एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, २५ मार्च, २०१७

फेरफारासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी

फेरफारासाठी आवश्यक बाबी जमीनीबाबतच्या अधिकारामध्ये जसजसा बदल होतो त्याप्रमाणे अनुक्रमाने या नोंदी घेतल्या जातात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा गाव नमुना असून त्याबाबत योग्य ती दक्षता व काळजी त्या त्या वेळी न घेतल्यामुळे अनेकांच्या जीवनात फेरफार घडवून आणलेली हीच ती फेरफार नोंदवही आहे. नोंदीतील तपशिल कसा लिहीतात : स्तंभ-१ : या स्तंभामध्ये फेरफार नोंदीचा अनुक्रमांक लिहीला जातो. स्तंभ-२ : या स्तंभामध्ये हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकाराचे स्वरुप लिहीले जाते. यामध्ये फेरफाराचा दिनांक, सूचना मिळाल्याचा दिनांक, व्यवहाराचे स्वरुप, संबंधीत खातेदारांची नांवे, व्यवहाराचा दिनांक, मोबदला रक्कम इत्यादी तपशिल असतो. स्तंभ-३ : जमीनीचा व्यवहार ज्या गट नंबर किंवा सर्वे नंबरशी संबंधीत आहे, त्याचा नंबर लिहीला जातो. स्तंभ-४ : अशा प्रकारे केलेल्या फेरफाराबद्दल संबंधीतांना नोटीस देऊन, चौकशी करुन व केलेला फेरफार बरोबर करण्यांत आला आहे याबद्दल स्वत:ची खात्री करुन प्रमाणन अधिकारी (बहुदा मंडल अधिकारी) स्तंभ-४ मध्ये योग्य तो आदेश देतात व पदनाम लिहून स्वाक्षरी करतात. नोंदी कोणाकडून होतात? राज्यभर या नोंदी तलाठी मंजूर करतात असाही एक गैरसमज आहे. फेर फार नोंदी या फक्त तलाठयाकडून लिहील्या जातात. त्या मंजूर किंवा नामंजूर करण्याचा कोणताही अधिकार तलाठयास नाही. नोंदीची मंजूरी : नोंदी या मंडल अधिकारी किंवा सर्कल भाऊसाो हे प्रमाणित करतात. कोणतीही नोंद एकदा मंजूर किंवा नामंजूर झाल्यानंतर या नोंदीमध्ये बदल करावयाचा तलाठयास किंवा मंडल अधिकाऱ्यांना कसलाही अधिकार नसतो.

1 टिप्पणी: