एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, २० मे, २०१९

रोपटं

*इवलंसं रोपटं मी*
*तू म्हणालास तर मरून जाईन*

*ओंजळभर पाणी दे मला*
*आयुष्यभर तुझ्या कामा येईन*

*दिलं जीवदान मला तर*
*तुला जगायला प्राण वायू देईन*

*जगवलंस मला तर*
*तुझ्या देवांसाठी फुलं देईन*

*फुलवलंस मला तर*
*तुझ्या मुलांसाठी फळं देईन*

*तळपत्या उन्हामध्ये*
*तुझ्या कुटुंबाला सावली देईन*

*तुझ्या सानुल्यांना खेळावया*
*माझ्या खांद्यावर झोका देईन*

*तुझ्या आवडत्या पाखरांना*
*मायेचा मी खोपा देईन*

*कधी पडला आजारी तर*
*तुझ्या औषधाला कामा येईन*

*झालो बेईमान जरी मी*
*शेवटी तुझ्या सरणाला कामा येईन*
              ....
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
*...एक रोपटं   *

रविवार, १९ मे, २०१९

गौतम बुद्ध यांच्याविषयी थोडक्यात

जन्म
सिद्धार्थ
इ.स.पू. ५६३
लुंबिनी, नेपाळ
मृत्यू
इ.स.पू. ४८३
कुशीनगर, मध्य प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व
भारतीय / नेपाळी
टोपणनावे
गौतम, शाक्यमुनी
प्रसिद्ध कामे
बौद्ध धर्माचे संस्थापक
मूळ गाव
कपिलवस्तु
उंची
७ फुट २ इंच
धर्म
बौद्ध धर्म
जोडीदार
यशोधरा
अपत्ये
राहुल
वडील
राजा शुद्धोधन
आई
महाराणी महामाया
नातेवाईक
महाप्रजापती गौतमी (मावशी व सावत्र आई)
जगातील सर्वात महान व्यक्तिमत्व
जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती
जगभरात १ अब्ज ८० कोटी अनुयायी
‘बुद्ध’ हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे.[१] ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वत: वर विजय मिळवलेला आणि स्वत: उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वत: सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या अनुयायांना बौद्ध किंवा इंग्रजी भाषेत किंवा बुद्धिस्ट म्हणतात आणि बुद्धांच्या धम्माला (धर्माला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध धर्म' किंवा ‘बुद्धिझम्’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बद्ध भिक्खू - भिक्खूनींचा आणि दुसरा — बौद्ध उपासक - उपासिकांचा.[३]

आज सर्वच खंडांत भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. जगभरातील बुद्ध अनुयायांची लोकसंख्या ही १८० कोटी ते २१० कोटी आहेत.[४][५][६][७] अनुयायांच्या तुलनेत य

बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

एक काळा ठिपका

🌷एक काळा ठिपका.

कॉलेजमधील एका प्राध्यापकाने एके दिवशी वर्गावर आल्यावर अचानक जाहीर केले की., "आज मी तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे."
असे म्हणून प्राध्यापकाने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पत्रिका दिली. ती हातात पडताच जवळपास सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. काहीजण तर पूर्ण बावचळून गेले. कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरी होती. कसलेच प्रश्न त्यावर नव्हते. फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता.
प्राध्यापक म्हणाले, "आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्हाला पेपरवर जे काही दिसतंय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत."
मुलांनी मग जमेल तसे उत्तर लिहिले. सगळ्याचे लिहून झाल्यावर प्राध्यापकाने पेपर गोळा केले आणि एकेकाची उत्तर पत्रिका मोठ्याने वाचायला सुरुवात केली. कुणी लिहिले होते, तो ठिपका म्हणजे मी आहे, माझे जीवन आहे, तर कुणी भौगोलिक रित्या लिहिले होते की, पेपरच्या मध्यभागी एक काळा ठिपका आहे. त्याचा व्यास अमुक तमुक मिलीमीटर असावा
वगैरे वगैरे !
सगळे झाल्यावर प्राध्यापक म्हणाले, "दुर्दैवाने तुम्ही सर्वजण नापास झालेला आहात."
सर्वजण दचकले. मग प्राध्यापक सांगू लागले.
"सर्वांनी एकाच दिशेने विचार केला आहे.सर्वांचा फोकस त्या काळ्या ठिपक्यावरच होता. ठिपक्या भोवती खूप मोठा"पांढरा" पेपर आहे हे मात्र कुणीच लिहिले नाही आणि आपल्या जीवनात देखीलअसेच होते.आपल्याला खरेतर जीवनरुपी खूप मोठा पांढरा पेपर मिळालेला असतो.ज्यात आनंदाचे रंग किंवा शब्द भरायचे असतात. पण आपण ते न करता केवळ काळ्या ठिपक्या कडे पाहतो. जीवनातल्या अडचणी, मित्र मैत्रिणी सोबतचे वाद गैरसमज, घरातील विसंवाद हे सगळे ते काळे ठिपके असतात. आपण त्यावर फोकस करतो आणि "खूप मोठा पांढरा" पेपर हातात आहे याकडे दुर्लक्ष करतो. खरेतर एकूण पांढरया पेपरच्या आकारापेक्षा तो काळा ठिपका तुलनेने खूप लहान असतो. पण तरी आपण त्यातच गुंतून पडतो. आणि मोठा पांढरा भाग दुर्लीक्षित राहतो. म्हणून यापुढे एक लक्षात ठेवा. काळा ठिपका न पाहता पांढरा पेपर पाहायला शिका.खूप समाधानी व्हाल.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८

संधीचं सोनं ..


एका आटपाट नगरीच्या राजाने आपल्या एकुलत्या एक लावण्यवती मुलीच्या लग्नाचे स्वयंवर ठेवले, राज्यात तशी दवंडी पिटवली....
स्वयंवरासाठी एक जाचक अट ठेवली... *एका दरवाज्यातून पिसाळलेला बैल सोडण्यात येईल अन २० फुटावर असलेल्या दरवाजातून तो बाहेर पळत जाईल.. या बैलाच्या शेपटीला धरून जो तो दरवाजा पार करेल त्याच्याशी राजकन्येचे लग्न लावून त्याला बक्षीस म्हणून अर्धे राज्य दिले जाईल ! प्रत्येकाला ३ वेळा संधी देण्यात येईल !*
मग काय ! अनेक तरुण इच्छुक झाले...! सराव सुरू झाले.. राज्यभरातील तरुण कामाला लागले.. मेहनत घेऊ लागले... रात्री स्वप्न रंगवू लागले....
साहजिकच होते ना त्यांचे.. फक्त २० फुटाचे अंतर निर्भयपणे, हिमतीने पार केले की सुंदर राजकन्या अन अर्धे राज्य मिळणार होते !
स्वयंवराचा दिवस उगवला .....
सर्व जनता जमा झाली... पहिल्या दरवाजातून बैल डोकावला...! त्याला पाहताक्षणीच तरुणांचा थरकाप उडाला .. साधासुधा बैल नव्हता तो .. अगदी जंगली सांड होता अन त्यात पिसाळलेला...! सर्व तरुण दोन पाऊल मागे सरकले !
पण एक तरुण जिद्दीला पेटला... पुढे होऊन मैदानात उतरला.... पहिला बैल सोडण्याची घोषणा झाली......
त्याच्याकडे पाहून त्याने मनात विचार केला की तीन संधी आहेतच याला जाऊ द्या ! याचे फक्त अवलोकन करू.... बैल उधळला अन तसाच पुढे निघून गेला..!
दुसरा बैल सोडण्याची घोषणा झाली.... पहिल्या बैलापेक्षा हा बलदंड होता... त्याला पाहून याचे अवसान गळायला लागले... बैल उधळला पण आणखी एक संधी आहे म्हणून हा जाग्यावरच स्थिर राहिला ...!
आता मात्र शेवटची संधी होती... *मेलो तरी बेहत्तर पण मी ही संधी सोडणार नाही !* याची त्याने मनोमन गाठ मारली...!
तिसरा बैल घोषणा होताच उधळला, तरुणाने जीवाचा आकांत करून आपल्या ध्येयाच्या दिशेने झेपावला...…... पण याचे नशीब करंटे .....
'तिसऱ्या बैलाला शेपुटच नव्हते !'
राजाने स्पष्टीकरण देत सांगितले, *संधी दोन वेळ तुझ्याकडे चालून आली अन तू तिचे सोने न करता तिसऱ्या संधीची वाट पहात होतास पण तिसऱ्या वेळेस संधीने तुला हुलकावणी दिली.....
संधीचे सोने करणाराच या जगात यशस्वी होतो !

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

सर्व प्रकारच्या आजारांवर डॉ दीक्षित यांचा सल्ला



डॉ.जगन्नाथ दीक्षित यांचा सल्ला

१) वजन कमी होते.......

२) पोटाचा घेर कमी होतो.......

३) HB1C(Blood Sugar) कमी होते.......

४) Insuline level कमी करून डायबेटिस पासून मुक्ति मिळते.......


सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

◆टाईम बँक◆ एक आगळावेगळा उपक्रम

*टाइमबँक*

स्वित्झर्लंडमधे अभ्यास करीत असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो.
त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून ररिटायर्ड झाली.
खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती.

तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका  ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले काळजीवाहक म्हणून.
मी तिला विचारले अधिक पैशाच्या मोहाने तू हे स्वीकारले आहेस कां?
तर तिने दिलेले उत्तर मला संभ्रमित करणारे होते.

ती म्हणाली "नाही, मी पैशांसाठी नाही हे करीत. मी माझा हा कामाचा वेळ *टाइमबँक* मध्ये टाकते. आणि मी जेंव्हा म्हातारी होईन तेंव्हा मी ह्या टाईमबँकमधून मला सेवेचा वेळ काढून घेईन."

मला टाईमबँक असं काही असतं, हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला.
मी तिला विस्ताराने या संकल्पनेची माहिती विचारली.

ती म्हणाली, स्वित्झर्लन्ड शासनाने एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली.
त्याचं असं आहे की जेंव्हा व्यक्ती सुध्दृढपणे तारुण्यात असते तेंव्हा त्या आपल्यापेक्षा वृध्दाची सेवा करतात आणि ती व्यक्ती जेंव्हा वृध्द होते आणी अशा सेवेची तिला आवश्यकता भासते! तेंव्हा अशा पूर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते.

अशी सेवेकरी व्यक्ती सुध्दृढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी.
ज्या वृध्दांना सेवेची अपेक्षा असते अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात.

अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते सामाजिक कल्याण विभागाच्या.

घराची मालकीण आठवड्यातून दोन वेळा दोन दोन तास वृध्दांना त्यांच्या काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, वाचनासाठी अथवा बाहेर फिरण्यासाठी व्यतीत करीत होती.

अशाप्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर तिच्या सेवेची गणना करुन तिला *टाइमबँक कार्ड* दिलं जाईल.
त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल.

जेंव्हा सेवेकरी स्वत: वृद्ध होईल, तेंव्हा तिला तिच्यासाठी त्या टाइमबँक कार्डाव्दारे सेवा मिळू शकेल.
तिच्या टाइमकार्डाची तपासणी होऊन *टाइमबँक* तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हाँस्पिटलमधे पाठवून देईल.

          एके दिवशी मला माझ्या घरमालकीणीचा फोन आला.
ती म्हणाली, काही गोष्टी काढण्यासाठी ती स्टुलावर उभी होती. तोल जाऊन ती पडली आणि तिच्या मांडीचे हाड मोडले आहे.

मी आँफिसमधून रजा घेतली आणि तिला हाँस्पिटलमधे पोहोचवली.
मी तिच्या सेवेसाठी रजा टाकत होतो.
पण ती म्हणाली, तशी काही जरुरी नाही.
मी माझ्या टाइमबँकेतून सेवेसाठी टाइम विड्राव्हल फाँर्म भरला आहे आणि टाइमबँक आता माझी काळजी घेईल.

खरेच दोन तासात टाइमबँकेतून सेवेकरी हजर झाले.
त्यानंतर महिनाभर त्या सेवा स्वयंसेविकेने माझ्या घर मालकिणीचे घर सांभाळले. तिच्यासाठी स्वयंपाक करुन जेवू घातले. तिच्याशी गप्पा मारुन आनंदी ठेवले. सेवेकरीच्या सहाय्याने घरमाकीण लवकरघ पूर्ण बरी झाली.
बरी झाल्यावर लगेच ती आपल्या सेवाभावी कार्याला लागली.

तिचे म्हणणे असे की, ती जोपर्यंत कार्यक्षम  आहे तोपर्यंत ती जास्तीत जास्त वेळ टाइमबँक मध्ये टाकू इच्छिते.

          सध्या स्वित्झर्लंडमध्ये *टाइमबँक* हा विषय अगदी सर्वमान्य झाला आहे.
यामुळे शासनाला केवळ आर्थिक फायदाच झालाय असं नव्हे तर अनेक सामाजिक समस्या त्यामुळे मिटल्या आहेत.
समाजामध्ये अधिक सामंजस्य व सहिष्णुततेची वाढ होण्यास मदत झाली आहे.

बहुसंख्य स्विस नागरिकांनी हा विषय उचलून धरला आहे.

शासनाने केलेल्या पाहणीत लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात नागरिक या संकल्पनेत सहभागी होऊ इच्छीतात, हे दिसून आले आहे.

त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये शासनाने अशाप्रकारचे कायदे करण्यात तत्परता दाखविली आहे.

          ज्येष्ठ नागरिकांच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेचा दोन टर्म असण्याच्या पूर्वीपासून सक्षम ज्येष्ठांची अति ज्येष्ठांच्या सेवेसाठी काही वेळ देऊन हा विषय आपलासा करावा हा प्रयत्न अनेक श्रेष्ठींनी नागरिकांत प्रस्रुत करण्याचा प्रयत्न केला.
पण सर्व काही फक्त *शासनानेच* करावे ही मनिषा असल्याने त्या विषयावर बहुसंख्यांनी पाठ फिरवली.

आपणही पुढे वृध्द होणार आहोत आणि सध्या न्यूक्लीअर कुटुंबाची प्रथा मूळ धरु पहात असल्याने आपल्या वृध्दत्वी काळजी वाहक म्हणून आपल्याला कोणी साथी उपलब्ध होऊ शकेल ह्या भावनेने आजच्या तरुणाईने वृध्दांशी सेवाभाव ठेवावा हा विचार केल्यास भारतीय वृध्दांचे भवितव्य उज्वल असेल.

बघा विचार करुन

मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१८

यशोधरा

स्त्री स्वतःच पूर्णरुप !

   ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर
आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली.
    पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा तिला समजली तेव्हा ती उध्वस्त झाली. पण तिने कुणाकडे ही तक्रार केली नाही. आणि जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहिल, अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे,असे तिला सर्वांनी सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली, तिने त्यास नकार दिला.
    आणि एका सुंदर सकाळी.........
ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले.
     तिने शांतपणे त्यांना विचारले, "आता तुम्हाला लोक 'बुद्ध 'म्हणून ओळखतात ना?"
      त्यांनी ही तितक्याच शांत
पणे उत्तर दिले, "होय, मी देखील तसे ऐकले आहे. "
    तिने पुढे विचारले, "त्याचा अर्थ काय?"
   "जगण्याचा अर्थ कळला आहे, अशी व्यक्ती !"तेम्हणाले.
     ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली.
   काही वेळाने ती म्हणाली,
"आपण दोघेही काहीतरी नवे
शिकलो आहोत, असे मला वाटते. तुम्ही जे शिकला आहात, त्यातून हे जग सम्रुद्ध
होईल पण मी जे शिकले आहे, ते
फारसे जगापुढे येणारच नाही."
    बुद्धांनी तिला विचारले, "तू काय धडा शिकलीस ?"
    तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
   "तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी रहाण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते. "
   

यशोधरेतील 'स्त्री'ला मनापासून नमस्कार !
    🙏🏻   🙏🏻   🙏🏻
कॉपी पेस्ट Thanks to whatsapp