एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

श्रद्धा असू द्यात

*हे कायमचे लक्षात ठेऊया:*

*1) 🤑🌶🍒 लिंबू-मिरची खायची असतात - बांधण्यासाठी नसतात..*

*2) 😱🐈 मांजर पाळायची असते - मांजर आडवी गेली कि काही वाईट होत नाही.उलट उंदरांपासून नुकसान होण्याचे टळते.*

*3) 🗣💭💃 शिंक येणे हा नैसर्गिक प्रकार आहे - शिंकल्याने काही अघटीत होत नाही किंवा काही अडचणीही येत नाहीत..*

*4) 💀🌳 भूत झाडावर राहत नाही - झाडावर पक्षी राहतात..*

*5) 🔬🔭 चमत्कार असे काही नसते - प्रत्तेक गोष्टी मागे विज्ञान आहे प्रत्येकाला कारण आहे..*

*6) ⛄☃ बुवा, बाबा लोक खोटे आहेत - ज्या लोकांना अंग मेहनत करायची नसते तेच हे लोक..!!*

*7) ⛈🌪👺🔥 करणी,         जादू टोणा काही नसते - हे भ्याड लोकांच्या मनाचे खेळ आहेत..*
*जादू-टोणा करून ग्रहाची दिशा बदलणारे हे ढोंगी बाबा: वारा, ढगांची दिशा बदलून पाऊस का पाडत नाहीत...?*⛈☁🌒💫

*8)🌏🐠वास्तुशास्त्र भ्रामक आहे. केवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे.*
*खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा* *क्षणाला दिशा बदलत असते.*
*खरेच कुबेर उत्तर दिशेला* *असता तर जगातील इतर ठिकाणी कसा आला नाही.*

*9) 👼🐓🐐🍇🍎नवसाने,  व्रताने, पुजेने, नैवैद्याने, बळीने, देणगीने, प्रसन्न होऊन फळ देतो देव, म्हणजे तो काय लाचखाऊ आहे का ?!!*

*10) हे जे वाचलात ते स्वता अनुकरण करा आणि आपल्या मित्रांना देखिल send करा ।*

*हा मैसेच बाकी ग्रुपवर send केल्यामुळे काही चांगली बातमी येणार नाही पण पुढची पीढ़ी नक्की  सुधरे

☀  मुहूर्ताचे वेड ☀
ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! जन्माला येताना कधी मुहर्थ पहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आपल्यासाठी  सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे..!!

☀ कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...? 
पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..?
95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...?
  
☀ मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते.....? एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????  मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते !

☀ शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय..?
☀ अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीसारखी  झाली का...?

☀ उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांना,  व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...?

         :  कारण :
☀   शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे... ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.
☀मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली ...आणि कधीही मुहूर्त न पाहणारी .....ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.
☀स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. चांगले कर्म हेच देव-ईश्वर माना.

☀ जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर..... स्टँम्प पेपरवर लिहून देण्यास सांगा.  यश न आल्यास नुकसानभरपाईचा दावा ठोकेल  असे सांगा . ते तुमच्या जवळही फिरकणार नाहित.
कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.

☀ जर तुमचं  मन साफ असेल व  तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल....तर तुमच्यासाठी कोणतीही  वेळ  ही  ' शुभ मुहूर्तच ' असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या.

🙏🏻चला..जगण्याची दिशा बदलूया..!!
सुरुवात स्वतःपासून..!!🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा