एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, १५ जानेवारी, २०१७

पँथरचा जनक महाकवी

*नामदेव ढसाळ यांचा आज स्मृतीदिन* 🙏🏻🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻
साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे एक प्रमुख शिलेदार होते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या *'दलित पँथर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.* दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांच्या साथीने त्यांनी १९७२ मध्ये पँथरची स्थापना केली. अमेरिकेतील 'ब्लॅक पँथर' चळवळीपासून प्रेरणा घेऊन जन्मलेल्या या संघटनेने दलित चळवळीला एक आक्रमक चेहरा दिला. दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घ्यायला भाग पाडले. त्यावेळच्या प्रत्येक आंदोलनात ढसाळ यांनी हिरिरीने भाग घेतला. कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, 'दलित पँथर'शी ढसाळ यांचे नाते अखेरपर्यंत कायम होते.
नामदेव ढसाळ यांचे बुधवार,१५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा