे आपण आपली वार्षिक करपात्र उत्पन्नाची रक्कम कमी करू शकतो. कलम ८० सी अंतर्गत या योजनेतील आपली वार्षिक रक्कम आपल्या वार्षिक करपात्र उत्पन्नातून वगळली जाते.
  • शिवाय या योजनेतून मिळणारा परतावा सुद्धा पूर्णपणे करमुक्त असतो.
  • मिळणारे व्याज व हाती येणारी एकूण रक्कमही पूर्णपणे करमुक्त असते. मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस (TDS) सुद्धा कापला जात नाही.

आवश्यक कागदपत्रे:-

या योजने अंतर्गत खाते सुरू करण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात. व्यक्तीची सामान्यतः सर्व माहिती , ओळख – पत्ता याविषयी , देणारे पुरावे लागतात.

  • सामान्य केवायसी (KYC)
  • पॅन कार्ड
  • पत्त्याचा कोणताही एक पुरावा
  • १ फोटो
  • बँक खात्याचे तपशील

योजनेचे नियम व अटी:-

  • या योजनेचा पूर्ण कालावधी १५ वर्षे असतो. खर्चासाठी हवे म्हणून १५ वर्षाच्या आत या योजनेतील रक्कम आपण काढून घेऊ शकत नाही. हा कालावधी संपूर्णतः लॉक इन कालावधी (lock in period) असतो.
  • मात्र योजनेची ३ वर्षे पूर्ण झाल्यावर आपण त्या जमा रकमेवर कर्ज घेऊ शकतो.
  • या योजनेमध्ये आपण किमान ५०० ते कमाल १.५ लाख रुपये  वार्षिक गुंतवणूक करू शकतो. याचा अर्थ एका वर्षात रु ५०० ते १.५ लाख यापैकी आपल्या सोयीने एक रक्कम ठरवून ती प्रत्येक वर्षी जमा करायची.
  • ही वार्षिक रक्कम आपण वर्षातून एकदा एकाच वेळी किंवा प्रत्येक महिन्याला अशी १२ हप्त्यात भरू शकतो.

योजनेतील व्याजदर

  • या योजनेत साधारण बँक बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर मिळतो.
  • प्रत्येक ३ महिन्यांनी सरकार यातील व्याजदराचा आढावा घेते.
  • सध्या १.१.२०१९ पासून लागू असलेला व्याजदर वार्षिक ८% आहे.

परतावा: एका दृष्टिक्षेप

या योजनेतून मिळणाऱ्या परताव्याचे उदाहरण पाहू.

रु ५०० ते १.५ लाख मधील कोणतीही रक्कम आपण वार्षिक हप्ता म्हणून निवडू शकतो. १५ वर्षांनंतर आपली १५ वर्षांतील जमा रक्कम आणि त्यावर मिळालेले व्याज असे दोन्ही मिळून आपला एकूण परतावा असतो.

वार्षिक रक्कम(रु)

कालावधी (वर्षे)व्याजदर (%)एकूण परतावा(रु)
१०, ०००१५८%२,९३,२४२
२५,०००१५८%७,३३,१०७
५०,०००१५८%१४,६६,२१४
१,००,०००१५८%२९,३२,४२९
१,५०,०००१५८%४३,९८,६४३

पीपीफ योजनेचे फायदे/तोटे:

  • पोस्ट ऑफिसची  पीपीएफ योजना ही कर सवलतीस पात्र आहे, तसेच निश्चित परतावाही देते.
  • ही सरकारची योजना असल्यामुळे या गुंतवणुकीमध्ये कोणताही धोका नाही. त्यामुळे यात पैसे गुंतवणे फायद्याचे आहे.
  • याचा व्याजदर मात्र  पंधरा वर्षांच्या लॉकिंग पिरेडच्या मानाने कमी वाटू शकतो. यामुळे ज्याला जास्त रिटर्न्स हवे आहेत त्यांना पीपीएफ योजना रुचेलंच असं नाही.
  • गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित केलेली असल्यामुळे त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही.


मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

लक्ष्मीची पाऊले

लहानशी गोष्ट आहे. रात्री साडेनऊचा सुमार, एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपीकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार, तसाच  होता तो, बोलण्यात गावाकडचा लहेजा तरीही काॅन्फीडन्ट. बावीस-तेवीस वर्षांचा असेल. दुकानदाराच लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पाॅलीश केलेले..!

*दुकानदार* - काय सेवा करू..?

*मुलगा* - माझ्या आईला चप्पल हवीय. टिकाऊ पाहिजे..!

*दुकानदार )* - त्या आल्या आहेत का..? त्यांच्या पायाचं माप..?

मुलाने आपलं वाॅलेट बाहेर काढलं. त्यात चार घड्या केलेला एक कागद होता. त्या कागदावर पेनानं आऊटलाईन काढलेली दोन पावलं होती. 

*दुकानदार* - अरे, मला मापाचा नंबर चालला असता..!

तसा तो मुलगा एकदम बांध फुटल्यासारखं बोलता झाला 'काय माप सांगू साहेब..?
माझ्या आयनं जिंदगीभर पायात कदी चप्पलच घातली नाय. आई ऊसतोड कामगार होती. काट्याकुट्यात कुटं बी जात्ये. अनवानी ढोरावानी मेहनत केली. मला शिकवलं. मी शिकलो अन् नोकरीला लागलो. आज पहिला पगार झालायं. दिवाळीला गावाकडं चाललोय. आईला काय नेऊ..? हा सवालच पैदा होत नाही. माझे किती वर्षांच स्वप्न होते. पहिल्या पगारातून आईला चपला घेऊन जायच्या.'

दुकानदारान चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या. आठशे रूपये किंमत होती. त्या पाहून मुलाने 'चालतंय की..!,' असे सांगितले. त्याची तयारी त्याने केली होती.

दुकानदाराने सहज विचारले, 'किती पगार आहे रे तुला..?

*मुलगा* - सध्याच्याला बारा हजार आहे. राहणे, खाणे धरून सात-आठ हजार खर्च होतात. दोन तीन- हजार आईला धाडतो..!

*दुकानदार* - अरे मग आठशे रूपये जरा जास्त होतात. 

मुलाने दुकानदाराला मध्येच रोखत असुद्या म्हणून सांगितले.दुकानदाराने बाॅक्स पॅक केला. मुलाने त्याला पैसे दिले आणि तो आनंदात बाहेर निघाला. एवढी महागाची भेट किंमत करताच येणार नव्हती त्या चपलांची...!

पण दुकानदाराच्या मनात नेमके काय आले कुणास ठाऊक. मुलाला, जरा थांब असे सांगितले. दुकानदाराने अजून एक बाॅक्स मुलाच्या हातात दिला.

दुकानदार म्हणाला, 'ही चप्पल आईला तुझ्या या भावाकडून गिफ्ट असे सांग. पहिली खराब झाली की दुसरी वापरायची. तुझ्या आईला सांग आता अनवाणी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही.'

दुकानदाराचे आणि त्या मुलाचे असे दोघांचेही डोळे भरून आले. 'काय नाव तुझ्या आईचं..?,' असे  दुकानदाराने विचारलं तर तो *लक्ष्मी* असे ऊत्तरला.

दुकानदार लगेचच बोलला, 'माझा नमस्कार सांग त्यांना आणि एक वस्तू देशील मला..? पावलांची आऊटलाईन काढलेला तो कागद हवाय मला...!

तो मुलगा कागद दुकानदाराच्या हातात ठेऊन आनंदात निघून गेला. तो घडीदार कागद दुकानदाराने  दुकानाच्या देव्हाऱ्यात ठेवला. दुकानातील देव्हाऱ्यातला तो कागद दुकानदाराच्या लेकीनं बघितला आणि तिनं विचारलं, 'काय आहे हे बाबा..!

दुकानदार दिर्घ श्वास घेऊन आपल्या लेकीला बोलला *लक्ष्मीची पावलं'* आहेत बेटा...!. एका सच्च्या भक्ताने काढली आहेत. त्यानं बरकत येते धंद्याला..!. लेकीनं, दुकानदाराने आणि सगळ्यांनीच मनोभावे त्या पावलांना नमस्कार केला..!
🌹🙏आई साठी🌹🙏 ( कोणी लिहिली माहीत नाही आवडली म्हणून सामाईक केली)