एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

शेतकऱ्यांसाठी काही योजना

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून वैयक्तीक शेतक-यांच्या विकास संकल्पनेपेक्षा सामुदायीक शेतक-यांच्या गटाची स्थापना करून त्याच्यात विकास घडवून आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शेतक-यांना या अभियानातून आपल्या शेतीच्या विकास करून आर्थिक उन्नती साधावयाची असेल तर एका विचाराचे एक समान गरजेसाठी शेतक-यांचे गट स्थापन करण्याची नितांत गरज आहे. या अभियानात जमिनीचा पोत सुधारण्यापासून बियाणे, कलमे, रोपे, खते, औषधे या प्रारंभीच्या गरजांबरोबरच काढणी, वाहतूक, साठवणूक, प्रक्रीया व विक्री व्यवस्था या सर्व समावेशक विकास कार्यक्रमाचा अंतर्भाव आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान उद्दिष्टे –

अ) फलोत्पादन क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रीया, पणन सुविधा यांच्या मध्यमातून सर्वांगीण विकास.

ब) शेतक-यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, व आहार विषयक पोषणमुल्य वाढविणे.

क) अस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता विकास व त्याचा प्रसार आणि प्रचार करणे.

ड) पारंपारीक उत्पादनत पध्दतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाच्या विकास व त्याचा प्रसार आणि प्रचार करणे.

इ) कुशल आणि अकुशल विशेषतः बेरोजगार तरुणांकरीता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

प) सन २०११-१२ या अभियानाच्या कालावधीअखेर पर्यंत फलोत्पादन क्षेत्राचे दुप्पट करणे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान विविध योजना –

१) आदर्श रोपवाटीका स्थापना -

फलोत्पादन निश्चीत व शाश्वत उत्पन्न देणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात सन २००५-०६ मध्ये लागवडीसाठी नवीन क्षेत्र आणणे, जून्या, बागांचे पुनरूज्जीवन करणे, नवीन वाणांची लागवड करणे इ. कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात आदर्श रोपवाटीका तयार करणे प्रस्तावीत आहे.

उद्देश –

१) राज्यात सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात ४ हेक्टरच्या मोठ्या व १ हे. च्या छोट्या रोपवाटीका तयार करणे.

२) राज्यातील शेतक-यांसाठी फलोत्पादन पिकांची उत्कृष्ट वाणांची दर्जेदार व रोगमुक्त कलमे किंवा रोपे शेतक-यांना उपलब्ध करून देणे.

३) नवीन निर्यातीस वाव असलेल्या फलोत्पादन पिकांच्या वाणाच्या मातृवृक्षांची लागवड करणे.

४) नवीन निर्यातीस वाव असलेल्या फलोत्पादन पिकांच्या वाणांची माहिती शेतक-यांना देणे तसेच उच्च तंत्रज्ञानाची प्रात्यक्षीके आयोजीत करणे.

५) रोपवाटीका धारकांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजीत करून त्यांचे तांत्रिक व व्यवसायीक क्षमतेत वाढ करणे.

आदर्श रोप वाटीका तयार करणेसाठी –

१) पॉलीहाऊस

२) शेडनेट

३) मिस्ट चेंबर

४) मातृवृक्ष लागवड (फळे किंवा फुले)

५) मातृवृक्षासाठी ठीबक किंवा तुषार सिंचन

६) पाणी साठवण सुविधा

७) माती निर्जंतुकीकरण संयंत्र या बाबींचा समावेश असेल.

अनुदान –

रोपवाटीका सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्र

१. मोठी रोपवाटीका ४ हे रू. १८.०० लाख रु. ९.०० लाख

२. लहान रोपवाटीका १ हे रु. ३.०० लाख रू. १.५० लाख

पात्र लाभार्थी –

१. वैयक्तिक लाभार्थी,

२. सहकारी कायद्याखाली नोंदविलेली संस्था,

३. कृषि विज्ञान केंद्र इ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा