एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

जेवण आणी राशीचे स्वभाव'*

*"जेवण आणी राशीचे स्वभाव'*


थोडेसेच जेवण का असेना
*मेष* आवडीने खाणार..
गरम, चमचमीत पदार्थांवर
यांची पहिली नजर जाणार.. ।।१।।

*वृषभे*ची व्यक्ती दिलखुलास पणे
दाद देऊन जाते..
लोणची-पापडासारखे पदार्थही
अगदी चवीचवीने खाते.. ।।२।।

कधी मारुनी मिटक्या,
कधी नन्नाचा चाले पाढा..
*मिथुना*चे कौतुक मधाळ
तर टीका कडवट काढा.. ।।३।।

'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणत
*कर्के*चे होते पूर्ण जेवण..
रुचकर पण थंड अन्नही हे
कसे पटकन करतात सेवन? ।।४।।

राजस जेवणाच्या *सिंहेचा*
केवढा राजेशाही थाट..
थोड्याथोड्या सर्वच पदार्थांनी
यांचे भरुन जाते ताट.. ।।५।।

'कमी-जास्त नाही ना?'
याची उगाच बाळगून भीती..
इतरांकडे पाहून ठरते
*कन्येची* जेवायची नीती.. ।।६।।

भात-भाजी-आमटीबरोबर
पचतील तेवढ्याच पोळ्या..
अशा संतुलित आहारानंतर
*तूळ* खाते पाचक गोळ्या.. ।।७।।

काही Missing आहे का
कधी कळतही नाही..
साधे नेहमीचेच जेवण
पण *वृश्चिकेला* रुचत नाही.. ।।८।।

कधी पटपट-झटपट जेवण
तर कधी अगदीच वेळकाढू..
*धनू* काढत नाही जेवताना खोड्या
पण वेळ मिळताच संधीसाधू.. ।।९।।

ना कधी कौतुक
ना कसली नकारघंटा..
गपगुमानं जेवतो *मकर*
करत नाही कधी थट्टा.. ।।१०।।

निश्चित वेळ जेवणाची
पार्टी असो वा एखादे लग्न..
*कुंभेची* चिकित्सक वृत्ती
नेहमी रेसिपी जाणण्यात मग्न.. ।।११।।

कधी-कुठेही जमते
*मीनेची* खाण्याशी गट्टी..
पोटभर खाताना घेतात
'डाएट' नावाशी कट्टी.. ।।१२।।

😄😋आहे ना गंमत ! 😛😋

स्वतःची रास तपासून बघा😝😝😝

असा असेल हा महिना

*असा असेल आश्विन / आँक्टोबर महिना*--
--------------------------
१ आँक्टोबर- आश्विन मासारंभ/
                      घटस्थापना
------------------------
११ आँक्टोबर -विजयादशमी/दसरा
-------------------------
१२ आँक्टोबर- मोहरम
 ------------------------
 १६ आँक्टोबर- पौर्णिमा
-----------------------
 १९ आँक्टोबर - संकष्टी चतुर्थी
------------------------
 २८ आँक्टोबर  - दीपावली प्रारंभ
                        धनत्रयोदशी
------------------------
२९ आँक्टोबर- नरक चतुर्दशी
-------------------------
३० आँक्टोबर- लक्ष्मीपूजन/आमावस्या
---------------------------
३१ आँक्टोबर- बलिप्रतिपदा/
--------------------------
१ नोव्हेंबर - भाऊबीज
---------------------------

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

🔆 _*हातानेच कां जेवावे ???*_ 🔆

☀🔆   _*हातानेच कां जेवावे ???*_  🔆☀

पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून आजकाल लोकं हाताऐवजी चमच्याने जेवतात. आणि या प्रकारे जेवताना स्वत:ला श्रेष्ठ समजतात. मात्र आपल्या संस्कृतीमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असून त्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. आयुर्वेदाप्रमाणे आमचे शरीर पंचतत्त्वांनी निर्मित झाले असून हाताच्या प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एका तत्त्वाचे अस्तित्व आहे.

👉अंगठा- अग्नी
👉तर्जनी- वायू
👉मध्यमा- आकाश
👉अनामिका- पृथ्वी
👉कनिष्का- पाणी

जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा पाची बोटांना आपसात जोडून तोंडात घास भरतो, याने पंचतत्त्वांचा समतोल होत असून शरीराला मिळणारं अन्न ऊर्जा देणारं असतं. हाताने जेवल्याने आमचा मेंदू आमच्या पोटाला अन्नग्रहण करण्याचा इशारा देतो ज्याने पचन क्रिया सुधारते.
हाताने जेवताना आमचं सर्व लक्ष खाण्यावर केंद्रित असल्याने शरीराला मिळणारी पोषकता वाढते.

याव्यतिरिक्त हाताने जेवण केल्याने तोंड भाजण्याचा धोकाही कमी होतो. कारण अन्नाला स्पर्श केल्याने पदार्थ अतिशय गरम तर नाही याचा अंदाज येतो.

☀🔆☀🔆☀🔆☀🔆☀🔆☀

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

आयुष्याचा मूलमंत्र

एकदा एका राजाचा हत्ती अचानक लंगडायला लागला. बरेच वैद्य, उपचार झाले पण हत्तीच्या चालण्यात काही फरक पडेना. राजा खूपच चिंताग्रस्त झाला. याच दरम्यान त्या नगरीत भगवान बुद्धांच्या भिक्खूसंघाचे आगमन झाले होते. त्यामुळे कोणीतरी राजाला हत्तीच्या लंगडण्याविषयी भगवान बुद्धांना भेटण्याचा सल्ला दिला. राजाने तथागतांची भेट घेतली.

भगवान बुद्धांनी परिस्थिती पाहिली आणि हत्तीचा माहुत बदलण्यास सांगितले. तथागतांचा उपदेश मानून राजाने माहुत बदलला आणि काय आश्चर्य? हत्ती व्यवस्थित चालू लागला. राजाला आश्चर्य वाटले. राजाने तथागतांना विचारले, तथागत अनेक वैद्यांच्या औषधोपचाराचा हत्तीवर परिणाम झाला नाही. मात्र आपल्या केवळ उपदेशाने हत्ती व्यवस्थीत चालू लागला याचे रहस्य काय? तेव्हा तथागत म्हणाले, "रहस्य काहीच नाही, या हत्तीचा जो माहुत तो लंगडत चालत होता. आणि हत्ती त्याचे अनुकरण करत होता. त्यामुळे हत्तीचा माहुत बदलणे गरजेचे होते.

आपली अवस्था अशीच आहे. आपण सद्‌सद्‌ विवेक बुद्धीने विचार न करता अशा अनेक बाबींचे अंधानुकरण करीत आहोत, त्यामुळेच आपली वाटचाल लंगड्या हत्ती प्रमाणे सुरू आहे. आपली वाटचाल सुव्यवस्थीत होण्यासाठी आपला माहुत सदाचारी असला पाहिजे

---'तरुणांसाठी :--

1) अन्य जाती-धर्मांवर टिका
करत वेळ वाया घालवू नका.
ज्या लोकात जे चांगलं असेल
त्यांच्याकडून त्या गोष्टी
आत्मसात करा.💮

2) दंगली- मारामारी करुन आपलं
नाव खराब करुण घेऊ नका.
आता लढाईचा काळ
राहिलेला नाही.💮

3) फक्त उच्च शिक्षणच तुम्हाला आणि
तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
जीवन देऊ शकतं.💮

4) राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
त्यांचा मागे फिरू नका
तुम्ही फक्त वेळ वाया घालवत आहात.

5) आजचा तरुण एकमेकांना मदत
करुन प्रगती करू शकतो.
त्यासाठी राजकीय पक्षाची वा
नेत्याची गरज नाही.💮

6) इंग्लिश बोलायला शिका.
हा मराठीचा अपमान नाही काळाची गरज आहे.💮

"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल. .!!!

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

Life is good

*_किती वेगळं आहे ना!_*
*_पृथ्वीवर ८४ लाख जीव आहेत त्यापैकी मानवच धन कमवतो,*
*_पण दुसरा कोणताही प्राणी भुकेने कधीच मरत नाही,*
*_अन् मानवाच पोट कधीच भरत नाही ._*

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

गुरुजींचा सल्ला

काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.*

१.]   *कोथिंबीर* :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.

२.]   *कढीलिंब* ;-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.

३.]   *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.

४.]  *माठ*  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.

५.]  *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

६.]   *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.

७.]   *अळू*  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.

८.]  *अंबाडी* :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.

९.]  *घोळ* :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.

१०.]  *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.

११.] *मायाळू* :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात.

१२.]  *तांदुळजा* :-  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.

१३.]  *मेथी* :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.

१४.]    *शेपू* ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.

१५.]    *शेवगा* ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.

१६.]     *सॅलड* :-  या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

 (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

 किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

                   उपाय

     कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
      किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

यशस्वी जीवनाचे सूत्र


आयुष्यात स्वत:ला कधी
'उध्वस्त' होऊ देऊ नका. कारण
लोक 'ढासाळलेल्या' घराच्या
वीटा सुद्धा सोडत नाहीत..

संकटावार अश्या प्रकारे तुटून पड़ायच
की....
जिंकलो तरी इतिहास आणि
हरलो तरी
इतिहासच घडला पाहिजे..!

   

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

मैत्री असावी तर अशी

पाण्याने दुधासोबत मैत्री केली आणि दुधात एकरुप झाले .
दुधाने पाण्याची समर्पित वृत्ती पाहिली आणि म्हणाले,
'मित्रा तू स्वत्व त्यागून माझे स्वरुप धारण केलास...
आता मीं ही बघ कशी मैत्री निभावतो ते....आता तुझे मोल हे तुझे राहिले नाही ..आता बघ मी तुझे आणि माझे मोल समान करुन तुला माझ्या मोलाने विकतो.

आणि खरेच ते पाणी दुधात एकरुप झाल्यामुळे दुधाच्याच मोलाने विकले.

नंतर ते पाणीमिश्रीत दुध उकळण्यासाठी शेगडीवर ठेवले जाते.तेव्हा पाणी म्हणते ,' मित्रा तू माझे मोल वाढवून मैत्री निभावलीस...आता माझी पाळी आहे..आता मी तुझ्या अगोदर जळणार 'असे म्हणून पाणी दुधापासून अलग होऊन उडायला लागते.

आपला मित्र आपल्यापासून दुरावतोय हे लक्षात आल्यावर दुधाला उकळी येते आणि ते उकळते दुध पातेल्यातून खाली जाळावर पडून जाळ विझवण्याचा प्रयत्न करते.

दुध उकळू लागताच दुध तापवणारी व्यक्ती त्या दुधात थोडे पाणी शिंपडते...

...तेव्हा कुठे ते उकळते दुध शांत होते .!

नात्यांचेही असेच असते ..ते दुध आणि पाण्यासारखेच असतात. एकमेकांशिवाय जगूच शकत नाहीत .पण दुधात लिंबाचे चार जरी थेंब टाकले तर मात्र दुध आणि पाणी एका क्षणात अलग होतात.नात्यांचेही तसेच असते ,थोडासा जरी अविश्वास झाला तर नाती क्षणार्धात तुटून जातात. म्हणून आपल्या माणसांचा विश्वास कधीच तोडू नका.॥
कारण,

'नात्यांचा ताज़महाल ,विश्वासावर उभा असतो ।
संशयाचा छोटासा घावही त्याला ,जमीनदोस्त करुन टाकतो ॥
             🙏🙏🙏

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

नमस्कार

*नमस्कारचे* सुद्धा आता
*तुकडे पडलेत...*

जय जिजाऊ,
जय भीम,
जय भगवान,
जय मल्हार,
जय रोहिदास,
जय राणा.
सकाळ सुद्धा आता
जात घेऊनच उगवते...
शिवसकाळ,
भिमसकाळ,
लहूसकाळ.

*समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन,*
*हातात लेखणीची मशाल घेऊन, क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा  आता जात सांगून टाकतात...*

शिवकवी,
भीमकवी,
मल्हारकवी.

*वादळं* सुद्धा आता
*जात* घेऊन येतात

भगवं वादळं,
निळं वादळं,
हिरवं वादळं,
पिवळं वादळं.

*रंगात* विभागलेत आता
पाऊस,वारा,वादळं,
शहरातली दुकाने
अन्...
गावच्या वेशीसुद्धा

पण ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*रक्ताचा रंग मात्र*
*अजूनही लालच...*💥💥🙏🏼
*कडू आहे पण सत्य आहे*

एकीचे बळ

काल एका फळ विक्रेत्याकडे थांबलो होतो. मी विचारले, "आज काय भाव आहे द्राक्षांचा..?" तो म्हणाला, "साठ रूपये किलो." जवळच सुट्टी द्राक्षे ठेवलेली होती. मी त्याला विचारले, "ह्यांचा काय भाव आहे..?" तो म्हणाला, "पंचवीस रूपये किलो." मी त्याला विचारले, "इतका कमी का..?" तो म्हणाला, "साहेब, ही खुप चांगली द्राक्षं आहेत. पण आपल्या घडातुन तुटलेली आहेत."  मी समजून गेलो.. आपल्या जवळच्यांपासून वेगळे झाल्यावर आपली 'किंमत' अर्ध्याहून कमी होऊन जाते..

म्हणून एकसंघ रहा.

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

शुभ विचार



*बी* *फोडले* तर हाती काहीच लागत नाही , पण तेच बी जर *जमीनीत* *पुरले*तर त्यातून हजारो *नवीन* *बियांचे* दाणे तयार होतात....

*विचारांचेही* तसेच आहे.
आपण आपल्याजवळ असलेले
*चांगले* *विचार* एखाद्याच्या मनात *रुजविण्यात* यशस्वी झालो तर *चांगला* *विचार* करणारी
*हजारो* *माणसं* निर्माण होतील

🍁

गावाकडच्या गोष्टी

देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होत....

"उपवास करून जर
देव खूश होत असेल
तर या जगात कित्येक
दिवस उपाशी पोटी
असणारा भिखारी हा
सर्वात जास्त सुखी राहिला
असता.

‬: देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की
आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि
स्वतःला लाथही मारू शकत नाही.
म्हणूनच.. माणसाच्या जीवनात
"हितचिंतकांची"
आणि
"निंदकांची"
आवश्यकता आहे....
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन् वेळेला तुमचा आरसा बनतील,........
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.,,,,
🐾पूजा करायच्या आधी …….❕
👍विश्वास ठेवायला शिका.....❗
👄बोलायच्या आधी….❕
👂ऐकायला शिका............❗
🎁खर्च करायच्या आधी….❕
💰कमवायला शिका.......❗
📝लिहायच्या आधी ……❕
😇विचार करायला शिका......❗
हार मानण्याआधी.....❕
👏प्रयत्न करायला शिका
आणि मरायच्या आधी .....❗
जगायला शिका......❕
🙏  .......❕❕

जीवनात एवढ्याही चुका करू नका,
कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि ........
     रबराला एवढाही वापरू नका,
     की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.
🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे....
   
 आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच
घमेंड करू नये,
कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात
त्या नक्कीच संपत असतात ...

" मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य"

1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत
2:-"समाज" स्मशाना पर्यंत
3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत

      फक्त आणी फक्त
              "कर्म"
          ईश्वरा  पर्यंत

जिच्या उदरात जन्म होतो ती माता,
आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती.
यातील वेलांटीचा फरक  म्हणजेच माणसाचे जीवन......