एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २६ मार्च, २०१७

वादग्रस्त फेरफाराबाबत

वादग्रस्त फेरफार

हस्तांतरणाबाबत फेरफारामध्ये ज्यांचा ज्यांचा हितसंबंध असेल, अशा सर्वांना नोंदीबाबत तोंडी अथवा लेखी हरकत घेता येते.

मिळालेल्या वर्दीची वरिष्ठ महसूल अधिकारी, न्यायालय किंवा नोंदणी अधिकारी यांच्याकडून प्राप्त अ' पत्रकाची नोंद तत्काळ फेरफार नोंदवही (गाव नमुना नं. 6 ड) ला घेऊन चावडीवर त्याची प्रत ठळकपणे चिकटवणे बंधनकारक असते; तसेच त्यासंबंधीच्या नोटिसा सर्व संबंधितांना देणे बंधनकारक असते. अशी नोटीस मिळाल्यानंतर तोंडी किंवा लेखी हरकत घेता येते. वादग्रस्त नोंदी या वेगळ्या नोंदवहीत ठेवणे बंधनकारक असते व अशा हरकतीस तत्काळ पोच देणे बंधनकारक असते.

वादात्मक प्रकरणात अव्वल कारकुनापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याने अथवा भूमापन अधिकाऱ्याने सहा महिन्यांच्या आत निर्णय घ्यायचा असतो. संबंधित फेरफार वहीत संबंधित नोंदीपुढे दिलेल्या निर्णयाचा निर्देश करून नोंद प्रमाणित किंवा रद्द करावयाची असते व नोंद प्रमाणित झाल्यानंतरच त्याची नोंद गाव नमुना नं 7 म्हणजे 7/12 वर घेतली जाते. 7/12 वर आळे करून जुन्या हक्कधारकाच्या नावावर कंस करून नवीन हक्कधारकाचे नाव हक्क तपशिलासह नोंदविले जाते.

1 टिप्पणी:

  1. याचा कालावधी किती आणि कसा केला जातो??? कारण याचे अपील १. मंडलाधिकारी २. तहसिलदार ३. प्रांत व इतर. परंतु मांडळाधिकारी यांनी नोंद मंजूर झाल्या वर कितीही दिवस मध्ये मंजूर खेळी पाहिजे

    उत्तर द्याहटवा