१. ज्या व्यक्तीचा प्लॉट विकावयाचा आहे तो विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे किंवा नाही याची खात्री ७/१२ उतारा पाडून करणे. २. विकणाऱ्या व्यक्तीकडून चालू तारखेचा ७/१२ उताऱ्याचे फेरफाराची व जागेचा झोन दाखला इ. मागणी करावी. ३. जमीन/प्लॉट स्वतः पाहून त्यास जाण्या येण्यासाठी पोहोच मार्ग आहे किंवा नाही हे पहावे. ४. विकणाऱ्या प्लॉटच्या शेतसारा भरलेला आहे किंवा नाही ते पहावे तसेच ३० वर्षापूर्वीचे ७/१२ उतारे पाहावेत. ५. ७/१२ उतारा पाहतेवेळी ७/१२ उताऱ्यावरील सर्व बाबींचा विचार करावा. ६. प्लॉटचा व्यवहार ठरल्यानंतर विकणाऱ्या मालकाकडून १५ दिवसांची जाहीर नोटीस वर्तमानपत्रामध्ये देण्यासाठी लेखी संमती घ्यावी संमती घेतेवेळी स.नं. प्लॉट.नं. क्षेत्र आकार व चतुर्सिमा इ. उल्लेख असावा. ७. वर्तमानपत्रामध्ये वकिलांमार्फत जाहीर नोटीस देण्यात यावी वर्तमान पत्रामध्ये नोटीस दिल्यानंतर वर्तमानपत्र जपू ठेवावे. ८. नोटीस दिल्यानंतर मुदतीपर्यंत कोणाचीही तोंडी अथवा लेखी तक्रार आल्यास त्याचे पूर्ण शंका समाधान विकणाऱ्या जमीन मालकाकडून करून घेणे गरजेचे आहे. ९. जागेच्या नकाशालगतच्या चतुर्सिमा धारकांची नावे ७/१२ उतारे काढून घ्यावेत व त्यांचे स.न.प्लॉट.न. इ. खात्री करावी. १०. शासकीय होणारी स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन फी, वकील फी, लिखाणावळ फी देऊन खरेदीखत करून घ्यावे. ११. खरेदीखतामध्ये चतुर्सिमा चा उल्लेख करताना खालील गोष्टींचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे १२. खरेदीखत झाल्यानंतर इंडेक्स दोन मिळाल्या नंतर मा. गावकामगार तलाठी यांच्या कार्यलयामध्ये त्याची दप्तरी ७/१२ उताऱ्यासाठी नोंद करून घ्यावी. १३. आपण आपल्या जागेचा ७/१२ चा उतारा नोंद झाल्यानंतर प्रत्येक ६ महिन्यानंतर मा. तलाठी यांचेकडून काढावा व तो जपून ठेवावा. जागा खरेदी झाल्यानंतर ७/१२ उतारा नोंद झाल्यानंतर प्लॉटचा ताबा घेणे महत्वाचे आहे ताबा घेणे म्हणजे प्लॉटला चारही बाजूने कुंपण करणे.
एकूण पृष्ठदृश्ये
शनिवार, २७ मे, २०१७
शुक्रवार, १९ मे, २०१७
आधार बिल
गुरुवार, १८ मे, २०१७
7 /12 वरील वारस नोंदी कशा कराव्यात
सोमवार, १५ मे, २०१७
बुद्ध विचार
बुध्दांना एका पंडितन विचारल की तथागत आपण लोकांना सांगता देव नाही, आत्मा नाही , स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही.
बुध्द म्हणाले , तुम्हाला असे कुणी सांगितले की मी आसे बोललो?
पंडित म्हणाला, नाही असे कुणी सांगितले नाही .
मग मी असे बोललो असे सांगणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का ?
पंडीत म्हणाला नाही.
मग असे मी कुणाला सांगताना तुम्ही ऐकले आहे का ?
पंडित म्हणाला नाही. पण तथागत मी लोकांच्या चर्चे तून तसेच ऐकले आहे .तसे नसेल तर तुम्ही काय सांगता ?
तथागत म्हणाले मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो .
पंडित म्हणाला मला सोपे करुन सांगा .
मग तथागत म्हणाले माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत . ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो
१)डोळे २)कान ३)नाक ४)जीभ आणि ५)त्वचा
माणूस डोळ्यान बघतो,
कानान आवाज ऐकतो,
नाकान वास घेतो,
जीभेन चव घेतो,
आणि त्वचेन स्पर्श जाणतो .
या पंच ज्ञानेंद्रीयांपैकी कधी कधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो .
पंडित विचारतो कसे ?
पाणी डोळ्यान दिसत पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते . गोड की खारट कळायला जीभेची मदत घ्यायला लागते .
पंडित म्हणाला बरोबर. पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय ?
तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता ?
पंडित म्हणाला नाही.
याचा अर्थ हवा नाही असा होतो का ?
पंडित म्हणाला नाही .
हवा दिसत नसली तरी ती आहे .कारण तिच आस्तीत्व नाकारता येत नाही ,आपण श्वासोच्छवास करताना हवाच आत-बाहेर सोडतो. वा-याची झुळूक आली की आपल्याला जाणवते. झाड, पान हवेन हलतात ते दिसत.
तथागत म्हणाले, आता मला सांगा देव तुम्हाला पंच ज्ञानेंद्रीयांनी जाणवतो का ?
पंडित म्हणाले नाही .
तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे ?
पंडित- नाही.
तुमच्या आईवडलानी पाहिल्याच सांगितलंय ?
पंडित- नाही.
मग पूर्वजांन पैकी कुणी पाहिल्याच ऐकलत ?
पंडित -नाही.
मग तथागत म्हणाले, आजवर कुणीच पाहिल नाही .
आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रीयांनी जे जाणता येत नाही ते सत्य नाही. त्याला गृहीत धरायच नाही.त्याचा उपयोग नाही.
ज्ञानी पंडिताला ब-या पैकी पटायला लागल होत, तरी त्यान प्रश्न विचारला…
.तथागत ठिक आहे, पण मग आपण जीवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?
तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही .
पंडित म्हणाला, हो. बरोबर आहे.
मग तथागत म्हणाले, मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय ?
पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो .
मग मला सांगा आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो ?
पंडित -आत्मा शरीर सोडतो.
का सोडतो आत्मा शरीर ?
कंटाळा आला म्हणून ?
पंडित-माणसाच आयुष्य संपल्यावर.
तथागत म्हणाले, तस असेल तर सगळी माणस शंभर वर्ष जगली पाहिजे .
अपघात , आजार झाल्यावरही उपचार न करता जगली पाहिजे ,
पंडितजी -तथागत बरोबर आहे तुमच .पण माणसात जीव आहे त्याला काय म्हणाल ?
तथागत म्हणाले तुम्ही पणती पेटवता , त्यात एक भांड ,भांड्यात तेल, तेलात वात असते. ही वात पेटवायला अग्नी देता .बरोबर ?
पंडित - बरोबर .
मग मला सांगा वात कधी विझते ?
पंडित -तेल संपत तेंव्हा .
तथागत -आणखी ?
पंडित -तेल आहे पण वात संपते तेंव्हा.
तथागत-आणखी ?
पंडितजी काहीच बोलले नाहीत.
तेंव्हा तथागत म्हणाले पाणी पडले , वारा आला ,पणतीच फुटली तर पणती विझु शकते. मानव देह ही एक पणती समजा .आणि जीव म्हणजे आग (उर्जा )
सजीवाचा देह चार तत्वांनी बनलेला आहे .
१) पृथ्वी -घनरुप पदार्थ (माती)
२) आप -द्रवरुप पदार्थ (पाणी ,स्नीग्ध तेल )
३) वायु - वारा
४) तेज -उर्जा, उष्णता
या चार पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो . उर्जा बनण थांबते .
यालाच म्हणतात माणूस मरणे .
आणि
सजीव माणूस मेल्या नंतरचा जो आत्मा आहे, तुम्ही म्हणता तो देवा सारखाच अस्तीत्वहीन आहे .
देव आहे की नाही, आत्मा आहे की नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवीत नाही .
धम्म माणूस जन्मल्यापासून मरे पर्यंत माणसान कस जगाव याच मार्गदर्शन करतो. काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो. धम्म जीवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो आणि जीवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळ नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो .
अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म.
जगातील कुठल्याही मानवाला मार्गदर्शक आहे .
सोमवार, ८ मे, २०१७
बी positive
1) एक मुलाने २० वर्षानंतर त्याच्या एका मित्राला मर्सिडीज चालवताना पाहिलं. त्याला स्वतःबद्दल खुप वाईट वाटलं, की तो आयुष्यात नापास झाला आहे.
पण
त्याला हे माहित नव्हतं की तो मित्र त्या गाडीवर ड्रायव्हर होता व तो त्याच्या बॉस ला घ्यायला निघाला होता.
2) एक स्त्री तिच्या नवऱ्यावर नाराज होती की तो अजिबात रोमॅन्टिक नाही, त्याने गाडीतून उतरताना तिच्यासाठी दरवाजा उघडावा जसा तिच्या मैत्रीणीचा नवरा उघडतो.
पण
तिला हे माहीत नव्हतं की मैत्रीणीच्या गाडीचा दरवाजा खराब आहे व तो फक्त बाहेरूनच उघडला जातो.
3) एक व्यक्ती शेजारील घरातील तीन मुले खेळताना बघून नाराज होत होता की त्याला फक्त एकच मुलगा आहे.
पण
त्याला हे माहीत नव्हतं की त्या तीन मुलांपैकी एक दुर्धर रोगाने आजारी आहे व बाकीची दोन मुले दत्तक घेतलेली आहेत.
आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकाच तराजूत मोजली नाही जाऊ शकत. म्हणून बाकीच्या लोकांकडे बघून तुमच्या आयुष्याबद्दल तक्रार करू नका.
कारण तुम्हास हे माहीत नसेल की इतरांपेक्षा तुम्हीच जास्त नशीबवान असू शकता.
तुम्ही जसे आहात तसेच आयुष्य मजेत घालवा कारण तुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे.
आनंद हा माझ्याकडे सर्वकाही आहे यातून येत नसून, माझ्याकडे जे आहे त्यातून सर्वोत्तम काय मिळेल यामध्ये आहे.
रविवार, ७ मे, २०१७
रविवार, ३० एप्रिल, २०१७
गावगाडा
*व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;*
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
*कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्व
आपणास आवश्यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
* *गाव नमुना नंबर - 1* - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
* *गाव नमुना नंबर - 1अ* - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
* *गाव नमुना नंबर - 1ब* - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 1क* - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
* *गाव नमुना नंबर - 1ड* - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 1इ* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 2* - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 3* - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
* *गाव नमुना नंबर - 4* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 5* - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 6* - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 6अ* - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 6क* - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 6ड* - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 7* - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 7अ* - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 8अ* - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 8ब, क व ड* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 9अ* - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 10* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 11* - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 12 व 15* - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 13* - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 14* - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 16* - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 17* - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 18* - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
* *गाव नमुना नंबर - 19* - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 20* - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
* *गाव नमुना नंबर - 21* - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते .