एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, २७ मार्च, २०१७

फेरफार करणारा सक्षम अधिकारी

७/१२ वर कोणताही हक्क नोंदवण्यापूर्वी फेरफार नोंद केली जाते. गावदप्तरी याला गाव नमुना नं.६ - फेरफाराची नोंदवही असे म्हणतात. अनेक ठिकाणी हा नमुना ड म्हणून तर काही ठिकाणी नोंदीचा उतारा म्हणून प्रसिध्द आहे. फेरफाराची नोंदवही ही वास्तविक फेरफाराची दैनंदिनी आहे.

फेरफार नोंदी या फक्त तलाठयाकडून लिहील्या जातात. त्या मंजूर किंवा नामंजूर करण्याचा कोणताही अधिकार तलाठयास नाही. कोणत्याही व्यक्तीला जमिनीमध्ये खरेदी खताने, वारसा हक्काने, इतर अधिकाराने, वाटपानुसार, बक्षीस पत्राने, गहाण पत्राने, देणगीने, पट्टेदार म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे जमिनीमध्ये हक्क प्राप्त झाला तर अशा कागदपत्रांच्या आधारे पहिल्यांदा फेरफार नोंद लिहीली जाते व अशा नोंदी प्रमाणित झाल्यानंतरच ७/१२ स अंमल दिला जातो.

नोंदीची मंजूरी :
नोंदी या मंडल अधिकारी किंवा सर्कल भाऊसाो हे प्रमाणित करतात. कोणतीही नोंद एकदा मंजूर किंवा नामंजूर झाल्यानंतर या नोंदीमध्ये बदल करावयाचा तलाठयास किंवा मंडल अधिकार्यानां कसलाही अधिकार नसतो. अनेक वेळा शेतकरी मित्र या नोंदीमधील बदल करुन देण्याचा तलाठयांकडे आग्रह करतात. नोंदी एकदा मंजूर किंवा नामंजूर झाल्या आणि ती जर आपल्याला मान्य नसेल तर अशा नोंदीविरुध्द संबंधीत प्रांत अधिकार्यााकडे अपील केले पाहिजे. अपील किंवा फेरफार तपासणीशिवाय पूर्वी मंजूर किंवा नामंजूर केलेल्या नोंदीमध्ये बदल होऊ शकत नाही.
फेरफार नोंदीचे हे महत्व विचारात घेता, अगदी गेल्या १०० वर्षातील सुध्दा ७/१२ तील बदल कशामुळे झाला हे त्या नंबरची फेरफार नोंद वाचली असता समजू शकते.

३ टिप्पण्या: