एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, ८ जानेवारी, २०१७

मी पाहिलेले बाबासाहेब


श्री. गारोल सांगतात, बाबासाहेबांचे दिल्लीत महापरिनिर्वाण झाले त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा औरंगाबादहून शेकडो लोक गेले होते. मला मात्र काही कारणास्तव जाता आले नाही, याची आजही खंत वाटते.

अचानक वर्गात जाऊन शेवटच्या बाकावर बसून शिकवणे ऐकायचे-  शिवराम जाधव मिलिंद महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असताना बाबासाहेब औरंगाबादला यायचे. तेव्हा मला आज त्यांची सेवा करण्याचा योग आला. याचा आज खूप आभिमान वाटतो.

बाबासाहेब औरंगाबादला आसताना त्यांची जेवणाची, चहा, नाश्‍त्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. त्यांना नाश्‍त्यामध्ये चहा आणि सोबत चणे आवडायचे. त्यांना अगदी साधं जेवण आवडायचं. मेथीची भाजी आणि भाकर खूप आवडीने खायचे. चहा पिताना, नाश्‍ता करताना इतकंच काय जेवतांनासुद्धा त्यांच्या हाती पुस्तक असायचे आणि वाचन सुरू राहायचं इतकी वाचण्याची त्यांना आवड होती. त्या वेळी त्यांना वयोमानाच्या तक्रारीमुळे जिना चढताना आणि उतरताना त्रास व्हायचा म्हणून मी आणि इतर दोघे-तिघे आम्ही त्यांना खुर्चीमध्ये बसवून वरच्या माळेवर नेणं-आणणं करीत. कॉलेजच्या बांधकामावर त्यांची बारकाईने नजर राहायची. ते फिरून फिरून कॉंट्रॅक्‍टरला आवश्‍यक त्या सूचना करायचे. मी त्यांच्या डोक्‍यावर छत्री पकडून त्यांच्या मागून चालायचो.

त्या वेळी कॉलेजची माहिती इतरांनाही मिळावी यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले होते, की रेल्वेस्टेशन, बसस्टॅंडवर जाऊन कॉलेज कुठे आहे, कसे आहे, याची माहिती तिथे उपस्थित असलेल्या लोकांना द्यायची. आम्ही कित्येक दिवस त्या ठिकाणी जाऊन कॉलेजची माहिती सांगण्याचे काम केलं.

कॉलेजमधील प्राध्यापकांना खाण्यापिण्याच्या त्रास होऊ नये, यासाठी कॉलेजच्या परिसरात एक कॅंटिन काढून मला चालवण्यास दिले. कॉलेजच्या टाईमटेबलची एक प्रत माझ्याजवळ असायची. बाबासाहेबांना जेव्हाही राऊंड घ्यावसा वाटायचा तेव्हा ते मला बोलावून कुठल्या वर्गावर कुणाचा पिरीएड आहे, याची चौकशी करीत. नंतर ते एखाद्या वर्गावर निरीक्षणासाठी जात. वर्गात शेवटच्या बाकावर बसून प्राध्यापकाच्या शिकवणीचा आढावा घेत. सांगायचं तात्पर्य असं, की आपल्या मुलांना कसं शिक्षण दिलं जातयं याकडे ते जातीने लक्ष देत. मुलांना उत्तमोत्तम शिक्षण मिळायला हवं, त्यांना स्वाभिमानाने जगता यावं एवढी त्यांची इच्छा असायची. शिकणाऱ्या प्रत्येक  मुलाने सामाजिक ऋण फेडावेत, अशी त्यांची इच्छा असे. आपल्या मुलांनी सन्मानाने जगावं, गुलामगिरी नाकारावी, खूप मेहनत करून यश प्राप्त करावे, यासाठी ते धडपडत असत.

माझ्या आयुष्याचा एक प्रसंग सांगतो. एकदा नेहमीप्रमाणे बाबासाहेबांचं दुपारचं जेवण झालं. ते बाहेरच्या खोलीत जाऊन बसले. मी बाबासाहेबांचं उष्ट ताट उचललं. ताटामध्ये थोडं अन्न शिल्लक होतं. सवयीप्रमाणे मी त्यातले घास तोंडात टाकले. इतक्‍यात बाबसाहेब तिथे आले. मला उष्ट्या ताटातून खताना बघून त्यांना राग अनावर झाला. रागारागात त्यांनी माझ्या गालावर सनकन्‌ एक झापड लगावली. माझे डोळे भरून आले. मी स्तब्ध उभा राहिलो. त्या वेळी बाबासाहेब बोलले. अरे, तुम्ही चांगलं राहाव, शिकावं म्हणून मी जिवाचं रान करतोय आणि तुम्ही अजूनही उष्टावळ चाटणे सोडल नाही, केव्हा तुम्ही सुधारणार त्या वेळेस मला माझी चूक उमजली. असे होते बाबासाहेब, बाहेरून जितके कडक मनातून त्याहीपेक्षा हळवे आणि प्रेमळ शिस्त आणि स्वाभिमान असल्या मरगळलेल्या मनात रुजणारे त्यांच्या ज्ञानाची ज्योत पेटविणारे, शिक्षणाची द्वरे त्यांच्यासाठी उघडणारे अशा थोर पुरुषाची सेवा मला तरावयास मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो.

बाबासाहेबांच्या या आठवणी आयुष्यभर माझ्या सोबतीला राहतील. जी थोडीफार त्यांची सेवा करण्यास मिळाली त्याबद्दल माझं मन आजही ऋणी आहे. आज मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे समाधानी आहे. बाबासाहेबांच्या आठवणी माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत माझ्याशी एकरूप राहतील.

धन्यवाद - सकाळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा