एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

नमो बुद्धाय

जगातील सर्वात महान व्यक्तिमत्व
जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती
जगभरात १ अब्ज ८० कोटी अनुयायी

‘बुद्ध’ हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वत: वर विजय मिळवलेला आणि स्वत: उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वत: सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.

आज सर्वच खंडांत भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. जगभरातील बुद्ध अनुयायांची लोकसंख्या ही १८० कोटी ते २१० कोटी आहेत.अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी तथागत बुद्धांना (१.८ अब्ज) लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी हिंदू धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (२.३ अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत.

मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, ‘‘बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.’’

शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव .गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध साहित्यानुसार, त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते. लोक कथेनुसार शुद्धोदन हे #सूर्यवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते.  इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधी वृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

भगवान बुद्ध या प्रथम "धम्मचक्र प्रवर्तन" सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्र्यात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दुःख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.

ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टीकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात बौद्ध धर्माच्या उदयाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. बौद्ध धर्माचा विकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्यास्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, व (लेणी) ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ ११०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषत: धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे.

भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे.

महान बौद्ध विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे हे दोनच आर्यसत्ये महत्त्वाची आहेत. पहिले - दुःख आहे आणि शेवटचे प्रतिपद् - दुःख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग आहे.

१. शील

धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार. त्या वेळचे जे काही मत – मातावलंबी होते ते जवळपास सर्व शीलाचे महत्व स्वीकारीत असत. जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मल ठेऊन वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करते तेंवा सुख तिच्या मागे तसेच लागते जसे की कधी तिची साथ न सोडणारी तिची सावली.

२. समाधी

शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वंश करणे आवशक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचार पासून वाचू शकतो व सदचार्नाकडे वळू शकतो ह्यासाठी समाधी महत्वपूर्ण आहे. आपल्या मनाला वंश करण्यासाठी त्यांनी सार्वजनीक उपाय सांगितला. येणार्‍या – जाणार्‍या सहज स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवत राहा. म्हण जसे भटकेल, तसे त्याला श्वासाच्या जाणीवेवर घेऊन या. यालाच समाधी असे म्हणतात.

३. प्रज्ञा

सहज स्वाभाविक श्वासाच्या सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेंव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोन्तिना कोणती संवेदना मिळू लागते. त्या नंतर ती सार्‍या शरीरात पसरते. ह्यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोण इतरांची देणगी नसते, स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाची देणगी असते. म्हणूनच हे परोक्ष ज्ञान नाही. प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच यास प्रज्ञा असे म्हणतात.

१. जेव्हापर्यंत वज्जी ( Vajji ) अखंडपणे एकत्र जमत राहतील, विशाल संख्येने ऐक्य राखतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल, र्‍हास होणार नाही.

२. जेव्हापर्यंत ते एकत्र जमत राहतील, एकजुटीने बैठकीतून उठतील, आणि एकजुटीने वज्जींच्या प्रजेच्या प्रती त्यांची असलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही..

३. जेव्हापर्यंत ते कायदा म्हणून न ठरविलेल्या गोष्टींना कायदा म्हणून अमलात आणणार नाहीत, कायदा म्हणून ठरविण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत, आणि पूर्व परंपरेने ठरविलेल्या कायद्या प्रमाणे वागतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही.

४. जेव्हापर्यंत वडिलधार्‍या लोकांचा ते मान राखतील आणि त्यांचा सल्ला ते नेहमी ऐकतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही.

५. जेव्हापर्यंत महिलांना आणि तरुणींना जबरदस्तीने आणून आपल्या घरामध्ये ठेवणार नाहीत, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही.

६. जेव्हापर्यंत ते गावात असलेल्या किंवा गावाबाहेरच्या चैत्यांचा गौरव करतील व सर्व धर्म कर्तव्ये पार पाडतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही.

७. जोपर्यंत ते अर्हन्तांचे रक्षण करतील, त्यांच्या राज्यात अर्हंत सुखात राहतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल र्‍हास होणार नाही.

दहा पारमिता ह्या शील मार्ग अाहेत..

१) शील

शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.

२) दान

स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्‍याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.

३) उपेक्षा

निरपेक्षतेने सतत प्रयत्‍न करीत राहणे.

४) नैष्क्रिम्य

ऐहिक सुखाचा त्याग करणे.

५) वीर्य

हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.

६) शांती

शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.

७) सत्य

सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.

८) अधिष्ठान

ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.

९) करुणा

मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता.

१०) मैत्री

मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.[१९]

पंचशील

१) मी जीव हिंसेपासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
२) मी चोरी करण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
३) मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
४) मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
५) मी मद्य, मादक गोष्टी तसेच इतर मोहांत पाडणार्‍या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.

या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर आपण जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो.

१) बौद्ध तत्त्वज्ञानाचा हिंदू धर्मावरील प्रभाव

बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा (non-voilence) तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले.

२) वैचारिक स्वातंत्र्य

वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला.

३) सद्गुणांचा विकास

बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम व मादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे.

४) समता तत्त्वाचा प्रभाव

तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जाह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता (equality) प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदूसमाजरचनेवर प्रभाव पडला.

५) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास

विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनबिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे.

६) नैतिक सिद्धान्ताचा प्रभाव

करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म आहे.

७) बौद्ध धर्माचे कलेतील योगदान

वास्तुविद्या, लेण्यांचॆ आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुफा) -खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली.

बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्र्‍याभ्र रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे.

८) स्थानिक भाषेतील साहित्यविषयक योगदान

बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे.

९) शिक्षणास प्रोत्साहन

बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व बौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खू हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला.

१०) भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार

बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ सर्वच देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. जगातील प्रत्येक देशांत बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

११) आर्थिक विकासाला प्रोत्साहन

बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. #जगाच्या एकूण #अर्थव्यस्थेत #सर्वाधिक म्हणजेच #३४% वाटा हा #सम्राट #अशोकाच्या #साम्राज्याचा होता. आज भारताचा जागतिक अर्थव्यस्थेतील वाटा कमी असला तरी चीन व जपान हे दोन बौद्ध राष्ट्रे जागतिक अर्थव्यस्थेत अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानी आहेत.

भारतीय संस्कृती ही बौद्ध संस्कृती आहे. ही संस्कृती नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरियाआदी देशात पसरली. तेथे गौतम बुद्धांचे अनेक विहारे व पुतळे निर्माण केले गेले. तथागत बुद्ध यांच्या सिंह मुद्रा, ध्यानस्थ मुद्रा, पद्मपाणी मुद्रा, आशीर्वाद मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, उभी मुद्रा, अभय मुद्रा इत्यादी मुद्रा प्रसिद्ध आहेत. पुणे येथे त्यासंबंधी एक 'आर्य नागार्जुन' संग्रहालयही आहे. ते पुण्यातील बुद्ध संस्कृती आणि संशोधन संस्थेतर्फे चालविले जाते.

बौद्ध साहित्य

गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार जेथे झाला ते गंगा नदीचे खोरे ह्याच भागात गौतम बुद्धांनी आपले प्रारंभिक भ्रमण केले होते.

गौतम बुद्ध यांच्या महितीचा मुख्य स्रोत म्हणजे बौद्ध वाङ्मयहोय. बुद्ध व त्यांचे शिष्य प्रत्येक वर्षी चार महिने त्यांच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आणि त्यानंतर एका शतकानंतर, अनुयायांनी एक पहिली बौद्ध धम्म परिषद(धम्मसंसद) बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. कांही नियम पाळीत, हे साधू बुद्ध-जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधूकडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, ऐतिहासिक ठेवा पिढ्यान्‌पिढ्या पुढे चालत राहिला.[२१]उपलब्ध पुराव्यानुसार, दुसऱ्या संसदेदरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धांची शिकवण लेखी रूपात येण्यासाठी बुद्ध महापरिनिर्वाणानंतर तीन ते चार शतके जावी लागली.

एकूण भारतीय विचारसरणीनुसार, सनावळ्या किंवा तारखा यांना विशेष महत्त्व न देता, तत्त्वज्ञानास केंद्रस्थान दिले जाते. यालाच अनुसरून, गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या तारखांच्या नोंदीऐवजी त्याच्या शिकवणुकीला अधिक विशद करण्यात आले. या नोंदींमध्ये तत्कालीन भारतीय समाज जीवनाचे व चालीरितींचे चित्रण आढळते.

गौतम बुद्ध व बौद्ध धर्माविषयी जागतिक विचारवंत व जगप्रसिद्ध व्यक्तींची मते खालिल प्रमाणे आहेत.

भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सदाचार शिकवणारा पहिला महापुरूष भगवान बुद्ध होय.

— डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर.

— तुकडोजी महाराज

शाक्यमुनी गौतम बुद्धांखेरीज संपूर्ण मानवजातीत येशू ख्रिस्तांएवढा थोर पुरूष दुसरा झाला नाही.

— रेनन, प्रसिद्ध ख्रिस्तपंडित

जगातल्या सर्व धर्म संस्थापकास भगवान बुद्ध हेच फक्त असे थोर होते की, जे आपली मुक्तीसाध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खर्‍या थोर माणसाचे मोठेपण सामावले असेल तर खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल? बुद्धांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न करता प्रज्ञा (ज्ञान) व मैत्रीच्या (प्रेम) शिखरावर (त्याला) प्रस्थापित करून श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले आहे.

— ड्वाईट गोडार्ड

कलियुगी हरी बुद्ध रुपधरी ।

तुकोबा शरीरी प्रवेशला ।।
— संत बहिणाबाई

एकोनी बंका करित उत्तर ।

बौद्ध अवतार पांडुरंग ।।
— संत बंका महार

बुद्ध अवतार माझीया आदृष्टा ।

मौन्य मुखे निष्ठा धरियली ।

तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध |
शुद्ध त्याशी शुद्ध बुद्ध व्हावे ||
— संत तुकाराम

बुद्ध अवतारी आम्ही झालो संत ।

वर्णवया मात नामा म्हणे ।
— संत नामदेव

“बुद्धांच्या ह्रदयाचा एक लक्षांशही मला लाभला तर मी स्वत:ला धन्य मानले असते.”

— स्वामी विवेकानंद

“अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरूष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशूहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखवली.”

— स्वामी विवेकानंद

“बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नाही.”

— स्वामी विवेकानंद

माझ्या मतानुसार बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसर्‍या कोणत्याही धर्माची त्याचेशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, असे माझे माझे पक्के मत सर्व धर्मांचा २१ वर्षे सखोल अभ्यास केल्यावर झाले आहे.

— डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“भविष्य काळातील धर्म हा वैश्विक धर्म असेल, तो व्यक्तिगत शरिरधारी ईश्वराच्या पलिकडचा, ठाम निश्चित अशा परंपरेने पाळत असलेल्या मतप्रणाली, तसेच पराप्राकृतिक ईश्वराचा शोध घेणार्‍या शास्त्रांना बाजूला ठेवणारा असेल. विज्ञानाच्या गरजांची जर कोणता धर्म परिपूर्ती करीत असेल तर तो फक्त बौद्ध धर्म आहे.

— अल्बर्ट आईन्स्टाईन

बौद्ध धर्मातील नैतिक आदर्श पुरूष जो अर्हत, तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे. तो तत्त्वज्ञ, तसाच श्रेष्ठतम सदाचारीही असला पाहिजे. बौद्ध धर्मात ज्ञान हे मुक्ती (निर्वाण) साठी अनिवार्य मानले गेले आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक कारण आहे. (दुसरे कारण लोभ किंवा तृष्णा होय.) ह्या उलट ख्रिश्चन आदर्श पुरूषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. जगातल्या दु:खापैकी पुष्कळशी दु:खे दृष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत.

— डब्ल्यू. टी. स्टेस, ग्रंथ - बौद्ध धर्माचे नीतीशास्त्र (Buddhism Ethics)

बौद्ध धर्माइतका दुसर्‍या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या श्रेष्ठत्वावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आला नाही. आपली दृष्टी स्पष्ट असण्याबाबत बौद्ध धर्माव्यतिरीक्त कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी (चित्त संस्कारासाठी) इतकी सखोल योजना प्रस्तुत करण्यात आली नाही.

— ई. जे. मिल्स, ग्रंथ - बौद्ध धर्म (Buddhism)

बौद्ध धर्माचे आध्यातमिक तत्त्वज्ञान हीतकारक सामर्थशाली देणगी आहे, बौद्ध धर्माप्रमाणे युनिटेरिअनख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ किंवा मतप्रणालीची बाह्य शक्ती नाकारून मानवाला अंतर्यामी असलेल्या मार्गदिपाचा अधिकार मान्य करतात. युनिटेरिअन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त व तथागत बुद्ध हे जीवनाचे सर्वोच्छ भाष्यकार आहेत असे मानतात.

— रेव्हरँड लेस्ली बोल्टन, युनिटेरिअन ख्रिस्ती पाद्री

आधुनिक विज्ञान हे बौद्ध धर्मातील अनित्यता आणि अनात्मवादाच्या सिद्धांताचे प्रतिध्वनी होय.

— डॉ. रंजन रॉय

दीर्घकाळापर्यंत मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजवला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वत:च्या तत्वानुसार स्वशासनाचा स्विकार करावा. बौद्ध धर्म यात जगातील पहिली नैतिक विचारधारा आहे. जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन (स्वशासन) करण्याची शिकवण दिलेली आहे. म्हणूनच प्रगतीशील जगाला ही सर्वोच्छ शिकवण देण्यासाठी बौद्ध धर्माची आवश्यकता आहे.

— इ. जी. टेलर, ग्रंथ - बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा (Buddhism and Modern Thought)

जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, तेव्हा कोट्यवधी संवत्सरांतील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेली उत्क्रांतीची गाथा वाचतो, जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा ईश्वर प्रेमरूप आहे हे मत किती भसवे आहे याची जाणिव होते. बुद्धाचा धर्म हा कितीतरी निराळा धर्म आहे.

— विनवुड रीड, ग्रंथ - मानवाचे हौतात्म्य (Martyrdom of Man)

बौद्ध धर्माने मानवात प्रछन्न असलेल्या अंत:सामर्थ्यांच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले. वेदांमध्ये आपणांस प्रार्थना, पुजा, प्रशंसा आढळते. बौद्ध धर्मात प्रथम सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी चित्ताच्या (मानसिक) संस्काराचे महत्त्व सांगितल्याचे आढळते.

— आर. जे. जॅक्सन

बौद्ध धर्म एक अदभुत धर्म नि तत्त्वज्ञान आहे.

— मार्क झुकेरबर्ग

ऐतिहासिक थोर धर्मांपैकी मी बौद्ध धर्माला पसंत करतो.

— बर्ट्रांड रसेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा