एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

चला ग्रामपंचायत समजावून घेऊयात बांधकाम परवाण्याबाबत

१) प्रत्येक गावाचा बांधकाम महत्वाचा विषय आहे. त्यातल्या त्यात जी गावे शहरालगत आहेत तेथे तर हा विषय संवेदनशील आहे. कारण त्यातून येणार उत्पन्न व होणारे वाढ दूर असणाऱ्या ग्रामपंचायतीपेक्षा अधिक तीव्र असतात.

२) प्रत्येक सदस्यांना ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकाम व त्यासंबंधी नियम माहिती असल्यास अवैध बांधकामाला आळा बसणार आहे. त्यासाठी प्रत्येक सदस्यांप्रमाणे नागरिकांनाही हे नियम माहिती असावेत.

* बांधकाम व परवानगी :

१. इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी असल्याशिवाय बांधकाम करता येत नाही.

२. संबंधित व्यक्तीने अशा परवानगीसाठी पंचायतीकडे रीतसर अर्ज करणे आवश्यक आहे. पंचायतीने अर्ज मिळाल्यापासून दोन महिन्याच्या आत निर्णय घेऊन संबंधितास कळविणे बंधनकारक आहे. दोन महिन्याच्या आत पंचायतीने निर्णय घेतला नाही तर बांधकामास परवानगी आहे असे समजून संबंधित व्यक्ती बांधकाम करू शकते.

३. बांधकाम करण्यासाठी दिलेली परवानगी ही अटीशिवाय किंवा अटीसह असेल.

४. बांधकामाची परवानगी १ वर्षापर्यंत लागू राहील.

५. बांधकामाची परवानगी न दिल्याने व्यथित झालेल्या व्यक्तीला ३० दिवसाचे आत स्थायी समितीकडे अपील करता येईल.

* ग्रामीण क्षेत्रातील इमारत बांधकाम परवानगी :

- दिनांक ११ डिसेंबर २०१५ शासन निर्णय व्हीपीएम २०१५/प्र.क्र. ३९/पंरा - ४ सदर निर्णयाद्वारे महाराष्ट्र ग्रापंचायत अधिनियमातील कलम ५२ मध्ये पोटकलमे १ व २ याऐवजी पुढील पोट कलमे दाखल करण्यात येतील त्या नुसार

१. ज्या गावांना नगररचना नियोजन विभाग योजना लागू आहे तेथे कोणत्याही व्यक्तीस गावाच्या गावठाण क्षेत्रात पंचायती पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही इमारत उभारता किंवा पुन्हा बांधता येणार नाही.

२. त्याच प्रमाणे गावातील इतर क्षेत्रात म्हणजेच गावठाण सोडून इतर भागात जिल्हाधिकारी किंवा ते सोपवतील असे अधिकारी म्हणजेच तहसीलदार यांचे पेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेल्याशिवाय कोणतीही इमारत उभारता किंवा पुन्हा बांधता येणार नाही.

३. सदर शासन निर्णयातून झालेले महत्वाचे बदल म्हणजे गाव सीमेतील या ऐवजी गावाच्या गावठाण क्षेत्राच्या सीमेतील असा मजकूर दाखल करण्यात आला.

* बांधकाम व नियंत्रण :

१. ग्रामपंचायतीच्या परवागीशिवाय एखादी व्यक्ती बांधकाम करत असेल तर पंचायतीस ते बांधकाम बंद करता येईल किंवा आवश्यक ती कार्यप्रणाली अवलंबून ते काढून टाकता येईल.

२. इमारत बांधकाम करताना संबंधित व्यक्ती सांडपाण्याची व्यवस्था, रस्त्यापासून व इमारतीभोवती जागा सोडणे इत्यादी बाबत ज्या अटी पंचायतीने घालून दिलेल्या असतील त्या वरहुकूम बांधकाम करील.

* बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबत :

१. तारीख १६ नोव्हेंबर २०१५ शासन परिपत्रक क्रमांक व्हीपीएम - २०१५/प्र .क्र. २३७/पंरा -३ ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवाशर्ती अधिनियम कलम ३३ प्रमाणे ग्रामपंचायतीने ग्रामसेवकांमार्फत बांधकाम कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्यांच्या अखत्यारितील सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या मार्फत सूचना द्याव्यात.

२. याद्वारे प्रमाणपत्र देताना कामगाराच्या वास्तव्याचा अधिकृत पुरावा व फोटो असलेल्या ओळखपत्राचा पुरावा मतदान ओळखपत्र किंवा पॅनकार्ड किंवा बँकेचे पासबुक किंवा आधार कार्ड जमा करण्यात यावे. नोंदणी करण्याकरिता कामगाराने वर्षभर ९० दिवस काम करणे आवश्यक आहे. याबाबत खातरजमा करण्यात यावी.

* औदयोगिक किंवा वाणिज्यक प्रयोजनार्थ नाहरकत प्रमाणपत्र देणेबाबत :

- दिनांक ११ डिसेंबर २०१५ शासन परिपत्रक व्हीपीएम/प्र.क्र./३०६/पंरा-४ ग्रामविकास विभाग द्वारे औदयोगिक किंवा वाणिज्यक प्रयोजनार्थ ग्रामपंचायतीकडून नाहरकत प्रमाणपत्र देणे याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आले. त्यानुसार राज्य शासनाच्या विविध यंत्रणांकडून सर्वसाधारण खालील परवानग्या घेण्याकरिता ग्रामपंचायतीकडून स्वतंत्रपणे नाहरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात येते

- जसे अकृषिक/एन. ए व बांधकाम मान्यता घेण्यासाठी, गौण खनिज उत्खननासाठी, मोठ्या उद्योगाची उभारणीसाठी प्रदूषण विषयक बाबींकरिता, पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन करिता, विजेचा वापर व उच्च दाबाच्या वीज वाहिन्याच्या जाळे पसरविणेसाठी, पाणी आरक्षित करण्यासाठी, औदयोगिक बांधकामाकरिता इ. करीता नाहरकत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे :

१. नाहरकत प्रमाणपत्र मासिक सभेत मंजूर करून संबंधित उद्योगाला देण्यात येते.

२. ग्रामपंचायतीने अर्ज प्राप्त झालेवर विहित कालावधीत ते देणे बंधनकारक असेल. ज्या प्रकरणांचा कालावधी विहित नसेल अशा प्रकरणाबाबत ३० दिवसामध्ये ते उपलब्ध करून द्यावे जर ते देण्यात आले नाही तर नाहरकत संबंधित ग्रामपंचायतीच्या हितास बाधा येणार नाही अशा अटी व शर्तीस अधीन राहून देण्यात आले असे मानण्यात येईल.

३. जर नाहरकत प्रमाणपत्र नाकारायचे असेल तर त्याची योग्य व समर्थनीय कारणे नमूद करून ते नाकारण्यात यावे.

४. एकदा नाहरकत प्रमाणपत्र दिले गेले ते कोणत्याही कारणास्तव रद्द करता येणार नाही.

५. उदयॊगांकरिता नाहरकत प्रमाणपत्र देते वेळी पेसा अधिनियम १९९६ व ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध केलेला पेसा कायदा विषयक नियमाव्ये देण्यात येईल.

६. नाहरकत हरकत प्रमाणपत्रावर ग्रामपंचायातीच्या मान्यतेने ग्रामसचिवांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात येईल.

११० टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. बांधकाम सुरू करण्यात परवानगी दाखला ग्रामपंचायत स्तरावर देणे साठी

      हटवा
    2. ग्रामपंचायत मध्ये किती टक्क परवानगी आहे 1000स्के फूट लसााअसते

      हटवा
  2. ग्रामपंचायत हद्दीत किती मजल्यापर्यंत बांधकाम करू शकता

    उत्तर द्याहटवा
  3. शेती क्षेत्रात बांधकाम करायचे असल्यास त्यासंबंधी महसूल विभागाचा शासन निर्णय पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  4. शेती क्षेत्रात बांधकाम करायचे असल्यास त्यासंबंधी महसूल विभागाचा शासन निर्णय पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Unknown१६ जून, २०२० रोजी १०:३२ म.उ.
      आष्टापुर ता हावेली जि पुणे गावाचे सिटी सर्वे झाला नाही ग्रामपंचायत हाद्दीत घर घ्यायचे आहे सिटी सर्वे बाबत चौकशी कोठे करावी घराचे खरेदी खत करु शकतो काUnknown१६ जून, २०२० रोजी १०:३२ म.उ.
      आष्टापुर ता हावेली जि पुणे गावाचे सिटी सर्वे झाला नाही ग्रामपंचायत हाद्दीत घर घ्यायचे आहे सिटी सर्वे बाबत चौकशी कोठे करावी घराचे खरेदी खत करु शकतो का dnchavan54@gmail.com

      हटवा
  5. सहकारी संस्थे साठी ग्रामपंचायत कब्जजा हक्काने दिलेल्या जमीनी वरती ग्रामपंचायत बांधकाम परवाना गरजेचा आहे का?

    उत्तर द्याहटवा
  6. मला बांधकाम परवाना काढणे आहे तरी काय कागदपत्रे लागतील

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मला बांधकाम परवाना काढणे आहे तरी काय कागदपत्रे लागतील

      उत्तर द्या

      हटवा
  7. माझे प्लाँट गावठाण हद्दीपासुण सव्वा कि .मी.अतरावर आहे .ग्रामपचायत येथे नोद आहे व सातबारा नोद पण आहे .माझ्या गावची लोक सख्या २०११ प्रमाणे ७०००आहे.मी ग्रामसेवक बाधकाम परवाना घेतलेला आहे आक्रषीक भरणा पण सहा सात वर्षाचा आहे .व मला बिअर बार परवाना काढण्यासाठी फाईल दाखल केलती जिल्हाआधीकारी यांनी बाधकाम परवाना निवासी ऊपजिल्हाआधीरी किवा महसुल यांचा परवाना मागीतला बांधकाम ग्रामपचायत नोद घर क.सुद्धा आहे करीता माहीती मीळावी .

    उत्तर द्याहटवा
  8. पारंपरिक पाण्याचा अो हळ जर खाजगी जागेतून जात असे लक्षात तर असा मार्ग बंद करता येतो ❓

    उत्तर द्याहटवा
  9. मी माझ्या शेतावर ६फूटx८फूट शेड बांधली होती तिचा असेसमेंट मला मिळाला पण, तीच शेड काही दिवसांनी मी ३०फूट x १६०फूट बांधली आहे तरी मला या शेडची आसेसमेंट ग्रामसेवक देत नाही कारण का?

    उत्तर द्याहटवा
  10. मी माझ्या शेतावर ६फूटx८फूट शेड बांधली होती तिचा असेसमेंट मला मिळाला पण, तीच शेड काही दिवसांनी मी ३०फूट x १६०फूट बांधली आहे तरी मला या शेडची आसेसमेंट ग्रामसेवक देत नाही कारण का?

    उत्तर द्याहटवा
  11. मी माझ्या शेतावर ६फूटx८फूट शेड बांधली होती तिचा असेसमेंट मला मिळाला पण, तीच शेड काही दिवसांनी मी ३०फूट x १६०फूट बांधली आहे तरी मला या शेडची आसेसमेंट ग्रामसेवक देत नाही कारण का?

    उत्तर द्याहटवा
  12. घराचे बांधकाम करण्यास ग्रामपंचायत किती दिवसात परवानगी देवू शकते.न दिल्यास आपण अपील करू शकतो काय?

    उत्तर द्याहटवा
  13. Application performa for grampanchayat permission for construction of house

    उत्तर द्याहटवा
  14. एखाद्या ग्राम पंचायत समितीचे सदस्य ने शासकीय गावठान जमीन मध्ये बांधकाम केल्यास त्याचे सदस्य पद रद् होते काय?

    उत्तर द्याहटवा
  15. मला पोल्ट्री फार्म चे बांधकाम करावयाचे आहे त्यासाठी तिची परवानगी कोण कोणाकडे मागावी व काय काय कागदपत्रे लागतील

    उत्तर द्याहटवा
  16. मला तिस वर्षे जुने बांधकाम असलेले घर व बखळ जागा ग्रामपंचायत हद्दीत विकत घ्यायची आहे, आपापसातील व्यवहार रू.800000 चा आहे , परंतू रेडी रेकनर दर नुसार बखळ जागेच मुल्य 350000 रू व त्यावर जुने बांधकाम असलेल्या घराचे मुल्य 1200000 रू इतके आहे त्यामुळे त्याचे मुद्रांक शुल्क 90000 रू चा आसपास येते तर मुद्रांक शुल्क कमी करण्या साठी काय करावे

    उत्तर द्याहटवा
  17. बांधकाम परवानगी घेण्याची पद्धत

    उत्तर द्याहटवा
  18. बांधकाम परवानगी घ्यायची पध्दत

    उत्तर द्याहटवा
  19. मी ग्रामीण भागामध्ये घराची दुरुस्ती करू पाहत आहे तरी मी ग्रामपंचायती कडे घर वाढविण्यासाठी अर्ज केला असता मला ते परवानगी देत नाही तर मी काय करावे

    उत्तर द्याहटवा
  20. मला आमच्या सामाईक जमिनीमध्ये नवीन घर बांधायचे आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील.

    उत्तर द्याहटवा
  21. गावठाण पासून 200 मीटर प्लॉट आहे, F S I किती किंवा किती मजली बांधकाम करू शकतो

    उत्तर द्याहटवा
  22. माझी घराची जागा 25/25अशी आहे पन शेजारच्या ने माझ्या 10फुट जागेवर अतिक्रमण करून घर बांधकाम केले आहे काय करकरावे लागेल

    उत्तर द्याहटवा
  23. रस्त्यापासून किती फूट अंतर सोडून बांधकाम करावे .असा कोणता नियम आहे काय?

    उत्तर द्याहटवा
  24. जुने घर पुन्हा बांधणीसाठी फोरेस्तची कोणती परवानगी घ्यावी

    उत्तर द्याहटवा
  25. माझे घर चाळीस वषँ जुने आहे व बाजूची जागा आम्हीच भात शेती करत असून ती जागा अाता बाजार समितीच्या नावे निघत अाहे आम्ही सदर जागेवर चाळीस वर्षे कब्जा केला आहे आता आम्हाला घर बांधायचे आहे तर काय करावे लागेल?

    उत्तर द्याहटवा
  26. माझे घर माझ्या पणजोबा च्या नावावर आहे तरी ते माझ्या नावावर घेण्यासाठी काय करावे लागेल अशी माहिती ग्रामसेवक यांना विचारले असता ग्रामसेवक अशाच प्रकारचे माहिती देत नाही म्हणून कुणाकड माहिती याची माहिती द्या

    उत्तर द्याहटवा
  27. गावच्या जागेचा नकाशा कोणाकडे कधी भेटतो त्याची माहिती द्या

    उत्तर द्याहटवा
  28. N A जमीन असेल व ती परवानगी घर बांधकामासाठी असेल तर ग्रामपंचायत नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते का?

    उत्तर द्याहटवा
  29. घर बांधताना रस्ता
    पासून किती अंतर ठेवावे लागते ग्रामपंचायतील हद्द

    उत्तर द्याहटवा
  30. ग्रामपंचायत मधील अनधिकृत घर अधिकृत करण्यासाठी काय करावे लागेल?

    उत्तर द्याहटवा
  31. गाव रास्तापासून किती अंतर सोडून मी घर बांधणी करू शकतो

    उत्तर द्याहटवा
  32. माझे जुने घर पडून नवीन बांधनी करायची आहे
    तरी माला परवानगी लागेल

    उत्तर द्याहटवा
  33. सरकारी नाली सोडुन ग्रामपचांयत हद्दीत किती अंतरावर वाल कपांउडं बांधकाम करु शकतो .

    उत्तर द्याहटवा
  34. आष्टापुर ता हावेली जि पुणे गावाचे सिटी सर्वे झाला नाही ग्रामपंचायत हाद्दीत जागा घ्यायची सिटी सर्वे बाबत चौकशी कोठे करावी

    उत्तर द्याहटवा
  35. शेजारच्या प्लॉट कंपाउंड पासून किती जागा सोडावी झाडें लावण्यासाठी.

    उत्तर द्याहटवा
  36. ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी काय करावे दंड भरण्यास पण तयार...

    Mail id:masskamble007@gmail.com
    What's app no: 7264088973

    उत्तर द्याहटवा
  37. मला ग्रामीण भागामध्ये बांधकाम करावयाचे आहे तरी त्याबाबत संपूर्ण बांधकाम भोवती किती जागा सोडणे आवश्यक आहे ते सांगा

    उत्तर द्याहटवा
  38. आणि त्याबाबत नियमावली पाठवा

    उत्तर द्याहटवा
  39. मला ग्रामपंचायत हद्दीत घरबांधणी परवानगी कशी व कुठे मिळते व साईडने किती जागा सोडणे

    उत्तर द्याहटवा
  40. आष्टापुर ता हावेली जि पुणे गावाचे सिटी सर्वे झाला नाही ग्रामपंचायत हाद्दीत घर घ्यायचे आहे सिटी सर्वे बाबत चौकशी कोठे करावी घराचे खरेदी खत करु शकतो का

    उत्तर द्या

    उत्तर द्याहटवा
  41. Unknown१६ जून, २०२० रोजी १०:३२ म.उ.
    आष्टापुर ता हावेली जि पुणे गावाचे सिटी सर्वे झाला नाही ग्रामपंचायत हाद्दीत घर घ्यायचे आहे सिटी सर्वे बाबत चौकशी कोठे करावी घराचे खरेदी खत करु शकतो का dnchavan54@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  42. बांधकाम परवाना न घेता शेतजमिनीत घर बांधले आहे त्याच्यवर ग्रामपंचायत काय कारवाई करू शकते?

    उत्तर द्याहटवा
  43. मला माझ्या शेती क्षेत्रामध्ये नवीन घर बांधायचे आहे तर त्यासाठी कोणा कोणाची परवानगी लागेल

    उत्तर द्याहटवा
  44. मला माझ्या शेतामध्ये बंगला बांधायचा आहे.त्यासाठी बँक लोन घेणे आहे. कोणती कागातपत्रे लागतील.कृपया सांगा विनंती वरून.

    उत्तर द्याहटवा
  45. बिगर शेती करून बांधकाम करताना रस्ता किती फूट सोडणे बन्धनकारक आहे

    उत्तर द्याहटवा
  46. ग्रामपंचायत गावठाण हद्दीत घर बाधण्यासाठी जागा देण्याचा अधिकार नेमका आहे कोणाला ,ग्रामसेवक सरळ नकार देत आहे की आम्हाला अधिकार नाही तरी आपण यावर माहिती द्यावी,जागा मागणी करून 2 महिने होत आली तरी उत्तर मिळाले नाही.

    उत्तर द्याहटवा
  47. ग्रामपंचायत हद्दीत उद्योग उभारणी ऐन ऐ जागे मध्ये बांधकाम परवाना ग्रामपंचायत कडून मिळावा

    उत्तर द्याहटवा
  48. ग्रामपंचायत हद्दीत घर बांधकाम करण्यासाठी 9फुट रोड आहे. परवानगी मिळेल काय?

    उत्तर द्याहटवा
  49. ग्रामपंचायत किती घन फूट बांधकामाची परवानगी देऊ शकते? तसे शासन परिपत्रक कोणत्या तारखेला आले?

    उत्तर द्याहटवा
  50. जागा ही कोणत्या गावाच्या ताब्यात आहे ते बघा त्या गावाची परमिशन घ्यावी लागेल तो परमिशन अर्ज ग्रामपंचायत कडे देणे त्यांनी हा अर्ज स्वीकारायला पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  51. जागा ही कोणत्या गावाच्या ताब्यात आहे ते बघा त्या गावाची परमिशन घ्यावी लागेल तो परमिशन अर्ज ग्रामपंचायत कडे देणे त्यांनी हा अर्ज स्वीकारायला पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  52. माझं 20 वर्ष जुने शेतीत शेतघर आहे
    मला घर न हवा आहे
    अर्ज कुठे व कसा करावा

    उत्तर द्याहटवा
  53. नवीन घर बांधून पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायत ने घरपट्टीनाही लावली तर काय करावे

    उत्तर द्याहटवा
  54. मला ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम करायचे आहे त्यासाठी नवीन नियमानुसार कोणाचा बांधकाम परवाना घ्यावा लागेल????

    उत्तर द्याहटवा
  55. मला ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम सिटी सर्व्हे मध्ये करायचे आहे त्यासाठी नवीन नियमानुसार कोणाचा बांधकाम परवाना घ्यावा लागेल????

    उत्तर द्याहटवा
  56. गावात अतिक्रमण आणायचे असल्यास काय करावे लागणार

    उत्तर द्याहटवा
  57. गावात घर बांधणी परवाना ग्रामपंचयात देऊ शकते का?

    उत्तर द्याहटवा
  58. जुने घर मोडून नवीन बांधले, पहिले घर नामशेष झाले आहे, त्याची घरपट्टी असलेले मयत आहेत, घरपट्टी त्याच नावे चालू आहे. नवीन घराची नोंदणी करणे बाकी आहे, क्षेत्र व दिशा अलग आहे.

    उत्तर द्याहटवा
  59. ग्रामपंचायत भागात शहराला लागून घर बांधकाम करायचेआहे परवानगी कुठून घ्यावी..? नवीन शासन निर्णय आता उपविभागीय अधिकारी कार्यालयात परवानगी मागण्याची गरज आहे काय..?

    उत्तर द्याहटवा
  60. ग्रामपंचायत भागात शहराला लागून घर बांधकाम करायचेआहे परवानगी कुठून घ्यावी..? नवीन शासन निर्णय आता उपविभागीय अधिकारी कार्यालयात परवानगी मागण्याची गरज आहे काय..?

    उत्तर द्याहटवा
  61. ग्रामपंचायत भागात शहराला लागून घर बांधकाम करायचेआहे परवानगी कुठून घ्यावी..? नवीन शासन निर्णय आता जिल्हाधिकारी कार्यालयात परवानगी मागण्याची गरज आहे काय..?

    उत्तर द्याहटवा
  62. ग्रामपंचायत हद्दीतील वडिलोपार्जित जागा दोन्ही भावांच्या नावाने आहे.त्यामध्ये भावांची वाटणी झालेली नाही.एक भाऊ मात्र बळजबरीने बांधकाम करत आहे.ग्रामपंचायतीकडे तक्रार केली.ग्रामपंचायतीने काकू करत बांधकाम थांबवण्याची नोटीस काढली.काम पंधरा दिवस थांबवून पुन्हा सुरू केले.पुन्हा तक्रार.पण ग्रामपंचायत बांधकाम रोखण्यासाठी टाळाटाळ करते.संबंधित बांधकाम करणेसाठी कोणताही परवाना घेतला नाही.पण आता परवाण्यासाठी अर्ज केला आहे. यावर उपाय सुचवावा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. माझ्या सोबत पण असंच झालंय मला उत्तर पाहिजे ग्रामपंचायत कोणतीच कारवाई करत नाही

      हटवा
  63. ग्रामपंचायत बांधकाम परवानगी ग्रामपंचायत ला देण्यासंबंधी नवीन gr असेल तर पाठवा

    उत्तर द्याहटवा
  64. ग्रामपंचायत बांधकाम परवानगी ग्रामपंचायतला देण्यात आली आहे असा नवीन शासन निर्णय (G R) असेल तर कृपया पाठवा

    उत्तर द्याहटवा
  65. रस्त्यालगत माझा 2 गुंठा प्लाॕट आहे.रस्त्याकरिता किती फुट जागा सोडावी लागेल.

    उत्तर द्याहटवा
  66. MDR रस्त्यालगत माझा 3 गुंठा प्लाॕट आहे.रस्त्यापासुन किती फुट जागा सोडावी लागेल.

    उत्तर द्याहटवा
  67. माझा प्लॉट ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आहे पण ग्रामपंचायत कार्यालयाला शासनाने बांधकाम परवानगी देणे बंद केले आहे. तसेच नगररचना विभागामध्ये सुद्धा परवानगी देणे बंद आहे. घर कसे बांधायचे ? बँकेचे लोन घेणे आवश्यक आहे त्यासाठी काय करावे सांगा. परवानगी मिळाल्याशिवाय बँक लोन देत नाही. (दिनांक 11 डिसेंबर 2015) या निर्णयानुसार ग्रामपंचायला परवानगी देणे बंद केले आहे तरी कृपया माहिती सांगा ही विनंती.

    उत्तर द्याहटवा
  68. माझे घर ३० वर्षापासून ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे.जुन्या पद्धतीचे घर असल्याने नवीन बांधकाम करायचे आहे.त्यासाठी बांधकाम परमिशन घायची आवशकता आहे का? तसेच जुने घरांची रचना एकाला एक चिकटून अशी होती.परंतु आता कशा पद्धतीने बांधकाम करावे.

    उत्तर द्याहटवा
  69. माझा प्लॉट ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आहे पण ग्रामपंचायत कार्यालयाला शासनाने बांधकाम परवानगी देणे बंद केले आहे. तसेच नगररचना विभागामध्ये सुद्धा परवानगी देणे बंद आहे. घर कसे बांधायचे ? बँकेचे लोन घेणे आवश्यक आहे त्यासाठी काय करावे सांगा. परवानगी मिळाल्याशिवाय बँक लोन देत नाही. (दिनांक 11 डिसेंबर 2015) या निर्णयानुसार ग्रामपंचायला परवानगी देणे बंद केले आहे तरी कृपया माहिती सांगा ही विनंती.

    उत्तर द्याहटवा
  70. सामाईक जमीनीवर घर बांधले आहे, 4 वारस आहेत तरी 2 बहीण संबंधित ईमारती करीता संमती देत नसेल तर संबंधित ईमारत कायदेशीर घरपट्टी मिलते काय

    उत्तर द्याहटवा
  71. ग्रामपंचायतींना बांधकाम परवाना देण्यात आल्याचा G.R. असेल तर तो कृृृृृृृृृपया द्यावा माझे बांधकाम थांबले आहे

    उत्तर द्याहटवा
  72. गावठाण मध्ये बांधकाम करताना चारी बाजूस किती फूट आंतर ठेवावे

    उत्तर द्याहटवा
  73. सर मी गावठाण जागेत घर बनवू शकतो का

    उत्तर द्याहटवा
  74. सर मी माझ्या मालकीच्या शेतात गेले 6 वर्षे राहत आहे तर शेजारील व्यक्तीने शेळी पालन म्हणून शेड उभा केले आणि नंतर अचानक त्यामध्ये कोंबड्या टाकून पोल्ट्री बनविली आहे तर त्याचा माझ्या संपूर्ण कुटुंबाला नाहक त्रास होत आहे. तक्रार सर्व संबंधित विभागात केली असता तो लाच देऊन ग्रामपंचायत कडून फक्त नाहरकत दाखला घेतला आहे तर यासाठी काय नियम अटी ग्रामपंचायत देते का नाही? मला समजले तर खूप मौल्यवान मदत होईल? आणि काय करावे ते पण सांगा कारण त्रास खूपच होत आहे दुर्गंधी चा

    उत्तर द्याहटवा
  75. घर बांधताना आजूबाजूला किमान किती जागा सोडावी बाबत G.R द्या

    उत्तर द्याहटवा
  76. बाधकाम परवानगी साठी लागनारा खर्चा ची सविस्तर माहिती सांगा

    उत्तर द्याहटवा
  77. गावठाण जागेत घर बांधकाम परवानगी साठी नगर पंचायत मध्ये रीतसर अर्ज केला आहे पण अर्ज करून दोन महिने होऊन गेले तरी काही निर्णय आला नाही म आता बांधकाम चालू करू शकतो का?

    उत्तर द्याहटवा
  78. गांवठान जागते माझे दुकान आणि घर आहे ५०, ६० वर्ष पासुन,माझी दुकान ही आत गेली आहे कारण माझे बाजू वाले ने दुकान रास्ता टच केला मि दुकान पूढ़े घेतो तर बाजू वाले विरोध करत आहे मि काय करावे ?उत्तर द्या

    उत्तर द्याहटवा
  79. माझ्या घराच्या मागे बखळ जागा आहे ती जागा माझ्या चार पिढ्यांपूर्वीपासून मी वहिवाटीत आहे. आणि आम्ही त्या जागेवर शेड बांधले आहे ते ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करायची आहे तर मी ती कशी करू शकतो?

    उत्तर द्याहटवा
  80. मला ग्रामपंचायतीच्या गावठाण मध्ये उद्योग सुरू करायचा आहे त्यासाठी गावाच्या बस स्टँड जवळ मी ग्रामपंचायतीला जागा मागतोय त्यासाठी नोटरी पण करायला तयार आहे परंतु ग्रामसेवक उद्योगासाठी जागा देऊ शकत नाही म्हणून सांगत आहेत तर उद्योगासाठी जागा मिळवण्यासाठी काय करावे लागेल

    उत्तर द्याहटवा
  81. पिण्याच्या विहिरी पासुन मालकी हक्क असलेल्या घरात शौचालय किती अंतरावर बांधावे लागते, त्यासाठी परवानगी कोण देतो? गावठाण जागे व्यतिरिक्त

    उत्तर द्याहटवा