एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, २२ मार्च, २०१७

सातबाऱ्यावर चुकीची नोंद होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी

सातबाऱ्यावर चुकीच्या नोंदी होऊ नये यासाठी शेतकऱ्याने आपला सातभारा वेळोवेळी नीट तपासून पाहावा व चूक असेल तर तलाठ्याला दाखवणे.

१. पीक पाहणीच्या काळात, जमीन मालक सोडून, दुसर्याि कोणाचेही नांव वहिवाटदार सदरी थेट दाखल करण्याचे अधिकार तलाठयांना नाहीत. त्यामुळे जमीन मालक सोडून अन्य व्यक्ती वहिवाटीचा दावा करीत असेल तर फक्त अहवाल पाठविण्याची जबाबदारी गाव कामगार तलाठयाची आहे. त्यानंतर रितसर चौकशी करुन वहिवाटदार सदरी कोणाचे नांव लावावे याचा आदेश तहसलिदार यांच्याकडूनच दिला जाते.

२. पीक पहाणीच्या काळात, शेतातील पीके व त्यांचे क्षेत्र तसेच झाडे यांची नोंद ७/१२ वर करणे.

३. आपल्या शेतात किती क्षेत्रावर आपण कोणते पीक घेतले आहे व त्याची अचूकपणे ७/१२ वर नोंद झाली आहे काय? याची खात्री प्रत्येक शेतकर्यातने केली पाहजे. तसेच फळझाडांच्या नोंदीदेखील ७/१२ वर करुन घेतल्या पाहिजेत.

४. एखाद्या महत्वाच्या विषयासंबंधीची चर्चा गावामध्ये असेल त्यावेळी शेतकर्यां नी त्या विषयासंबंधीची माहिती, गावी करण्यांत आलेले प्रसिध्दीकरण वाचून घेतली पाहिजे. उदा. मतदार यादीवर जर हरकती मागविल्या असतील तर आपल्या घरातील सर्वांची नांवे नोदवली आहेत काय? हे बघणे शेतकर्यांणच्या हिताचे आहे.

५. नवीन शर्तीच्या जमीनीचे हस्तांतरण झालेले आढळल्यास त्याचा अहवाल तहसिलदार यांचेकडे पाठविणे.

६. संबंधीत शेतकर्यांरनी याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन, संबंधीत वरिष्ठ अधिकार्यां कडे कामकाज चालविले पाहिजे. नवी शर्तीच्या जमीनीचे बेकायदेशीर हस्तांतर होणार नाही, हे बघण्याची जबाबदारी तलाठयांवर आहे. असे हस्तांतर कायदेशीर करण्याचे अधिकार तलाठयाचे नाहीत. त्यामुळे त्याबाबत तलाठयांकडे
आग्रह धरु नये.

७. जेव्हा गावात नवीन शिधापत्रिका दिल्या जातात तेव्हा घरातील सर्व व्यक्तींची नोंद आवश्यकपणे त्यावर केली पाहिजे.

८. पीक पाहणी व नोंदणी कालावधीत जातीने शेत हजार राहावे.

९. शेजारच्या  शेतकऱ्याने  मोजणीचा दगड हलविला किंवा काढून टाकला तर मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांना ताबडतोब लेखी अर्ज देता येईल.

१०. कॅनॉल, पाझर तलाव, स्मशानभूमी, गावठाण वाढ, रस्ता अशा सार्वजनिक कामास जमीन संपादन केली जाते. त्यावेळी शेतकऱ्याने जागेवर उपस्थित राहणे, नक्की कोणत्या बाजूची जमीन संपादनास विचारात घेतली आहे. हे जाणून घेतले पाहिजे. आपण गैरहजर राहिलो तर सरकारला जमीन घेता येणार नाही, असा एक मोठा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आढळून येतो. वास्तविक समक्ष उपस्थित राहून किती जमीन व कोणत्या बाजूची घेतली जाते हे कळू शकते. शिवाय भूसंपादनाची अंतिम अधिसूचना प्रसिध्द होण्यापूर्वी योग्य ती हरकत शेतकरी मांडू शकतो. समक्ष उपस्थित राहिल्यास अनेकवेळा जमीनीची प्रत व भूसंपादनाचे क्षेत्र याबाबत तडजोडीतून काही मार्ग निघू शकेल. उदा. जर रस्त्यासाठी काळया जमीनीतून, विहिरी जवळून, घराशेजारुन किंवा जमीनीचे तुकडे करुन क्षेत्र घेतले जात असेल तर त्याऐवजी शेजारच्या मुरमाड जमीनीतून, विहिरी पासून अंतरावर, घरापासून लांब किंवा बांधावरुन किंवा तुकडे होणार नाही अशारितीने रस्ता सूचविता येईल व आपल्या हक्काचे संरक्षण करता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा