एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

Officer the great

भारतातून परदेशात गेलेला मुलगा शिकला.
मोठा आँफीसर झाला.
आणि भारतात आला.
घरी जायची ओढ होती.
पण कंपनीच्या लोकांनी विमानतळावरच घेरले
आणि भव्य सत्कार केला.
सजवलेल्या गाडीत बसवले.
आणि भव्य मिरवणूक निघाली.
एका फाइव्ह स्टार हाँटेल समोर थांबले.
साहेब आज इथ थांबा.
सगळ्यांचा आग्रह.
साहेब गाडीतून उतरले.
आजूबाजूचे लोक फुले उधळत होते.
काय सांगाव ते कौतुक.......
साहेब दरवाजा पर्यत आले.
दरवाजा जवळ एका डोअरकिपर म्हाताऱ्याने नेहमी येणाऱ्या लोकांना मुजरा करतो तसा मान खाली घालून मुजरा केला. ..
दरवाजा उघडला. साहेब आत शिरले..
आणि .
विजे चमकावी तसे चमकले....
आणि
तक्षणी माघारी फिरले. ...
दरवाजा जवळ आले...
डोअर किपरने खालची मान वर केली ...
साहेबांची आणि त्याची नजरा नजर झाली.
आणि आणि ...
दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. .
साहेब अश्रू ढाळीतच त्या डोअरकिपरच्या पायावर झुकला.
आणि नकळतच तोडांतून शब्द बाहेर पडले....
बाबा.......बाबा
तुम्ही इथे.....
आणि बराच वेळ बापलेक गळ्यात गळा घालून रडत राहिले.
बाजुच्या लोकांना ही गहीवरून आले.

आपल्या मुलाने परदेशी जावे.
मोठे व्हावे यासाठी हा बाप नोकरी करत होता.
ओव्हर टाईम करत होता.
पोटाला पोटभर खात नव्हता पण मुलासाठी पैसे पाठवत होता.
तो रिटायर झाला.
पैसा कमी पडू लागला.
म्हणून या हाँटेलमधे डोअर किपरची नोकरी करायला लागला.

दरवाजात कोणीही आले तरी मान खाली घालून मुजरा करायचा.
आणि दरवाजा उघडायचा हा त्याचा नियम ठरला.
आणि आज तोच मुजरा त्याच्या मुला साठी होता.
आयुष्यभर दुसऱ्याला मुजरा करणाऱ्या हाताने त्याने मुलाला घडवले.

मला सांगा यात श्रेष्ठ कोण
तो साहेब की तो डोअरकिपर
तो आँफीसर की नोकर
तो मुलगा की बाप....

यशाची शिखरे चढणार्या प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या साठी यशाच्या प्रत्येक पायरीचा दगड हा बाप असतो.
तुमच्या जीवनाच्या आणि करिअरच्या इमारतीचा पाया हा बाप असतो.
पाया कधी दिसत नाही पण त्या शिवाय इमारत उभी राहू शकत नाही.
हा बाप घरात कायम
वेठबिगारी हमालासारखा जगतो.
राञन् दिवस कष्ट करतो.
कोणी शेतात.
कोणी आँफीसात.
कोणी रोजंदारीवर.
तो फक्त राबत असतो.
त्याच्या जीवावर मुलं शिकतात. मोठी होतात. पुढे जातात. आणि त्यालाच म्हणतात. तुमच्या पेक्षा आम्ही कतृत्ववान आहोत. काय केले तुम्ही ?
आपल्या बनियनला भोक पडू नये यासाठी स्वतःच्या बनियनची भोक विसरणारा तो बाप.
आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून स्वतः घामाने भिजनारा बाप.
आपल्याला चांगले बुट मिळावे म्हणून फाटक्या चपला वापरणारा बाप.
स्वतःची स्वप्न तुमच्या डोळ्यांत बघणारा तो बाप..
लहानपणी आजारी पडला तर पाठीवर घेऊन रात्री अपराञी दवाखान्यात नेणारा तो बाप..
तुमचे शिक्षण पुर्ण करणारा तो बाप..
पाहिजे तेव्हा पैसे देणारे ATM मशिन म्हणजे बाप...
ज्याला बाप आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळतात.
बाप आणि बापाच काळीज समजून घेतले पाहिजे.
बाप
बोलेल
मारेल
शिक्षा करेल
पण आपल्या चुका सुधराव्या म्हणून....
आई चुक पदरात घेईल पण बाप चुक सुधरायला लावेल.
ज्या घरात बाप आहे त्या घराकडं कोणी वाईट नजरेनं पाहत नाही
पण जिथे बापाची छाया नसेल त्या घरावर कोणीही दगड मारत.
माझ्या एका मिञाचे वडील गेले..
जिवंतपणी त्या बापलेकांच कधीच पटले नाही. पण जेव्हा काही दिवसांनी मी त्याला भेटलो त्या वेळी बापाच्या आठवणीने तो धायमोकलून रडला. दत्ताभाऊ, ज्या वेळी वडील होते तेव्हा त्यांची किंमत कळली नाही. मी कायम नावं ठेवत होतो. कधी ऐकल नाही . पण आता ज्या वेळी जगाच्या बाजारात जातो. टचके-टोमणे खातो. आज मला त्यांची उणिव भासते.
आज माझे वडील असते तर अस बोलले असते...
आज वडील असते तर हा मार्ग सांगितला असता.
वडीलांनी काही नको करू दे. पण घराला एक आधार होता .
मला जेव्हा विचारले जाते
जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो
जगात यशस्वी कोण ?
ज्याला आई बापाची कींमत कळाली तो
जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो
आणि
जगात नालायक कोण ?
ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.
मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात
खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.

.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा