एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, २१ जुलै, २०१७

प्रयत्नांती यश प्राप्ती

*नक्की वाचा*
"धीरूबाई अम्बानी" Great think...
एकदा धीरूभाई अम्बानी एका अर्जेंट मिटिंग साठी जात होते.
वाटेत सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला. ड्राइवरने अम्बानींना विचारले, 'आता काय करू?'
त्याला अम्बानींनी उत्तर दिले -- तू गाडी चालवत रहा.
पावसा मध्ये गाडी चालवणे मुश्किल होत होते. परत ड्राइवरने विचारले, 'आता काय करू?' त्याला अम्बानी म्हणाले 'तू गाडी चालवत रहा'.
थोडे पुढे गेल्यानंतर ड्राइवरने पाहिले की वाटेत पावसा मुळे अनेक वाहने थांबली होती. ड्राइवरने अम्बानींना सांगितले, 'मला आता गाडी थांबवायला हवी' पुढचे दिसतांना खूप अवघड जाते. सर्व लोक गाड्या बाजूला घेऊन थांबलेत.
आता काय करू?
त्याला अम्बानींनी पुन्हा सांगितले 'तू थांबू नको हळू हळू तुला जमेल तशी गाडी चालवत रहा'.
पावसाने रौद्र रूप धारण केले होते. परंतु ड्राइवरने गाडी चालूच ठेवली होती.
आणि थोडे पुढे गेल्यावर ड्राइवरला समोरचे साफ दिसायला लागले. पुढे काही अंतर गेल्यावर पाऊस पूर्ण पणे गेला होता. पुढे तर ऊन पडले होते.
धीरूभाई अम्बानी ड्राइवरला म्हणाले 'आता तू गाडी थांबवू शकतोस'.
ड्राइवर म्हणाला आता कशाला?
धीरूभाई म्हणाले थांबव तर खरे. त्याने गाडी थांबवल्यावर ते स्वतः गाडीतून उतरले आणि म्हणाले, तू बाहेर ये आणि मागे वळून बघ. आपण जिथे आहोत तिथे पाऊस अजिबात नाही आहे. इथे तर चक्क ऊन पडले आहे. वाटेत थांबलेले लोक अजूनही तिथेच फसले आहेत आणि तू प्रयत्न न सोडता हळू हळू गाडी चालवत राहिलास आणि आता त्या धोक्यातून आपण पूर्ण पणे बाहेर पडलो. तू धीर खचून तिथेच थांबला असतास तर अजून खूप वेळ तिथेच थांबावे लागले असते.
हा किस्सा त्यांच्या साठी आहे जे आत्ता वाईट परिस्थितून जात आहेत.
कठीण काळी खूप माणसे प्रयत्न सोडून हार मानतात. त्यामुळे अडचणीतून त्यांना लवकर बाहेर पडता येत नाही. प्रयत्नच आपल्याला संकटातून बाहेर काढतात. ते न करता आपण नशिबाला दोष देतो.

गुरुवार, १३ जुलै, २०१७

जीवन गाणे गातच राहावे

गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणून ठेवतो....कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरूवात करतो....अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो आणि खालच्या टरफलांमध्ये गायब होतो......आपण मग तो बोटाने शोधायला सुरूवात करतो......अगदी अर्धा ते एक मिनिटाची ही क्रिया, पण शेजारी कढईभर शेंगा असूनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो.....थोडेसे तरी वैतागतो.....या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते.....आयुष्याचे देखील असेच आहे का ?? ? पाटीभर आनंद शेजारी असूनही, आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो.....पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही.....आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसून येते..... ​आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अनुभवा.... गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा.... नेहमी आनंदी राहा..