एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

इ ठिबक प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजनायोजना सूक्ष्म सिंचन योजना


अ.क्र. योजना सविस्तर माहिती
१ योजनेचे नाव : प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना
२ योजने बद्दलचा शासन निर्णय : शासननिर्णय क्र/सुसिंयो-2015/प्र.क्र.284/4-अे,दि.31 ऑगस्ट,2015
३ योजनेचा प्रकार : योजनांतर्गत योजना
४ योजनेचा उद्देश :
1. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.
2. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे .
3. कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतक-यांच्या एकुण उत्पन्नात वृध्दी करणे .
4. समन्वयीत पध्दतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे .
5. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सुक्ष्म सिंचन पध्दती विकसीत करणे, त्याची वृध्दी व प्रसार करणे .
6. कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
५ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्वप्रवर्गातील शेतक­यांसाठी लागू
६ योजनेच्या प्रमुख अटी :
1. शेतक-याच्या नावे मालकी हक्काची जमिन असावी
2. शेतक-याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी
3. विद्युत पंपाकरीता कायमस्वरुपी विद्युत जोडणी असावी.
4. राष्ट्रीयकृत / शेदुल्द बíकेत खाते असावे.
७ आवश्यक कागदपत्रे :
"1. संच बसविण्यात येणा-या क्षेत्राचा 7/12 उतारा
2. मालकी हक्कासंदर्भातील 8/अ खाते उतारा
3. ङच्र्क्रच् सुविधा असलेल्या बँक पासबूकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
4. शेतक-याच्या आधारकार्ड ची झेरॉक्स प्रत "
८ दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : योजनेंतर्गत बसविलेल्या सुक्ष्म सिंचन संचासाठी केंद्र शासनाने विहीत केलेल्या अनुदान प्रमाणानुसार अनुदान स्वरुपात लाभ देणे
९ अर्ज करण्याची पद्धत :
“ई-ठिबक” ऑनलाइन प्रणालीव्दारे
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 95 दिवस
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : "सबंधित जिल्हयातील तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी"
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: " ऑनलाईन अर्ज करण्याचे संकेत स्थळ www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावरील “ ई-ठिबक ”

आनंदी जीवन जगण्यासाठी

ऍपल /आय-फ़ोन कम्पनी चा मालक स्टीव्ह जॉब्ज स्वादुपिंडाच्या कॅन्सर ने २०११ साली मृत्यू पावला.त्याचे हे शेवटचे शब्द ...
-
व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली...
इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले...

तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.

आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:
त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं...

सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा...

परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच...संपत्तीनं निर्माण होत असलेल्या आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे.

आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरातब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...केवळ प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन.

तिच तर खरी संपत्ती...जी आपल्यासोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजाराे मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा...हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात...पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपलं आयुष्य" " काळ " " समय ".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".

*सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.*

कुटूंबावर, पती-पत्नीवर, मित्र-मैत्रिणींवर प्रेम उधळत जा...

स्वत:कडे दुर्लक्ष  करू नका...स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा.
शब्द रचना फार सुंदर. ...

चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये ...

तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये

*"लोक माणसं वापरायला शिकतात,"आणि पैसे जपायला शिकतात वास्तविक पैसा वापरायला हवा,आणि माणसं जपायला हवीत.आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते,आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा,आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...

रविवार, १५ जानेवारी, २०१७

पँथरचा जनक महाकवी

*नामदेव ढसाळ यांचा आज स्मृतीदिन* 🙏🏻🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻
साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे एक प्रमुख शिलेदार होते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या *'दलित पँथर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.* दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांच्या साथीने त्यांनी १९७२ मध्ये पँथरची स्थापना केली. अमेरिकेतील 'ब्लॅक पँथर' चळवळीपासून प्रेरणा घेऊन जन्मलेल्या या संघटनेने दलित चळवळीला एक आक्रमक चेहरा दिला. दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घ्यायला भाग पाडले. त्यावेळच्या प्रत्येक आंदोलनात ढसाळ यांनी हिरिरीने भाग घेतला. कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, 'दलित पँथर'शी ढसाळ यांचे नाते अखेरपर्यंत कायम होते.
नामदेव ढसाळ यांचे बुधवार,१५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

संपू दे अंधार सारा- भावलेली कविता

संपू दे अंधार सारा
उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे.... जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा... स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी... स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा...........
कवी*** अज्ञात

रविवार, ८ जानेवारी, २०१७

BHIM नक्की काय आहे

🎴 *भीम BHIM*

🔰१) *भीम म्हणजे काय?*:
भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) असे या अॅपचे पूर्ण नाव आहे. UPI या पैसे पाठवण्याच्या पद्धतीशी जोडलेले असल्यामुळे याद्वारे पैश्यांचे व्यवहार सुरळीतपणे करता येणार आहेत.

🔰२) *कसे काम करते?:*
भीम अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या बँक खात्याची माहिती यात भरा. आपले बँक खाते UPI शी जोडले गेले असल्याची खात्री करून घ्या. खात्याची माहिती भरल्यानंतर त्वरित आपण पैश्याचे व्यवहार करू शकतो.

🔰३) *पैश्याचे व्यवहार कसे करायचे?*
एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर जसे रोख रक्कम आपण देत असतो, त्याच प्रकारे भीम अॅपच्या सहाय्याने रक्कम पाठवायची आहे. रक्कम पाठवणाऱ्याची माहिती भरून सेंड म्हणल्यावर त्वरितच पैसे दुकानदाराच्या खात्यात जमा होणार. पेटीएम सारखे यात पैसे आधी जमा करावे लागणार नाहीत.

🔰४) *QR कोड :*
भीम अॅपमध्ये QR कोडची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराच्या वेळी, माहिती न भरता फक्त QR कोडच्या स्कॅनिंगद्वारे पैसे पाठवणे शक्य होणार आहे.

🔰५) *व्यवहार मर्यादा :*
भीम अॅपद्वारे दिवसाला २० हजार रुपयांचे व्यवहार करता येणार आहेत. मात्र एका वेळी कमाल १० हजार रुपये पाठविण्याचीच मर्यादा घातली गेली आहे.

🔰६) *आवश्यक बाबी :*
भीम अॅप वापरण्यासाठी आपल्याकडे स्मार्टफोन, इंटरनेट, बँक खाते, खात्याला UPI शी संलग्नित करणे आवश्यक आहे.

🔰७) *कोणकोणत्या बँक ‘भीम’ सेवा पुरविणार?*
भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय, अॅक्सिस तसेच एचडीएफसी बँक  इत्यादी  पहिल्या टप्प्यात भीम अॅप सेवा पुरविणार आहेत. तसेच अन्य बँकेत देखील केवळ IFSC कोडच्या माध्यमातून या सेवेला मान्यता मिळेल.

🔰८) *कोठे आहे ‘भीम’ उपलब्ध :* 
भीम अॅप आपण अँडॉईड प्ले स्टोअर वरून तसेच अॅपलच्या अॅप स्टोअर वरुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकतो.

🔰९) *भीम अॅपचे शुल्क :*
हे अॅप वापरण्यासाठी अथवा डाऊनलोड करण्यासाठी कोठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. भीम अॅपची सेवा पूर्णपणे मोफत आहे.

🔰१०) *कोणी तयार केले हे अॅप :*
भारतीय राष्ट्रीय भरणा कॉर्पोरेशन (एन. पी. सी. आय.) या संस्थेने ‘भीम’ अॅप तयार केले आहे. याचे संपूर्ण संचालन या संस्थेद्वारे केले जाईल. ही संस्था भारत सरकार द्वारे व्यवहार सुरळीततेकरिता चालविली जाते.

भारतरत्न

मी पाहिलेले बाबासाहेब


श्री. गारोल सांगतात, बाबासाहेबांचे दिल्लीत महापरिनिर्वाण झाले त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा औरंगाबादहून शेकडो लोक गेले होते. मला मात्र काही कारणास्तव जाता आले नाही, याची आजही खंत वाटते.

अचानक वर्गात जाऊन शेवटच्या बाकावर बसून शिकवणे ऐकायचे-  शिवराम जाधव मिलिंद महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असताना बाबासाहेब औरंगाबादला यायचे. तेव्हा मला आज त्यांची सेवा करण्याचा योग आला. याचा आज खूप आभिमान वाटतो.

बाबासाहेब औरंगाबादला आसताना त्यांची जेवणाची, चहा, नाश्‍त्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. त्यांना नाश्‍त्यामध्ये चहा आणि सोबत चणे आवडायचे. त्यांना अगदी साधं जेवण आवडायचं. मेथीची भाजी आणि भाकर खूप आवडीने खायचे. चहा पिताना, नाश्‍ता करताना इतकंच काय जेवतांनासुद्धा त्यांच्या हाती पुस्तक असायचे आणि वाचन सुरू राहायचं इतकी वाचण्याची त्यांना आवड होती. त्या वेळी त्यांना वयोमानाच्या तक्रारीमुळे जिना चढताना आणि उतरताना त्रास व्हायचा म्हणून मी आणि इतर दोघे-तिघे आम्ही त्यांना खुर्चीमध्ये बसवून वरच्या माळेवर नेणं-आणणं करीत. कॉलेजच्या बांधकामावर त्यांची बारकाईने नजर राहायची. ते फिरून फिरून कॉंट्रॅक्‍टरला आवश्‍यक त्या सूचना करायचे. मी त्यांच्या डोक्‍यावर छत्री पकडून त्यांच्या मागून चालायचो.

त्या वेळी कॉलेजची माहिती इतरांनाही मिळावी यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले होते, की रेल्वेस्टेशन, बसस्टॅंडवर जाऊन कॉलेज कुठे आहे, कसे आहे, याची माहिती तिथे उपस्थित असलेल्या लोकांना द्यायची. आम्ही कित्येक दिवस त्या ठिकाणी जाऊन कॉलेजची माहिती सांगण्याचे काम केलं.

कॉलेजमधील प्राध्यापकांना खाण्यापिण्याच्या त्रास होऊ नये, यासाठी कॉलेजच्या परिसरात एक कॅंटिन काढून मला चालवण्यास दिले. कॉलेजच्या टाईमटेबलची एक प्रत माझ्याजवळ असायची. बाबासाहेबांना जेव्हाही राऊंड घ्यावसा वाटायचा तेव्हा ते मला बोलावून कुठल्या वर्गावर कुणाचा पिरीएड आहे, याची चौकशी करीत. नंतर ते एखाद्या वर्गावर निरीक्षणासाठी जात. वर्गात शेवटच्या बाकावर बसून प्राध्यापकाच्या शिकवणीचा आढावा घेत. सांगायचं तात्पर्य असं, की आपल्या मुलांना कसं शिक्षण दिलं जातयं याकडे ते जातीने लक्ष देत. मुलांना उत्तमोत्तम शिक्षण मिळायला हवं, त्यांना स्वाभिमानाने जगता यावं एवढी त्यांची इच्छा असायची. शिकणाऱ्या प्रत्येक  मुलाने सामाजिक ऋण फेडावेत, अशी त्यांची इच्छा असे. आपल्या मुलांनी सन्मानाने जगावं, गुलामगिरी नाकारावी, खूप मेहनत करून यश प्राप्त करावे, यासाठी ते धडपडत असत.

माझ्या आयुष्याचा एक प्रसंग सांगतो. एकदा नेहमीप्रमाणे बाबासाहेबांचं दुपारचं जेवण झालं. ते बाहेरच्या खोलीत जाऊन बसले. मी बाबासाहेबांचं उष्ट ताट उचललं. ताटामध्ये थोडं अन्न शिल्लक होतं. सवयीप्रमाणे मी त्यातले घास तोंडात टाकले. इतक्‍यात बाबसाहेब तिथे आले. मला उष्ट्या ताटातून खताना बघून त्यांना राग अनावर झाला. रागारागात त्यांनी माझ्या गालावर सनकन्‌ एक झापड लगावली. माझे डोळे भरून आले. मी स्तब्ध उभा राहिलो. त्या वेळी बाबासाहेब बोलले. अरे, तुम्ही चांगलं राहाव, शिकावं म्हणून मी जिवाचं रान करतोय आणि तुम्ही अजूनही उष्टावळ चाटणे सोडल नाही, केव्हा तुम्ही सुधारणार त्या वेळेस मला माझी चूक उमजली. असे होते बाबासाहेब, बाहेरून जितके कडक मनातून त्याहीपेक्षा हळवे आणि प्रेमळ शिस्त आणि स्वाभिमान असल्या मरगळलेल्या मनात रुजणारे त्यांच्या ज्ञानाची ज्योत पेटविणारे, शिक्षणाची द्वरे त्यांच्यासाठी उघडणारे अशा थोर पुरुषाची सेवा मला तरावयास मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो.

बाबासाहेबांच्या या आठवणी आयुष्यभर माझ्या सोबतीला राहतील. जी थोडीफार त्यांची सेवा करण्यास मिळाली त्याबद्दल माझं मन आजही ऋणी आहे. आज मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे समाधानी आहे. बाबासाहेबांच्या आठवणी माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत माझ्याशी एकरूप राहतील.

धन्यवाद - सकाळ

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

तंटामुक्त गाव योजनेचे स्वरूप बदलणार

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आता नव्या स्वरूपात राबविण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. यासाठी पूर्वीच्या योजनेतील उणिवा लक्षात घेऊन नव्याने योजना राबविताना काय बदल करावे लागतील. या व इतर बाबींचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सरकारने पुण्याच्या यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनीवर (यशदा) टाकली आहे.

यासंदर्भात यशदाच्या पथकाने नुकतीच तंटामुक्त पुरस्कारप्राप्त म्हसोबावाडी (ता. इंदापूर) गावाला भेट देऊन योजनेबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी पोलिस पाटील तुषार झेंडे, सरपंच स्वाती थोरवे, ग्रामपंचायत सदस्य संदीप चांदगुडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालासो साळुंखे, लक्ष्मण चांदगुडे, नारायण थोरवे, शेखर मोहिते उपस्थित होते. म्हसोबावाडी गावाने ही योजना यशस्वीरीत्या राबविली आहे. म्हणूनच गतवर्षीदेखील केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या पथकाने गावाला भेट दिली होती. केंद्र सरकारने तंटामुक्त मोहिमेवरील आधारित २० भाषांतील लघुपट तयार करण्यासाठी या गावाच्या कार्याचा आढावा घेतला आहे. तसेच गतवर्षी गावचे पोलिस पाटील तुषार झेंडे यांना केंद्र सरकारने भोपाळ येथे आयोजित केलेल्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या कार्यशाळेत या योजनेची माहिती देण्यासाठी निमंत्रित केले होते. यात झेंडे यांनी या योजनेचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने म्हसोबावाडी गावाला व झेंडे यांना केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने प्रथम क्रमांक देत प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविले होते.

महाराष्ट्रात ही योजना यशस्वीपणे राबविल्यानंतर देशभर ही योजना पोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. म्हणूनच राज्य सरकार ही योजना नव्याने राबविण्यासाठी विचार करीत आहे.

गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

ग्राम संसद विषयी माहिती

ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती ---- ➡कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम)कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ➡लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या : 600 ते 1500 - 7 सभासद 1501 ते 3000 - 9 सभासद 3001 ते 4500 - 11 सभासद 4501 ते 6000 - 13 सभासद 6001 ते 7500 - 15 सभासद 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद ➡निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते. ➡कार्यकाल - 5 वर्ष ➡विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते. ➡आरक्षण : 👉महिलांना - 50% 👉अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात 👉इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%) ➡ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता : 👉तो भारताचा नागरिक असावा. 👉त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत. 👉त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे. ➡ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे. ➡सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते. ➡सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात. ➡राजीनामा : 👉सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो. 👉उपसरपंच - सरपंचाकडे ➡निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास : सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते. ➡अविश्वासाचा ठराव : 👉सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही. 👉बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक) 👉अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच 👉तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते. 👉अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते. 👉आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते. ➡ग्रामसेवक / सचिव : निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते. नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी. नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी. कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा. ➡कामे : 👉ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो. 👉ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे. 👉कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे. 👉ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे. 👉व्हिलेज फंड सांभाळणे. 👉ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे. 👉ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे. 👉गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे. 👉जन्म-मृत्यूची नोंद करणे. ➡ग्रामपंचातीची कामे व विषय : कृषी समाज कल्याण जलसिंचन ग्राम संरक्षण इमारत व दळणवळण सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा सामान्य प्रशासन 👉ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे. 👉बैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर) 👉सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता. 👉अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच 👉ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल. ___________________________________ ✳✴ग्रामपंचायतींची कार्ये✴✴ १. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन. २. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे. ३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे. ४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास. ५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा. ६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने. ७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे. ८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे . ___________________________________ ✔आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती. * गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते. * गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते. * गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते. * गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते. * गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते. * गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते. * गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते. अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.

नववर्ष स्वागत

 

प्रयत्नांती....

सैनिक पतीच्या मृत्यूनंतर
स्टाॅफ सलेक्शन बोर्डाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावत निधी दुबे बनली
मध्यप्रदेशची पहिली महिला सैन्य अधिकारी

नुकतच लग्न होऊन सासरी आलेली निधी आपल्या पतीच्या सहवासात संसारिक सुखात रममाण झाली होती. हातावर अजूनही पुसटशी मेहंदी होती आणि अचानक नुकताच सुरु झालेला संसार कोलमडून पडला. निधीच्या सैनिक पतीला हृदयविकाराचा झटका आला आणि एका मिनिटात होत्याच नव्हतं झालं. पतीच्या मृत्यूनंतर निधीला जगायची इच्छा नव्हती. आयुष्याला काही अर्थ नाही असे तिला वाटत होते मात्र तिच्या गर्भात असलेल्या छोट्याशा जीवाने तिला जगायला भाग पाडले. फक्त २५ वर्ष वय असलेल्या निधी समोर भयानक परिस्थिती उद्भवली होती.

पती गेल्यानंतर पोटापाण्यासाठी निधीला बाहेर पडावे लागले. सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले. संघर्ष करत असताना तिच्या एका मैत्रिणीने तिचे मनोबल उंचावले, तिला मार्ग दाखवला. निधीने मग तिच्या पतीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरिता भारतीय सैन्यदलात दाखल  व्हायचे ठरवले. चार वेळा तिच्या प्रयत्नांना अपयश आले. मात्र तिने हार न मानता पुन्हा लढा दिला आणि त्याचे परिणाम आज तुमच्या समोर आहे. निधीची सैन्यात अधिकारी पदासाठी निवड झाली आहे.

विधवा शहिदांच्या श्रेणीत सैन्य अधिकारी बनणारी निधी मध्यप्रदेशची पहिली महिला अधिकारी आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बीना येथे निधीचे शिक्षण झाले. २००८ मध्ये लग्न झाल्यानंतर ती सासरी सागर जिल्यात राहायला आली. पती मुकेश दुबे सैनिक होते. हैद्राबाद मध्ये सैन्य दलात ते तैनात होते. लग्न झाल्यानंतर दोघेही आनंदी होते. त्यांच्या भावी सुखी संसाराची स्वप्न पाहात होते. मात्र मोठा अनर्थ झाला. मुकेशच्या मृत्यूनंतर निधी सैरवैर झाली. जगावे की मरावे तिला समजत नव्हते. आयुष्याचा जोडीदार तिला सोडून गेला होता. पण त्यांच्या प्रेमाच्या निशाणीला तिला जगात आणायचे होते.

अनेकांनी तिला दूर लोटले. मात्र तिचा भाऊ आणि वडील खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले पेन्शन मिळवण्यासाठी भोपाळमध्ये राहणाऱ्या ब्रिगेडियर आर. विनायक यांच्या पत्नी डॉ. जयलक्ष्मी यांच्याशी तिची गाठ पडली. दोघीही मैत्रिणी झाल्या. निधीची कहाणी ऐकून जयलक्ष्मी यांनी तिला धीर दिला. मार्गदर्शन केले तेव्हाच निधीने ठरवले की सैन्यात दाखल होऊन देशसेवा करायची आणि पतीचे स्वप्न पूर्ण करायचे. ध्येय निश्चित झाले. मग काय ध्येयप्राप्तीसाठी कमालीचा संघर्ष सुरु झाला. स्वतःसाठी आणि मुलासाठी राहण्याखाण्याची व्यवस्था तिला करायची होती. तिने सैनिक शाळेत तात्पुरत्या स्वरुपाची नोकरी करायला सुरुवात केली. मुलाला सांभाळणे, नोकरी करणे आणि सैन्यात दाखल होण्यासाठी प्रशिक्षण क्लासेसला जाणे म्हणजे निधीला तारेवरची कसरत करावी लागली. तिने चार वेळा एसएसबी (स्टाॅफ सलेक्शन बोर्ड) ला मुलाखत दिली. चारही वेळा तिला नाकारण्यात आले. मात्र निधीने प्रयत्न सुरूच ठेवले. तिच्यातल्या कमतरता जाणून घेऊन त्यावर मात केली आणि पाचव्या प्रयत्नात मात्र मुलाखतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. ३० सप्टेंबरला चेन्नईत प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर निधी देशसेवेत रुजू होईल.

यशस्वी झाल्यानंतर निधी सांगते की मुकेशच्या मृत्यूनंतर ती पूर्णतः हताश झाली होती मात्र मुकेशच्या प्रेमाने तिला जगायला शिकवले. तिच्या भावाने, वडिलांनी आणि मैत्रीण जयलक्ष्मी यांनी तिला पावलोपावली मदत केली. म्हणूनच ती मुकेशचे स्वप्न पूर्ण करण्यास सज्ज झाली आहे.