एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, १ एप्रिल, २०१७

चला ग्रामपंचायतीला समजावून घेऊया तंटामुक्त अभियान समितीचे महत्व

१) राज्यात सन 2007 साली सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अभियान समितीत सुशिक्षित, निर्व्यसनी, चारित्र्यवान अध्यक्षाची निवड व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने 8 मार्च 2016 रोजी एक शासन निर्णय काढून त्यात या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची ग्रामसभेत कशा पद्धतीने नियुक्ती करावी व अध्यक्षपदासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती याचीही सविस्तर माहिती देण्यात आली होती. मात्र, हा शासन निर्णय डावलून जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी नूतन अध्यक्षांच्या निवडी केल्या आहेत.

२) शासन निर्णयानुसार यंदाचे नूतन तंटामुक्त अध्यक्ष व सदस्य या पदांवर प्रतिष्ठित, समजूतदार, सामाजिक प्रश्नांची जाण असलेले, नि:स्वार्थी, चांगले चारित्र्य, निर्व्यसनी, अवैध धंदे न करणार, गुंडप्रवृत्ती आदी बाबी लक्षात घेऊन आणि संबंधित पोलिस स्टेशनकडून वर्तवणुकीचा दाखला घेऊनच नूतन अध्यक्षाची निवड करण्याच्या सूचना यात देण्यात आल्या आहेत.

३) नूतन पदाधिकारी व अध्यक्षांनी गैरवर्तन केल्यास त्यांची निवड तात्काळ रद्द करून नूतन अध्यक्षाची निवड ग्रामसभेत करण्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत. मात्र या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत पुन्हा मनमानी पध्दतीनेच तंटामुक्ती अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.

४) तंटामुक्त गावसाठी एक लाखाचा पुरस्कार दिला जात असे हा पुरस्कार २०१३ नंतर पाच लाख इतका करण्यात आला आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीत तंटामुक्त योजनेतील पुरस्कारांचा निर्णय होतो.

५) महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियान सक्षमपणे राबवण्यासाठी विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी जिल्हा मूल्यमापन समिती ही त्या संबंधित सर्व गावातील तंटामुक्ती गाव समिती व तेथील ग्रामस्थांची बैठक घेऊन या तंटामुक्ती अभियान मोहीम कालावधीत त्या स्थानिक समितीने केलेल्या कामांचा आढावा घेऊन स्वयंमूल्यमापन अहवाल, नोंदवह्या व अभिलेख या दस्तावेजांची तपासणी करण्यात येते. तसेच याच कालावधीत दाखल तंट्यांची व नव्याने निर्माण झालेल्या तंट्यांची माहिती एकत्रित करून त्यांच्या नोंदी संबंधित विषयांच्या नोंदवहीत करण्यात आल्या आहेत की नाही, याचीही पडताळणी यावेळी करण्यात येते.

६) प्रत्येक गावात स्थापन करण्यात आलेली तंटामुक्ती गाव समिती एक स्वयंमूल्यांकन अहवाल तयार करत असते. या समितीने तयार केलेला स्वयंमूल्यमापन अहवाल शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार आहे की नाही, याची तपासणी करण्यात येते. तसेच दिवाणी तंटे, महसुली तंटे, फौजदारी तंटे व इतर अशा चारही प्रकारच्या मिटविलेल्या तंट्यांतील किमान प्रत्येकी दोन तंट्यांतील वादी व प्रतिवादी यांच्याशी संपर्क साधून तंटा मिटल्याची खात्री करण्यात येते. तंटामुक्ती गाव समितीने ठरवून दिलेल्या नियमांनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असल्याची खात्री करण्यासाठी जिल्हा मूल्यमापन समिती अनेक मुद्द्यांचा विचार करते.

७) तंटामुक्ती गाव समितीकडे देण्यात आलेली नोंदवही क्रमांक एक, परिशिष्ट सहा व त्याच्यासोबत सादर करण्यात आलेल्या सर्व माहितींची तपासणी करण्यात येते. याचबरोबर तंटामुक्ती गाव समितीच्या सदस्यांसोबत सविस्तर चर्चा करून तंटामुक्ती अभियान सक्षमपणे राबवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच उपउपाययोजनांची कार्यवाही करण्याची जबाबदारी ज्यांनी पार पाडली त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून माहिती घेणे, गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विविध मंडळे, महिला मंडळे, महिला बचत गट, इतर संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा करून माहिती घेण्यात येते.

८) जिल्हा मूल्यमापन समिती शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार तंटे मिटविले गेले आहेत की नाही, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत ही नाही याची खात्री करून त्यानुसार मार्क देण्यात येतात. गावाच्या लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार दिले जाणार असल्यामुळे मूल्यमापन समिती 2001 च्या जनगणनेनुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्या योग्य असल्याचीही खात्री करते आणि त्याचा उल्लेख मूल्यमापन अहवालात केला जातो. या पद्धतीने प्रत्येक गावाच्या कामकाजाची सखोल पडताळणी केली जाते.

३१ टिप्पण्या:

  1. तंटामुक्ती अभियान समिती

    उत्तर द्याहटवा
  2. शाषनाने तंंटामुक्ती अध्यक्ष थेट जनतेतुन सर्व गावातील
    मतदार गुत्प मतदान करतील,व योग्य अध्यक्ष निवडला
    जाईल,त्याचे कारण असे सध्या शाषन जी प्रक्रिया राबवते
    त्या मध्ये योग्य अध्यक्ष निवडुन येत नाही,कारण गावा मध्ये
    दोन तीन गट असतात,जो तो आपल्या मर्जितले लोक
    जमा करतो,मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर केला जातो
    त्या ठिकाणी सत्य उमेदवार टिकत नाही,लोक हात वर करुन
    मतदान करत नाही,गुप्त मतदानासाठी कोणीी तयार होत
    त्या ठिकाणी बलदंंड गट गोंंधळ निर्मान करतो,
    या सर्व प्रकारातुन गावात तंंटे लावणारा निवडला,
    शाषनाने जुण्याकायद्यात दुरुस्ती करुन तंंटामुक्ती अध्यक्ष
    हा गुप्त मतदानाने निवडवा असे केल्यास,ग्रामसभेत
    गोंंधळ होणार नाही,खर्‍या उमेदवाराला व सामान्य जनतेला न्याय मिळेल,जनता या निर्नयाने सरकारचे स्वागत
    करेल.
    मी योगेश ओव्हाळ
    मा.तंंटामुक्ती अध्यक्ष,शिंंदोडी ता.शिरुर जि.पुणे,
    मो.९४२१००८०७०

    उत्तर द्याहटवा
  3. दिवाण खैरी या गावी चोरीचा गुन्हा आहे तरी तंटामुक्त प्रमुख म्हणुन निवड केली आहे .

    उत्तर द्याहटवा
  4. तंटामुक्ती अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्ष असतो

    उत्तर द्याहटवा
  5. तंटामुक्त अध्यक्ष महिला आरक्षण

    उत्तर द्याहटवा
  6. अचलपुर तालुक्या तील धांमणगाव गढि येथे तंटामुक्त अध्यक्ष निवडणुकीत अध्यक्ष उमेदवार यांने गांवा तील मुलांना 200/250 रुपये रोजा ने 200/300 लोंकाना आनुन हुल्लड़ बाजी करुन अध्यक्ष पद घेतले विशेष करुन अध्यक्ष पद उम्मीदवार वर घरातील भाई-बंधु चे भांडने चे 10 चे खटले पुलिस स्टेशन मध्ये व कोर्ट मध्ये केसेस चालु आहे तर यालाच म्हनता का तंटा मुक्त अध्यक्ष पैसा फेंको तमासा देख को

    उत्तर द्याहटवा
  7. Jar ekhadi jaga hi grampanchayatichya haddit nasel tarihi tya prakaranat nirnay ghenyacha Adhikar Tanta mukti samitila ahe ka

    उत्तर द्याहटवा
  8. औसा तालुक्यातील मातोळा गावामध्ये 15-09-2018 रोजीची ग्रामसभा 23-09-2018 रोजी घेण्यात आली आणि त्या रोजी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अध्यक्ष पदासाठी विषय मांडला गेला असताना एका नागरिकांनी विरोध केल्यास त्याच्या अंगावर गुंड सोडून त्या नागरिकलरला मार हान करण्याचा प्रयत्न केला. तर यावर आपले काय उत्तर आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तंंटामुक्ती अध्यक्ष
      हा गुप्त मतदानाने निवडवा असे केल्यास,ग्रामसभेत
      गोंंधळ होणार नाही,खर्‍या उमेदवाराला व सामान्य जनतेला न्याय मिळेल,जनता या निर्नयाने सरकारचे स्वागत
      करेल.

      हटवा
    2. तंटामुक्ती मध्ये जर एकदया गावाला परितोषिक मिळाला असेल तर त्या गावामध्ये अवेध दारू धंदे चालू असलेले चालतात की नसावेत

      हटवा
  9. तंंटामुक्ती अध्यक्ष JAN MAHITI ADIKARI HAI KA P/S GR

    उत्तर द्याहटवा
  10. तंटामुक्ती अध्यक्ष यांना एका विषयावर गाव पातळीवर किती वेळा मीटिंग घेण्याचा अधिकार असतो

    उत्तर द्याहटवा
  11. तंटा मुक्ती अध्यक्ष असतांना आपली जबाबदारी पार पडताना अनेक वेळी तंटा मिटवताना काही व्यक्ती तंटा मुक्ती अध्यक्ष वर खोटेगुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात .तर अश्या वेळेस काय करावे...

    उत्तर द्याहटवा
  12. तंटामूक्ती अध्यक्ष/सचिव यांचेकडे झालेल्या निर्णयाची प्रत मिळविण्यासाठी अर्ज करूनही दखल घेतली जात नाही, याविरुद्ध कोणाकडे तक्रार करावी

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तंटा सामंजस्याने आणि तडजोडीने मिटवून दोन पांचा समक्ष तडजोड नामा करून घ्या. दोघांना आणि पोलिस ठाण्यात कॉपी पाठवून द्या.

      हटवा
  13. अध्यक्ष निवडी संदर्भात काही जी आर असेल तर पाठवा की पोलीस व्हेरिफिकेशन लागतेच का

    उत्तर द्याहटवा
  14. ग्रामपंचायत भोसा, ता.आमगांव, जि.गोंदिया
    येथे आज दि.23/8/2019 ला अध्यक्ष निवड केली तेथे ग्रामसेवक गैरहजर होते व फक्त नांव लिहता येते अशा व्यक्ति ला अध्यक्ष म्हणून निवड केली व त्या साठी पोलिस विभागा कडुन चारित्र्य प्रमाणपत्र घेतले नाही व सर्व नियमांना केराची टोपली दाखवणार्या संरपंचावर शासनाकडुन कार्यवाही करावी

    उत्तर द्याहटवा
  15. सर तंटा मुक्ती मधे पैसे भरून न्याय दिला जातो का ?
    दोन्ही पक्षा कडून पैसे घेऊन न्याय दिला जातो का?

    उत्तर द्याहटवा
  16. तंटामुक्त अध्यक्षाची निवड हे गुप्त मतदान पद्धतीने व्हावी हे योग्य आहे

    उत्तर द्याहटवा
  17. तंटा मुक्ती अध्यक्ष निवड करण्यासाठी गुप्त मतदान पध्दत योग्य आहे पण शिस्तबद्ध होने गरजेचे आहे

    उत्तर द्याहटवा
  18. आता तर कलम49अंतर्गत समीती म्हणून घोषीत केले आहे आणी त्यासर्व समीतीचे अध्यक्ष सरपंच आणी सचिव ग्रामसेवक केले आहे

    उत्तर द्याहटवा
  19. ऐका गावात सतरा पुढारी कोण कोणाचे ऐकत नाही पाड्यात पुढारी घराघरात पुढारी मग गावचे पोलीस पाटिलचे काम उलटे सुलटे करणारे हे आपल्या गावचे सतरा पुढ्यराचा पाठिंबा शिवाय होणे शक्य. दुरशा वळवी कालिबेल धडगाव महाराष्ट्र.

    उत्तर द्याहटवा