एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

पीक पाहणी म्हणजे काय?

दरवर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात प्रत्यक्ष फिरुन पिकांची नोंद ७/१२ मध्ये लावली जाते. सर्वसाधारणपणे सप्टेंबर मध्ये खरीपाची व डिसेंबर अखेरपर्यंत रब्बी पिकांची पाहणी करुन नोंदी केल्या जातात. या प्रक्रियेस पीक पाहणी असे म्हणतात.

पिकांच्या निरीक्षण काळात, सर्व जमीनीच्या बाबतीत मालक हाच जमीन कसतो काय याची पडताळणी केली जाते. ७/१२ वर नांव असणारी व्यक्ती आणि प्रत्यक्ष जमीन कब्जात असलेली व्यक्ती एकच आहे काय याची पडताळणी तलाठयाकडून केली जाते. जमीन मालक किंवा त्याचे कुटूंबीय ही जमीन कसत असतील तर त्यांचे स्वत:चे नांव खुद्द या स्वरुपात ७/१२ स पिक पाहणी सदरी लावली जाते. मात्र प्रत्यक्ष जमीत कब्जात असलेली व्यक्ती ही जमीन मालकापेक्षा वेगळी आहे, असे लक्षात आल्यास तलाठयाने खाली दिलेल्या गाव नमुना १४ मध्ये माहिती भरुन, या नोंदवहीचा उतारा तहसिलदाराकडे कार्यवाहीसाठी पाठविणे अपेक्षित असते. या प्रक्रियेस पीक पाहणी असे म्हणतात.

पीक पाहणीचे महत्व काय ?

कोणाच्याही जमीनीस पिक पाहणी सदरी कोणाचेही नांव लावले जाते व तलाठी हे काम करतात अशी सार्वजनिकरित्या शेतकरी किंवा खातेदार चर्चा करतांना आपण पाहतो. १९७१ साली याबाबत शासनाने पिक पाहणीच्या संदर्भातील नियम बनविले व तेव्हापासून अशाप्रकारे कोणाच्याही जमीनीला दुसर्या कोणाचेही नांव थेट पिक पाहणीस लावण्याचे अधिकार तलाठयांना नसल्याचे स्पष्ट केले.
पिकांच्या निरीक्षण काळात, सर्व जमीनीच्या बाबतीत मालक हाच जमीन कसतो काय याची पडताळणी केली जाते. ७/१२ वर नांव असणारी व्यक्ती आणि प्रत्यक्ष जमीन कब्जात असलेली व्यक्ती एकच आहे काय याची पडताळणी तलाठयाकडून केली जाते. जमीन मालक किंवा त्याचे कुटूंबीय ही जमीन कसत असतील तर त्यांचे स्वत:चे नांव खुद्द या स्वरुपात ७/१२ स पिक पाहणी सदरी लावली जाते.

पीक पाहणीतील गैरसमज :

कोणाच्याही जमीनीस पिक पाहणी सदरी कोणाचेही नांव लावले जाते व तलाठी हे काम करतात अशी सार्वजनिकरित्या शेतकरी किंवा खातेदार चर्चा करतांना आपण पाहतो. १९७१ साली याबाबत शासनाने पिक पाहणीच्या संदर्भातील नियम बनविले व तेव्हापासून अशाप्रकारे कोणाच्याही जमीनीला थेट पिक पाहणीस लावण्याचे अधिकार तलाठयांना नसल्याचे स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा