एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

एक काळा ठिपका

🌷एक काळा ठिपका.

कॉलेजमधील एका प्राध्यापकाने एके दिवशी वर्गावर आल्यावर अचानक जाहीर केले की., "आज मी तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे."
असे म्हणून प्राध्यापकाने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पत्रिका दिली. ती हातात पडताच जवळपास सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. काहीजण तर पूर्ण बावचळून गेले. कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरी होती. कसलेच प्रश्न त्यावर नव्हते. फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता.
प्राध्यापक म्हणाले, "आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्हाला पेपरवर जे काही दिसतंय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत."
मुलांनी मग जमेल तसे उत्तर लिहिले. सगळ्याचे लिहून झाल्यावर प्राध्यापकाने पेपर गोळा केले आणि एकेकाची उत्तर पत्रिका मोठ्याने वाचायला सुरुवात केली. कुणी लिहिले होते, तो ठिपका म्हणजे मी आहे, माझे जीवन आहे, तर कुणी भौगोलिक रित्या लिहिले होते की, पेपरच्या मध्यभागी एक काळा ठिपका आहे. त्याचा व्यास अमुक तमुक मिलीमीटर असावा
वगैरे वगैरे !
सगळे झाल्यावर प्राध्यापक म्हणाले, "दुर्दैवाने तुम्ही सर्वजण नापास झालेला आहात."
सर्वजण दचकले. मग प्राध्यापक सांगू लागले.
"सर्वांनी एकाच दिशेने विचार केला आहे.सर्वांचा फोकस त्या काळ्या ठिपक्यावरच होता. ठिपक्या भोवती खूप मोठा"पांढरा" पेपर आहे हे मात्र कुणीच लिहिले नाही आणि आपल्या जीवनात देखीलअसेच होते.आपल्याला खरेतर जीवनरुपी खूप मोठा पांढरा पेपर मिळालेला असतो.ज्यात आनंदाचे रंग किंवा शब्द भरायचे असतात. पण आपण ते न करता केवळ काळ्या ठिपक्या कडे पाहतो. जीवनातल्या अडचणी, मित्र मैत्रिणी सोबतचे वाद गैरसमज, घरातील विसंवाद हे सगळे ते काळे ठिपके असतात. आपण त्यावर फोकस करतो आणि "खूप मोठा पांढरा" पेपर हातात आहे याकडे दुर्लक्ष करतो. खरेतर एकूण पांढरया पेपरच्या आकारापेक्षा तो काळा ठिपका तुलनेने खूप लहान असतो. पण तरी आपण त्यातच गुंतून पडतो. आणि मोठा पांढरा भाग दुर्लीक्षित राहतो. म्हणून यापुढे एक लक्षात ठेवा. काळा ठिपका न पाहता पांढरा पेपर पाहायला शिका.खूप समाधानी व्हाल.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८

संधीचं सोनं ..


एका आटपाट नगरीच्या राजाने आपल्या एकुलत्या एक लावण्यवती मुलीच्या लग्नाचे स्वयंवर ठेवले, राज्यात तशी दवंडी पिटवली....
स्वयंवरासाठी एक जाचक अट ठेवली... *एका दरवाज्यातून पिसाळलेला बैल सोडण्यात येईल अन २० फुटावर असलेल्या दरवाजातून तो बाहेर पळत जाईल.. या बैलाच्या शेपटीला धरून जो तो दरवाजा पार करेल त्याच्याशी राजकन्येचे लग्न लावून त्याला बक्षीस म्हणून अर्धे राज्य दिले जाईल ! प्रत्येकाला ३ वेळा संधी देण्यात येईल !*
मग काय ! अनेक तरुण इच्छुक झाले...! सराव सुरू झाले.. राज्यभरातील तरुण कामाला लागले.. मेहनत घेऊ लागले... रात्री स्वप्न रंगवू लागले....
साहजिकच होते ना त्यांचे.. फक्त २० फुटाचे अंतर निर्भयपणे, हिमतीने पार केले की सुंदर राजकन्या अन अर्धे राज्य मिळणार होते !
स्वयंवराचा दिवस उगवला .....
सर्व जनता जमा झाली... पहिल्या दरवाजातून बैल डोकावला...! त्याला पाहताक्षणीच तरुणांचा थरकाप उडाला .. साधासुधा बैल नव्हता तो .. अगदी जंगली सांड होता अन त्यात पिसाळलेला...! सर्व तरुण दोन पाऊल मागे सरकले !
पण एक तरुण जिद्दीला पेटला... पुढे होऊन मैदानात उतरला.... पहिला बैल सोडण्याची घोषणा झाली......
त्याच्याकडे पाहून त्याने मनात विचार केला की तीन संधी आहेतच याला जाऊ द्या ! याचे फक्त अवलोकन करू.... बैल उधळला अन तसाच पुढे निघून गेला..!
दुसरा बैल सोडण्याची घोषणा झाली.... पहिल्या बैलापेक्षा हा बलदंड होता... त्याला पाहून याचे अवसान गळायला लागले... बैल उधळला पण आणखी एक संधी आहे म्हणून हा जाग्यावरच स्थिर राहिला ...!
आता मात्र शेवटची संधी होती... *मेलो तरी बेहत्तर पण मी ही संधी सोडणार नाही !* याची त्याने मनोमन गाठ मारली...!
तिसरा बैल घोषणा होताच उधळला, तरुणाने जीवाचा आकांत करून आपल्या ध्येयाच्या दिशेने झेपावला...…... पण याचे नशीब करंटे .....
'तिसऱ्या बैलाला शेपुटच नव्हते !'
राजाने स्पष्टीकरण देत सांगितले, *संधी दोन वेळ तुझ्याकडे चालून आली अन तू तिचे सोने न करता तिसऱ्या संधीची वाट पहात होतास पण तिसऱ्या वेळेस संधीने तुला हुलकावणी दिली.....
संधीचे सोने करणाराच या जगात यशस्वी होतो !