एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २ एप्रिल, २०१७

तलाठ्यांची कर्तव्ये

*फेरफार प्रमाणित जाळ्याची सूचना संबंधित व्यक्तींना द्यावी. फेरफार प्रमाणित झाल्यानंतर गाव नमुन ७/१२ , ८-अ ,८-ब, मध्ये सर्व आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात.

तलाठ्याची कर्तव्य :

१. वरिष्ठ अधिकाऱ्यानी वेळोवेळी दिलेले आदेश, हुकूमाप्रमाणे रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नोंद करणे.

२. जर वरिष्ठांनी अपीलामध्ये किंवा अन्य प्रकरणी एखाद्या खातेदारासारखा निकाल दिला तर त्याची अंमलबजावणी विहित वेळेत करण्याचे बंधन तलाठयावर आहे. अशी कार्यवाही न झाल्यास पुन्हा संबंधीत अधिकाऱ्याकडे दाद मागता येईल.

३. वेळोवेळी वरिष्ठांकडून प्रसिध्दीसाठी येणा  ऱ्यानोटीसा, आदेश व सूचना यांना प्रसिध्दी देणे.

४. नवीन शर्तीच्या जमीनीचे हस्तांतरण झालेले आढळल्यास त्याचा अहवाल तहसिलदार यांचेकडे पाठविणे.

५. गावात नव्याने निर्माण झालेल्या खातेदाराच्या बाबतीत, ८-अ चा खाते उतारा वेळेवर प्राप्त करुन घेतला पाहिजे. नव्याने जमीन खरेदी केली असल्यास मूळ ८-अ मध्ये योग्य तो बदल झाल्याची शेतकर्यानने खात्री करावी.

६. त्या दरम्यान तलाठयाकडे सूची-२ ची माहिती आली आहे काय याची खात्री करावी. अन्यथा वर्दी अर्ज व त्यासोबत रजिष्टर खरेदीखताची प्रत जोडून तलाठयाकडे अर्ज द्यावा.

७. फेरफार नोंद प्रमाणित केल्यानंतर लगेचच ७/१२ वर या नोंदीचा अंमल दिला जातो व ७/१२ वरील नांवे दुरुस्त केली जातात. त्यानंतर दुरुस्त झालेले ७/१२ व ८-अ चे उतारे प्राप्त करुन घेवून खरेदीदार व्यक्तीने आपल्या संग्रही ठेवले पाहिजेत.

८. फेरफार नोंद झाल्यानंतर लगेचच त्या नोंदीचा अंमल ७/१२ ला दिला जातो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा