एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, २९ जुलै, २०१९

श्रद्धा

एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वतःला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले.

प्रो. : तर तुझा देवावर विश्वास आहे का ?

वि. : हो निश्चितच सर..

प्रो. : देव हा चांगला आहे?

वि. : हो सर

प्रो. : देव हा सर्व शक्तिमान आहे ?

वि. : हो सर अर्थातच ..

प्रो. : माझा भाऊ कॅन्सरने वारला त्या आधी त्याने देवाची खुप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही ? का देव चांगला नाही?
(सर्व वर्ग शांत झाला).
कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो.'

प्रोफेसर पुढे बोलू लागले.

प्रो. : राक्षस चांगले आहेत ?

वि. : नाही सर ..

प्रो. : कोणी बनवले यांना देवानेच ना.?

वि. : हो सर...

प्रो. : दुष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत?

वि. : नाही सर ..

प्रो. : त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?

वि. : हो सर...

प्रो. : या जगातील आजारपण,अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?'

(विद्यार्थी शांत होता)

प्रोफेसर पुन्हा म्हणाले.

प्रो. : विज्ञान सांगते तुम्हाला ५ ज्ञानेंद्रीय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता. सांग मित्रा तू कधी देवाला पाहीलेस?

वि. : नाही सर ...

प्रो. : कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहिलीस ? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान प्राप्त झाले आहे?

वि. : नाही सर... असे काहीही नाही.

प्रो. : मग निरीक्षणार्थ, परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मग याला तू उत्तर काय देशील?

वि. : मी म्हणेन माझी श्रद्धा आहे.

प्रो. : हो यस, श्रद्धा आणि इथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणुस विचार करणे सोडतो आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो.

वि. : माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का?

प्रो. : अवश्य ...

वि. : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? .

प्रो. : हो आहे ना.

वि. : आणि शीतलता?

प्रो. : हो अर्थातच ...

वि. : नाही सर.. असे काहीच अस्तित्वात नाही.(वर्गात एकदम पिनड्रॉप शांतता झाली) सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शून्य डिग्रीच्या २७३ डिग्री खाली जातो आणि त्या तापमानाला 'नो हीट' तापमान म्हणतो. म्हणजेत उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता.'

(वर्ग लक्षपूर्वक ऐकत होता)

वि. : अंधाराबद्दल काय मत आहे सर आपले.
ते अस्तित्वात आहे ?

प्रो. : हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच ना?

वि. : तुम्ही पुन्हा चुकत आहात. आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे .

प्रो. : कसे काय सिद्ध करुन दाखव.

वि. : जर आपण सृष्टीच्या द्वैत तत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात.

विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्लेशीत करु शकत नाही. ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पारितोषिक देऊन सन्मान करते. जरा विचित्र नाही वाटत? .

विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगमस्त्रोत माहीत नसुनही हे वेडेपणाचे नाही वाटत ...

मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही .. फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु.

सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडांचे वंशज आहोत ..

प्रो. : हो मी मानतो . उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा.

वि. : मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली ? नाही. मीही नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत ....

(सर्व वर्गात हशा पिकला)

सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो .. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहिलाय ... कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ?

प्रो. : वेलss त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल ..
(आता प्रोफेसर हासत होते. पहील्यांदा त्यांना तोडीस तोड कोणीतरी भेटले)

वि. : एक्झॅक्टली .. सर .. देव आणि माणुस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा ...दुर्दैव..म्हणजे श्रद्धेचा अभाव दुसरे काही नाही....

( सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या )
पुढे जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो मने प्रज्वलित केली . करोडो ध्येयवेड्या माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी अग्नी पंख ( 'Wings of Fire' ) दिले .. हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम ...

रविवार, २८ जुलै, २०१९

Quick heal एक जिद्द, चिकाटीची कहाणी

*Quikheal Antivirus चार मालक फक्त १०वी पास...!!*

नाव *कैलास काटकर. गाव मूळचं सातारा जिल्ह्यातलं *रहिमतपूर*.

राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये.

*वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब*

नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं.
*कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच.*

*घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला इंग्लिश मिडीयम शाळेत घातलेलं.*

  *पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसबस रडत खडत दहावी पर्यंत पोहचला.*

*पण दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण.*

तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती.

*वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती.* त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता.

*काही तरी करू असा आत्मविश्वास होता.* दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केली.

एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली, *एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती.*

*कैलासने आयुष्यात कधी  कॅलक्युलेटर बघितलासुद्धा नव्हता.* त्याने तरी अप्लाय केले. नशिबाने *मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली.*

*अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फसेट मशिन अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.*

नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत *स्वतःचा दुरूस्तीच दुकानं सुरु केलं.*  सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला.

त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले.

*एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली, *कोणी तरी सांगितलं तो काॅम्म्यूटर आहे,*

कैलाश विचारात पडला. येणार युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे.

*पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.*
*नव्वदच्या दशकातला तो काळ.*

कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता.

त्याच्या येण्यान आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या.

कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे.

*कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.*

*एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं  ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने कैलाश तिथे आले होते. त्यांनी पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले.*

*टाईम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर  कैलाशच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला.*

*कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाच बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या.*

पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झालं.

*स्वतःच शिक्षण अर्धवट सुटल पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही.*

धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी *मॉडर्न कॉलेजमध्ये* कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेजकरून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.

*त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात.*

*मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषध यालाच म्हणतात अँटी व्हायरस.*

या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे.

*लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात काय करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे.*

त्यांच्या धाकट्या भावाने संजयने *सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.*

*त्याच वेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार.*

त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला.

*दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. *त्याला नाव देण्यात आलं "Quick heal"*
*संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला,* पकेजिंग तयार केलं.

कैलास काटकर कंपन्याच्या दारोदारी फिरून आपल प्रोडक्ट खपवू लागले.

*कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असण किती गरजेचे आहे हे पटवून संगे पर्यंत त्यांना नाकीनऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.*

त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटीपार्क उभं राहत होत.

*अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं.*

*क्विक हिल अँटी व्हायरस* बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.
अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले.

*पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली.*

*मंगळवर पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुट च्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले कळले देखील नाही.*

*तिथ तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस*
*उघडलेले आहेत.*

*आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस बसवेल दिसेल.*

*आणि*

*हे सगळ साम्राज्य उभ केलंय एका दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं.*
            👍👍

© मोबाईल- एक भयंकर सत्य


दोन दिवसांपूर्वी आमच्या आईच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे MRI करण्यासाठी एका सेंटरवर घेऊन गेलो होतो. पाय कंबरेपासून खूप दुखत असल्याने लवकरात लवकर MRI करण्यासाठी मी विनंती केली आणि लगेच सर्व कार्यालयीन बाबी पूर्ण करून MRI करायला घेणार एवढ्यात एक अँबुलन्स त्या सेंटरवर आली.

अँबुलन्सचा आवाज, डॉक्टरांची धावपळ आणि नातेवाईकांच्या गाड्यांची लगबग बघून अंगावर शहारे आले. कदाचित अक्सिडेंट झालं असावं. नक्की काय झालं होतं ह्याची कल्पना नव्हती. तेवढ्यात पाच ते सहा वर्षाच्या एका मुलाला अँबुलन्समधून बाहेर काढलं. त्याच्या पूर्ण चेहऱ्याला ब्राउनपट्टीने कव्हर केले होते. तोंडातून एक नळी बाहेर काढून त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देत होते. त्या मुलाच्या शरीराची हालचाल अजिबात दिसत नव्हती. बहुतेक तो कुठून तरी पडला असावा आणि चेहऱ्याला खूप मार बसला असावा असं मला वाटलं.  मला पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून डॉक्टरांनी विनंती केली की, आमचा पेशंट एकदम सिरिअस आहे, मेंदूचा MRI करायचा आहे तरी कृपया तुमच्या पेशंटच्या आधी आम्हाला नंबर द्यावा. एकंदर ती सगळी धावपळ आणि रडारड बघून मी लगेच होकार दिला. माझ्यासमोरूनच त्या मुलाला स्ट्रेचरवरून MRI मशीन रूममध्ये नेण्यात आले. त्या मुलाचे वडील माझ्याच वयाचे असल्याने त्यांच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा काहूर मला कळत होता. डोळे पाण्याने भरले होते. त्या मुलाला आतमध्ये नेलं, त्याच्यासोबत डॉक्टर आत गेले आणि त्याचे सगळे नातेवाईक बाहेर बसले. रूमच्या बाहेर मी आमच्या आईच्या बाजूला बसलो होतो, तेव्हा त्याचे वडील माझ्या बाजूला, भिंतीला डोकं टेकून, छताकडे बघत शांत बसले होते. शेवटी मी न राहवून त्या मुलाबद्दल त्यांना विचारले. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन एका क्षणासाठी सरकल्यासारखं मला वाटलं.

सार्थक आमचा एकुलता एक मुलगा. लग्नानंतर पाच वर्षांनी झाला. घरामध्ये त्याचे सगळेजण खूप लाड करतात. काही दिवसांपासून त्याचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता. त्याला पाहिजे ती वस्तू आम्ही लगेच उपलब्ध करून द्यायचो. मोबाईलवर गेम खेळणे, YOU TUBE वर व्हिडीओ क्लिप बघणे हा त्याचा आवडता छंद. मोबाईल हातात दिल्याशिवाय तो जेवतच नाही. काल संध्याकाळी तो शाळेतून आला तेव्हा त्याला खूप मोठी उलटी झाली आणि नंतर त्याला चक्कर आली. आम्ही लगेच त्याला जवळच्या डॉक्टरकडे नेलं. परंतु तो शुद्धीवर येत नसल्याने त्याला आम्हाला इकडे (हॉस्पिटलच नाव मी इथे लिहीत नाही) आणायला सांगितले.  कालपासून ह्याच्यावर उपचार चालू केले आहेत. अजून शुद्धीवर आला नाही. मेंदूचा MRI केल्यावर आजाराच्या अजून जवळ जाता येईल म्हणून आम्ही डॉक्टरांसोबत इथे आलो आहोत. डॉक्टर आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे *"मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूवर परिणाम होऊन तो कोमात गेला आहे."*  हे सगळं ऐकून मला माझ्या डोळ्यासमोर मोबाईलवर खेळणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे डोळ्यासमोर आले.

तिकडून बाहेर पडल्यावर ही सगळी घटना मी माझ्या पत्नीला फोनवर सांगितली आणि आपल्या मुलाबद्दल कशी काळजी घ्यावी हे ठरलं. तीनेसुद्धा आमच्या मुलाला त्या दिवसात अजिबात मोबाईल दिला नाही. हे सगळं बघून शेवटी रात्री माझा मुलगा म्हणाला की, "जर तू मला मोबाईल देत नसशील तर तू माझ्यासोबत खेळ." हे वाक्य साधं आहे पण आईवडिलांना खूप काही शिकवण्यासारखं आहे. आपण आपल्या मुलांना योग्य तो वेळ देत नसल्याने ती मुलं दुसरा आसरा शोधतात आणि तो म्हणजे एकमेव मोबाईल.  हे असं का होतं ह्याच उत्तर मला त्याच रात्री माझ्या 3 वर्षाच्या मुलाकडून मिळालं.

ह्या अश्या जीवघेण्या आजारातून आपल्या मुलांना कसं वाचवायचं हे आता सर्व पालकांच्या हातात आहे, कारण तुम्ही मोबाईल वापरणारे सुज्ञ पालक आहात.

१. आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांच्या सोबत खेळा.

२. मुलांसमोर पालकांनी मोबाईल जास्त वापरू नये.

३. मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणे हे काटेकोरपणे टाळावे.

४. आपल्या लहानपणीचे खेळ त्यांच्यासोबत खेळावे. आपलासुद्धा विरंगुळा होतो. मुलांचा वेळ सत्कारणी लागतो आणि जुने खेळ जतन करता येतात.

५. मुलांना कधीतरी मातीत, उन्हात खेळुद्या. पावसात भिजू द्या. आपण सुद्धा मातीत खेळुन, पावसात भिजूनच मोठे झालोय हे कधी विसरू नये.

६. त्यांना मातीचे किल्ले बनवायला शिकवा.

७. त्यांना पोहायला शिकवा. कॅरम, बुद्दीबळ, सापशिडी, ल्युडो ह्यासारखे खेळ खेळा.

८. आजूबाजूच्या ४-५ मुलांना एकत्र करून आपल्या काळातले जुने खेळ शिकवावे. त्यांना सुदधा आवड निर्माण होते. आपण पण हेच करत करत मोठे झालो हे कधी विसरू नये.

कदाचित हे सर्व करताना आपल्याला कंटाळा येईल पण आपल्या मुलाला कोमात जाण्यापासून वाचवायचे असेल आणि हसतमुख कुटुंब बघायचं असेल तर हे करायलाच पाहिजे. ह्यामधून पालक आणि मुलं ह्यांच नातं अजून घट्ट होते.

शेवटी कमावलेला पैसा तसाच राहतो, आणि आपल्या मुलांना योग्य संस्कार करण्यात आपण कमी पडलो, त्यांना वेळ दिला नाही ह्याचंच आयुष्यभर दुःख मनात घेऊन जगावं लागत.

  -----------------समाप्त---------------

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधिन आहेत. लेखकाच्या नावासहित ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही.
          -------------------🙏🏻-------------------

✍️ श्री. अतिष म्हात्रे
आगरसुरे- अलिबाग
मोबाईल- ९७६९२०९९१९
दि.      २५.०७.२०१९

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

फिनॉलेक्स = एका परखड प्रयत्नांची कहाणी

🏭🏭🏭🏭🏭🏭🏭

*उद्योगपती असेच होता येत नाही*

माणुस पण असाच मोठा होत नसतो. 10 रु. नोकरी ते 10 हजार कोटीं ची उलाढाल.
फिनोलेक्स चे संस्थापक प्रल्हाद परशराम छाब्रिया ऊर्फ PP यांचा थक्क करुण देणारा हा प्रवास. 35 वर्षा पूर्वी कोणाला स्वप्नात पण वाटल नसेल की हा मुलगा 1 दिवस उद्योग क्षेत्रा मधे आपले वर्चस्व निर्माण करुण फाइबर इंडस्ट्री वर राज्य करेल पण हे  शक्य झाल मेहनत चिकाटी आणी प्रयत्नवादा मुळे
      PP हे मुळ चे पाकिस्तान च्या सिंध प्रांतात ले त्यांचे वडिल परशराम छाब्रिया हे तिथील प्रसिद्ध कापड व्यापारी पण 1942 साली  वडिलांच आकस्मित निधन झाल आई 5 बहिणी व 5 भाऊ अस हे कुटुंब उघड्या वर आल. त्या वेळी प्रल्हाद छाब्रिया एका दूरच्या नातेवाईकाचा धागा पकडून पुण्यात आले. त्यावेळी त्यांच वय होत अवघ 12 वर्ष व शिक्षण 2री झालेल शिक्षाण नसल्य मुळे कोणी नोकरी देत नव्हत. शेवटी एका ठिकाणी त्याना सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली  16 ते 18 तास काम करू लागले दर महिना ते आपल्या आईला 30 रु पाठवत होते त्यातच1945 साली फाळणी च्या झळा बसु लागल्या तय मुळे सर्व छाब्रिया कुटुंब पुण्या मधे आले. नारायण पेठेत 2 रूम मिळाल्या. त्यानंतर छाब्रिया बंधुनी मुंबई हुन कापड आणुन कापड विक्रिचा व्यवसाय चालु केला त्या मधे पण कसे तरी 5रू मिळायचे. त्या नंतर इलेक्ट्रोनिक्स च्या वस्तु विकु लागले सरकारी निविदा भरणे चालूच होत. परिस्थिति पण खुप बिकटच होती कधी जेवन मिळत होत तर कधी पाणी पिउन भुक मिटवावी लागत होती.

प्रयत्न मात्र चालुच होते. त्यातच देहु कँटोमेंट बोर्डा ची बेडिंग वायर ची निविदा निघाली आणी तोच छाब्रियां साठी टर्निंग पॉइंट ठरला  हे काम छाब्रियां ना मिळाल व 10 बाय 10 च्या खोलीतून फिनोलेक्स चा प्रवास सुरु झाला तो आज पर्यन्त कधी थांबला च नाही एका छोट्याश्या खोलीतुन सुरु झालेली ह्या कंपनीचे आज सगळ्या भारतभर जाळे पसरले आहे. पुणे, रत्नागिरी , शिरवळ, गोवा, उत्तराखंड अश्या 5 कंपनी व 11 कारखाने असा हा फिनोलेक्सचा पसारा वाढला आहे. २ री नंतर शाळेत ही न जाऊ शकणारे छाब्रिया हे उद्योगपति झाले फ़क्त आणी फ़क्त कष्ट आणी प्रत्नांवरती. हार कधी या माणसाने मानलीच नाही असंख्य संकटे आली पण कधी मागे सरकला नाही तेही पाठिशी कोणीसुद्धा नसताना.आजच्या काळा मधे आमचा इंजीनियर इतक्या लवकर हारला की तो आज स्वताची इज्जत स्वताच सोशल मीडया वर काढत आहे . हे दुर्दैवच म्हणावं लागेल. उत्तुंग शिखरावर चढत असतानासुद्धा छाब्रिया कुटुंबाचे पाय हे सदैव जमीनीवरतिच राहिले. सगळा उद्योग व्यवस्थित चालु झाला होता कश्याचिच कमतरता नहव्ती तरीसुद्धा  छाब्रीयांच्या 5 ही जनांची मुल सकाळी लवकर कंपनी मधे येउन कचरा काढण्या पासुन ते केबल तयार करण्या पर्यन्तचे काम  न लाजता स्वता इतर कामगार लोकांबरोबर करायची. 12 ला कंपनी च्याच कैंटीन मधे जेवण करुण ही पिंपरी मधुन लोकलने पुण्याला वाडिया कॉलेज ला शिक्षणासाठी जायची कॉलेज सुटलं  की परत कंपनी मधे कामाला यायची स्वतःचे वडिल उद्योगपती असताना  ही मुलं कधीच कामाला लाजली नाहीत म्हणून आज यशापर्यन्त पोहचलेत

*आमच्या आजच्या मुलाना  वडिलांनी काम सांगण्या आधीच आई म्हणते तो - ती इंजीनियरिंगला आहे, MBA ला आहे - याला आहे-त्याला आहे - त्याला/तीला हे काम नका सांगू.*

जीवनात कोणतच काम हे कमी नसतं आणि कामापेक्षा कोणी मोठं नसत हे श्री प्रल्हाद छाब्रिया यांनी सिद्ध करुण दाखवल.
शेतकरी बांधवांशी जोडलेल ५० वर्षाच अतुट नात म्हणजेच ................
         *" फिनोलेक्स"*