एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, २७ मे, २०१७

प्लॉट खरेदी करताना घ्यावयाची काळजी

१. ज्या व्यक्तीचा प्लॉट विकावयाचा आहे तो विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे किंवा नाही याची खात्री ७/१२ उतारा पाडून करणे. २. विकणाऱ्या व्यक्तीकडून चालू तारखेचा ७/१२ उताऱ्याचे फेरफाराची व जागेचा झोन दाखला इ. मागणी करावी. ३. जमीन/प्लॉट स्वतः पाहून त्यास जाण्या येण्यासाठी पोहोच मार्ग आहे किंवा नाही हे पहावे. ४. विकणाऱ्या प्लॉटच्या शेतसारा भरलेला आहे किंवा नाही ते पहावे तसेच ३० वर्षापूर्वीचे ७/१२ उतारे पाहावेत. ५. ७/१२ उतारा पाहतेवेळी ७/१२ उताऱ्यावरील सर्व बाबींचा विचार करावा. ६. प्लॉटचा व्यवहार ठरल्यानंतर विकणाऱ्या मालकाकडून १५ दिवसांची जाहीर नोटीस वर्तमानपत्रामध्ये देण्यासाठी लेखी संमती घ्यावी संमती घेतेवेळी स.नं. प्लॉट.नं. क्षेत्र आकार व चतुर्सिमा इ. उल्लेख असावा. ७. वर्तमानपत्रामध्ये वकिलांमार्फत जाहीर नोटीस देण्यात यावी वर्तमान पत्रामध्ये नोटीस दिल्यानंतर वर्तमानपत्र जपू ठेवावे. ८. नोटीस दिल्यानंतर मुदतीपर्यंत कोणाचीही तोंडी अथवा लेखी तक्रार आल्यास त्याचे पूर्ण शंका समाधान विकणाऱ्या जमीन मालकाकडून करून घेणे गरजेचे आहे. ९. जागेच्या नकाशालगतच्या चतुर्सिमा धारकांची नावे ७/१२ उतारे काढून घ्यावेत व त्यांचे स.न.प्लॉट.न. इ. खात्री करावी. १०. शासकीय होणारी स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन फी, वकील फी, लिखाणावळ फी देऊन खरेदीखत करून घ्यावे. ११. खरेदीखतामध्ये चतुर्सिमा चा उल्लेख करताना खालील गोष्टींचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे १२. खरेदीखत झाल्यानंतर इंडेक्स दोन मिळाल्या नंतर मा. गावकामगार तलाठी यांच्या कार्यलयामध्ये त्याची दप्तरी ७/१२ उताऱ्यासाठी नोंद करून घ्यावी. १३. आपण आपल्या जागेचा ७/१२ चा उतारा नोंद झाल्यानंतर प्रत्येक ६ महिन्यानंतर मा. तलाठी यांचेकडून काढावा व तो जपून ठेवावा. जागा खरेदी झाल्यानंतर ७/१२ उतारा नोंद झाल्यानंतर प्लॉटचा ताबा घेणे महत्वाचे आहे ताबा घेणे म्हणजे प्लॉटला चारही बाजूने कुंपण करणे.

शुक्रवार, १९ मे, २०१७

आधार बिल

*_आधार बिल बद्दल माहिती_* ♻संसदेत 16 मार्च 2016 रोजी आधार (वित्तीय व इतर अनुदान, लाभ व सेवा लक्षित पुरवठा) विधेयक, 2016मुळ स्वरुपात संमत करण्यात आले.  ♻केंद्र सरकारने आधार विधेयकास धन विधेयक स्वरुपात लोकसभेमध्ये सादर केले. 💠आधार बिल विधेयकाचा उद्देश - ♻सामान्य जनता, गरिबांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविणे. 💠आधार बिल - भारताच्या प्रत्येक नागरिकास एक बहूउद्देशीय राष्ट्रीय ओळखपत्र उपलब्ध करण्याच्या उद्देशाने "आधार" ची संकल्पना मांडण्यात आली. बायोमेट्रिक माहिती जसे बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबळांना ओळख स्वरुपात जोडण्यात आले आहे. 28 जानेवारी 2009 रोजी यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांची निवड करण्यात आली. आधार 12 अंकांचा एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे, जो "भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण" सर्व भारतीयांसाठी उपलब्ध करतो. ♻ 12 अंकी आधार क्रमांक भारतामध्ये कोठेही व्यक्तीची ओळख व पत्त्याच्या स्वरुपात मान्य राहील.  भारतामध्ये 29 सप्टेंबर 2010 रोजी पहिली आधार संख्या सादर करण्यात आली.  वर्ष 2016-17 च्या साधारण अर्थसंकल्पामध्ये एक प्रस्ताव सादर करण्यात आला, ज्यामध्ये अनुदान आणि दुसरे सरकारी लाभासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. सध्या 98 कोटी लोकांना आधारकार्ड नंबर देण्यात आला आहे. ♻ सरासरी प्रति 26 लाख बायोमेट्रिक आणि 1.5 लाख e-kyc पेमेंट करण्यात येतात. आधार 11.19 कोटी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) खात्याशी जोडण्यात आला आहे; परंतु देशामध्ये 16.5 कोटी LPG ग्राहक खात्यामध्ये अनुदानाचा लाभ घेत आहेत. 💠आधारचे लाभ/फायदे - ♻आधार संख्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनभराची ओळख आहे.  ♻सरकारी व खासगी माहिती आधारित नकली ओळखीस मोठया प्रमाणात समाप्त करण्यामध्ये आधारकार्ड महत्वपूर्ण मार्ग आहे. ♻ आधार संख्येपासून ग्राहकासबँकिंग, मोबाईल कनेक्शन आणि सरकारी व बिगर सरकारी सेवांची सुविधा मिळवण्यासाठी महत्वपूर्ण राहील.

गुरुवार, १८ मे, २०१७

7 /12 वरील वारस नोंदी कशा कराव्यात

शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्ती जिच्या नावावर शेत जमीन आहे. ती मयत झाली असता त्याचे मालकीच्या जमिनीवर वारसांची नोंद करावी लागते.वारस नोंदीमुळे त्या मालमत्तेत वारसांचा हक्क मिळण्यास मदत होते. मयत खातेदारच्या वारसांची नोंद ज्यात घेतली जाते त्या नोंद वहीस गाव नमुना ६ क असे म्हणतात. वारस नोंदी प्रथम या यामध्येरजिस्टर मध्ये नोंदवून वारसाचीचौकशी केली जाते नंतर कोणाचे नाव वारस म्हणून जमिनीस लावायचे या बाबत वारस ठराव मंजूर केला जातो. व नंतर परत फेरफार नोंदवहीत नोंद केली जाते. वारासाबाबत जर तक्रार असेल तर शेतकर्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची आवश्यक संधी मिळू शकते. वारसाच्या नोंदीसाठी आवश्यक बाबी १. एखादा खातेदार मयत झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणी करिता अर्ज देणे अपेक्षित असते. २.अर्ज देते वेळी मयत खातेदार किती तारखेस मयत झाला आहे.त्याच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र आहे. व मयत खातेदारास एकूण किती जण वारस आहे. याची माहिती असते. ३.अर्जासोबत मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला,त्याचे नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारे सर्व वारसांचे पत्ते वारसाचे मयत व्यक्ति बरोबर असलेले नाते व शपतेवरील प्रतिज्ञा पत्र सादर केले पाहिजे. ४.नोंदी घेत असताना व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानुसार होतात.हिंदू व्यक्तीच्या बाबत हिंदू तर मुस्लिम व्यक्तीच्या बाबत मुस्लिम वारस कायद्याचे नियम पाळले जातात. वारसाच्या नोंदीची प्रक्रिया/कार्यपद्धती सर्व प्रथम मयत खातेदाराचा मृत्यू दाखला वारसांनी काढावा.मृत्यू नंतर ३ महिन्याच्या आत सर्व वारसांची नवे नमूद करून वारस नोंदीसाठी अर्ज सादर करावा. वारस नोंदीसाठी आलेला अर्जाची नोंद रजिस्टर मध्ये घेतली जाते.व नंतर वारसांना बोलावले जाते.गावातील सरपंच,पोलिस पाटील,व प्रतिष्ठीत नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेली माहितीची चौकशी करून वारस रजिस्टर मध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर नोंद घेतली जाते.नंतर सर्व वारसांना नोटीस दिली जाते. नंतर किमान १५ दिवसानंतर या फेरफार नोंदीबाबत कायदेशीर रित्या आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद प्रमाणित केली जाते किंवा रद्द केली जाते. वारस नोंदीतील महत्वाच्या बाबी १.व्यक्तीने स्वतः कस्त करून मिळविलेल्या जमीन बाबत प्रथम हक्क त्याचे मुले/मुली विधवा बायको आणि आई यांना मिळतो. स्वकस्ताने मिळविलेल्या जमिनीत मयत व्यक्तीच्या वडिलाना कोणताही हक्क मिळत नाही. २.वडिलांच्या आगोदर मुलगा मयत झाला असेल तर त्याच्या मुला व मुलीना मिळून एक वाटा मिळतो. ३.जर मयत व्यक्तीचे दुसरे किंवा तिसरे लग्न झाले असेल तर त्या व्यक्तीच्या पत्नीला वारस हक्क मिळत नाही.परंतु त्यांना झालेल्या मुला मुलीना मालमत्तेमध्ये हिस्सा मिळतो. ४.वारसांची नावे ७/१२ वर लावण्यासाठी स्थानिक चौकशी करूनच तह्शीलदार किंवा मंडळ अधिकारी निर्णय देतात. असा निर्णय नोंदवहीत रकाना ७ मध्ये लिहिलेला असतो. वारसाचे प्रमाणपत्र आपण मयत व्यक्तीच्या नात्यातील आहोत व त्या व्यक्तीच्या मरणानंत त्याच्या संपतीवर अथवा स्थावर मालमत्तेवर आपला हक्क आहे. हे वारस प्रमाण पत्राद्वारे दाखविता येते. वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे . विहित नमुन्यातील कोट फी स्टँप लावलेला अर्ज व शपथपत्र . मृत्यू प्रमाणपत्र . तलाठी अहवाल / मंडळ अहवाल. . शासकीय नोकरीस असल्याचा पुरावा उदा.सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा. . मयत व्यक्ती पेन्शन असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेन्शन उचललेल्या पानाची झेंरोकस. . शिधापत्रिका/ रेशनिंग कार्ड /कुपणाची झेंरोकस प्रत. . ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा जन्म मृत्यूचा नोंद वहीतील उतारा. . सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाम लिहिलेला असल्याचा पुरावा. वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी .वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगेळे असतात. .बँक ,विमा रक्कम इ.बाबत नॉमिनी म्हणजे मृत्युनंतर सम्बन्धित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे नमूद असलेले नाव त्यालाच ती मिळते. .विमा पॉलिसी धारकाने आत्महत्या केल्यास विमा क्लेम रक्कम हि नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मिळत नाही. . वारस हक्क प्रमाणपत्र हे रक्ताचे नाती सम्बन्ध असलेल्या . व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद,वहिवाट,इ. बाबींसाठी महत्वाचे असते. ———————————————

सोमवार, १५ मे, २०१७

बुद्ध विचार

बुध्दांना एका पंडितन विचारल की तथागत आपण लोकांना सांगता देव नाही, आत्मा नाही , स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही.
बुध्द म्हणाले , तुम्हाला असे कुणी सांगितले की मी आसे बोललो?
पंडित म्हणाला, नाही असे कुणी सांगितले नाही .
मग मी असे बोललो असे सांगणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का ?
पंडीत म्हणाला नाही.
मग असे मी कुणाला सांगताना तुम्ही ऐकले आहे का ?
पंडित म्हणाला नाही. पण तथागत मी लोकांच्या चर्चे तून तसेच ऐकले आहे .तसे नसेल तर तुम्ही काय सांगता ?
तथागत म्हणाले मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो .
पंडित म्हणाला मला सोपे करुन सांगा .
मग तथागत म्हणाले माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत . ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो
१)डोळे २)कान ३)नाक ४)जीभ आणि ५)त्वचा
माणूस डोळ्यान बघतो,
कानान आवाज ऐकतो,
नाकान वास घेतो,
जीभेन चव घेतो,
आणि त्वचेन स्पर्श जाणतो .
या पंच ज्ञानेंद्रीयांपैकी कधी कधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो .
पंडित विचारतो कसे ?
पाणी डोळ्यान दिसत पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते . गोड की खारट कळायला जीभेची मदत घ्यायला लागते .
पंडित म्हणाला बरोबर. पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय ?
तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता ?
पंडित म्हणाला नाही.
याचा अर्थ हवा नाही असा होतो का ?
पंडित म्हणाला नाही .
हवा दिसत नसली तरी ती आहे .कारण तिच आस्तीत्व नाकारता येत नाही ,आपण श्वासोच्छवास करताना हवाच आत-बाहेर सोडतो. वा-याची झुळूक आली की आपल्याला जाणवते. झाड, पान हवेन हलतात ते दिसत.
तथागत म्हणाले, आता मला सांगा देव तुम्हाला पंच ज्ञानेंद्रीयांनी जाणवतो का ?
पंडित म्हणाले नाही .
तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे ?
पंडित- नाही.
तुमच्या आईवडलानी पाहिल्याच सांगितलंय ?
पंडित- नाही.
मग पूर्वजांन पैकी कुणी पाहिल्याच ऐकलत ?
पंडित -नाही.
मग तथागत म्हणाले, आजवर कुणीच पाहिल नाही .
आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रीयांनी जे जाणता येत नाही ते सत्य नाही. त्याला गृहीत धरायच नाही.त्याचा उपयोग नाही.
ज्ञानी पंडिताला ब-या पैकी पटायला लागल होत, तरी त्यान प्रश्न विचारला…
.तथागत ठिक आहे, पण मग आपण जीवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?
तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही .
पंडित म्हणाला, हो. बरोबर आहे.
मग तथागत म्हणाले, मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय ?
पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो .
मग मला सांगा आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो ?
पंडित -आत्मा शरीर सोडतो.
का सोडतो आत्मा शरीर ?
कंटाळा आला म्हणून ?
पंडित-माणसाच आयुष्य संपल्यावर.
तथागत म्हणाले, तस असेल तर सगळी माणस शंभर वर्ष जगली पाहिजे .
अपघात , आजार झाल्यावरही उपचार न करता जगली पाहिजे ,
पंडितजी -तथागत बरोबर आहे तुमच .पण माणसात जीव आहे त्याला काय म्हणाल ?
तथागत म्हणाले तुम्ही पणती पेटवता , त्यात एक भांड ,भांड्यात तेल, तेलात वात असते. ही वात पेटवायला अग्नी देता .बरोबर ?
पंडित - बरोबर .
मग मला सांगा वात कधी विझते ?
पंडित -तेल संपत तेंव्हा .
तथागत -आणखी ?
पंडित -तेल आहे पण वात संपते तेंव्हा.
तथागत-आणखी ?
पंडितजी काहीच बोलले नाहीत.
तेंव्हा तथागत म्हणाले पाणी पडले , वारा आला ,पणतीच फुटली तर पणती विझु शकते. मानव देह ही एक पणती समजा .आणि जीव म्हणजे आग (उर्जा )
सजीवाचा देह चार तत्वांनी बनलेला आहे .
१) पृथ्वी -घनरुप पदार्थ (माती)
२) आप -द्रवरुप पदार्थ (पाणी ,स्नीग्ध तेल )
३) वायु - वारा
४) तेज -उर्जा, उष्णता
या चार पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो . उर्जा बनण थांबते .
यालाच म्हणतात माणूस मरणे .
आणि
सजीव माणूस मेल्या नंतरचा जो आत्मा आहे, तुम्ही म्हणता तो देवा सारखाच अस्तीत्वहीन आहे .
देव आहे की नाही, आत्मा आहे की नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवीत नाही .
धम्म माणूस जन्मल्यापासून मरे पर्यंत माणसान कस जगाव याच मार्गदर्शन करतो. काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो. धम्म जीवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो आणि जीवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळ नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो .
अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म.
जगातील कुठल्याही मानवाला मार्गदर्शक आहे .

सोमवार, ८ मे, २०१७

बी positive

1) एक मुलाने २० वर्षानंतर त्याच्या एका मित्राला मर्सिडीज चालवताना पाहिलं. त्याला स्वतःबद्दल खुप वाईट वाटलं, की तो आयुष्यात नापास झाला आहे.

पण
त्याला हे माहित नव्हतं की तो मित्र त्या गाडीवर ड्रायव्हर होता व तो त्याच्या बॉस ला घ्यायला निघाला होता.

2) एक स्त्री तिच्या नवऱ्यावर नाराज होती की तो अजिबात रोमॅन्टिक नाही, त्याने गाडीतून उतरताना तिच्यासाठी दरवाजा उघडावा जसा तिच्या मैत्रीणीचा नवरा उघडतो.

पण
तिला हे माहीत नव्हतं की मैत्रीणीच्या गाडीचा दरवाजा खराब आहे व तो फक्त बाहेरूनच उघडला जातो.

3) एक व्यक्ती शेजारील घरातील तीन मुले खेळताना बघून नाराज होत होता की त्याला फक्त एकच मुलगा आहे.

पण
त्याला हे माहीत नव्हतं की त्या तीन मुलांपैकी एक दुर्धर रोगाने आजारी आहे व बाकीची दोन मुले  दत्तक घेतलेली आहेत.

आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकाच तराजूत मोजली नाही जाऊ शकत. म्हणून बाकीच्या लोकांकडे बघून तुमच्या आयुष्याबद्दल तक्रार करू नका.
कारण तुम्हास हे माहीत नसेल की इतरांपेक्षा तुम्हीच जास्त नशीबवान असू शकता.
तुम्ही जसे आहात तसेच आयुष्य मजेत घालवा कारण तुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे.

आनंद हा माझ्याकडे सर्वकाही आहे यातून येत नसून, माझ्याकडे जे आहे त्यातून सर्वोत्तम काय मिळेल यामध्ये आहे.

रविवार, ७ मे, २०१७

सांग सखये

सांग सखये कुठवर
आपण ऑनलाईन भेटायचे
ऑनलाईनच बोलायचं
अन ऑनलाईनच हसायचं
*सुरजकुमार*