एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, १७ जून, २०१९

कर्माची ताकद

🐟  एकदा एका जंगलात एक माणूस मासा पकडायला तलावाजवळ जातो. तासन् तास बसून आणि प्रयत्न करून देखील त्याला मासा मिळत नाही आणि जेव्हा मासा मिळतो. तेव्हा एक माणूस येऊन त्या माणसाला धक्का मारून तो मासा त्याच्याकडून हिसकावून घेतो.

👆 तेव्हा अर्धमेला मासा त्याच्या बोटाचा चावा घेतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्याला बोट कापायला सांगतात कारण जखम वाढलेली असते.

💪 बोट कापल्यानंतर निराश होऊन तो घरी येतो मात्र त्याला याचं समाधान असतं कि, आपल्याला आता बरं वाटेल. मात्र जखम पुन्हा वाढते आणि त्याला पर्यायाने हात कापावा लागतो.

👱‍♂ त्याचा मित्र त्याला भेटायला येतो आणि त्याला विचारतो कि, "तुझ्या हातून काही दुष्कर्म झाले आहे का?" तेव्हा त्याला त्याने केलेल्या चुकीच्या कृत्याची जाणीव होते.

🙏 तुटलेला हात घेऊन तो तसाच जंगलातल्या माणसाला भेटायला जातो. तो माणूस भेटल्यावर हा तसाच त्याला लोटांगण घालून विचारतो, " तू, मी तुझा मासा हिसकावल्यावर वर पाहून का हसलास?"

👀 त्यावर तो उत्तरतो, " मला कर्माची ताकद माहित आहे. तू मला तुझी ताकद दाखवली, तुला कर्माची ताकद कळावी हीच प्रार्थना मी देवाकडे केली."

सांगायचे तात्पर्य असे कि, दुसऱ्यांची कुठलीही गोष्ट ओरबाडून घेऊन आपण सुखी होऊ शकत नाही. कर्म आपल्याला आपली जागा दाखवतेच

मंगळवार, ४ जून, २०१९

बाप

एक छोटीशी गोष्ट एका पित्याने अापल्या मुलीचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. खूप चांगल्या प्रकारे तिचे शिक्षण केलं... जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल....... काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली. आणि एका मल्टी नैशनल कंपनीची सी.ई.ओ. झाली. उच्च पद ,भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा तिला कंपनीकडून प्रदान झाल्या होत्या. एके दिवशी असाच तिचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला तिला मुलंही झाली. तिचा आता आपला सुखी परिवार बनला. वडील म्हातारे होत चालले होते. एक दिवस वडीलांना आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली.. आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिस मध्ये गेले. त्यांनी बघितलं की मुलगी एका मोठ्या व शानदार ऑफिसची अधिकारी बनलीय. तिच्या ऑफिसात हजारो कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत आहेत. हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली. ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिन मध्ये गेले. व तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलीला विचारलं की..... "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे ? मुलगी स्मित हास्य करत, आत्मविश्वासाने म्हणाली. "माझ्याशिवाय कोण असू शकतं बाबा ?" वडीलांना तिच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यांना विश्वास होता की, त्यांची मुलगी गर्वाने म्हणेल की,,,,, " बाबा, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात. ज्यांनी मला एवढ्या योग्यतेचं बनवलं. या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले. पण न राहून त्यांनी परत एकदा वळून मुलीला विचारलं की,,,, परत सांग "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "? मुलगी ह्या वेळेस म्हणाली की,,,, "बाबा, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती!" वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले.. व ते म्हणाले,,,, अगं, आताच तर तू स्वतःला जगातली सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतीस.... आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगते आहेस ?" मुलगी हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलली,,, "बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता. ज्या मुलीच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल. तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना? हो की नाही बाबा!" वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली.".... खरंच आहे की,,,,,, ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल....ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते. आपल्या प्रगती व उन्नतीने फक्त "आई-वडीलच " आपल्या प्रगतीवर खुश असतात......