एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

मानवता धर्म

.            🙏🏼 *मंगलमय बुद्धविचार* 🙏🏼

             गौतम बुद्धांना लहानपणी सिद्धार्थ म्हणत. हा सिद्धार्थ लहानपणापासून विचारी आणि चिकित्सक होता. जेव्हा इतर मित्र खेळण्यात दंग असायचे, तेव्हा हा सिद्धार्थ ध्यानस्थ बसलेला असायचा. तो बारा वर्षांचा होता, तेव्हाची गोष्ट. त्याचे सर्व मित्र, चुलतभाऊ शिकारीला निघाले. पण सिद्धार्थ मात्र बसून होता.
     आईने विचारले, " सिद्धार्थ, शिकारीला जाणार नाहीस का ?" सिद्धार्थाने मानेनेच नाही म्हणून सांगितले.
               " अरे तू शिकारीला गेलं पाहिजेस, तुला शिकार करता आली पाहिजे."
            सिद्धार्थ म्हणाला, " आई, मला माहीत आहे, हे लोक वाघाची शिकार करणार नाहीत. शिकार केली तर ससा किंवा हरिण अशा निरुपद्रवी प्राण्यांची ते शिकार करतील."
            " अरे, कसंही असलं तरी तू शिकारीचा सराव करायला हवास, त्याशिवाय तुला शस्त्र कशी चालविता येतील ?" आई म्हणाली.
         " पण मला शस्त्रे चालविण्याची गरज काय ?"
         *" सिद्धार्थ, तू राजपुत्र आहेस. पुढे जाऊन तू या राज्याचा राजा होणार आहेस. लढाई करणे हा तुझा धर्म आहे. म्हणून तू शस्त्रे चालविण्यात पारंगत व्हायला हवेस."*
              त्यावर सिद्धार्थाने दिलेले उत्तर आजच्या कट्टर धर्मप्रेमींनीही विचार करावा असे आहे.
           सिद्धार्थ म्हणाला, *" आई, जो धर्म लढाई करायला सांगतो, तो कसला धर्म ? माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे. प्रेमाने आपुलकीने रहावे. लढाई, भांडण करू नये. सर्वांशी न्यायाने वागावे. असे सांगणारा, प्रेम, दया, शांतीचा मार्ग दाखविणारा धर्म हवा. मलाच नाही, तर जगातील प्रत्येक माणसाला अशाच धर्माची गरज आहे."*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा