एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

आमची दिवाळी

               *ती दिवाळी*
 आमच्या वेळी दिवाळीत
 मज्जा असायची
घरे रंगवून एकमेकांची
घाटावर वाकळा धुवायची
आपली आपणच ऊब शोधून
थंडीला चिडीचूप करायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
उठण्या काकड आरती अन्
उटण्याला खरखर असायची
थडथडत्या थंडीत देखील
चिमुकली बाळं उठायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
दारात सडा रांगोळी अन्
प्रसन्न माणसं दिसायची
अंथरूण पाहून खोटा बडेजाव
प्रकर्षानं टाळायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
फुलांनी भरलेली रानं
अन् हिरवीगार सृष्टी दिसायची
धूर ओकणारी डांबरी सडक
दिवाळी अंकात दिसायची आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
जेवणात घरच्या चक्क्याचं श्रीखंड
तर गरमागरम बासुंदी असायची
त्यावेळी गावाकडेला
चायनीजची गाडी नसायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
दाताखाली चकली खुसकन तुटायची
आणि फराळाला ओसरीवर
सारी गल्ली जमायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
सात रुपयांच्या फटाक्यात
पाच भावंडं हसायची
त्यातलीच एक माळ
तुळशीच्या लग्नाला वाजायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
किल्ल्यावर कारंजे अन्
तळ्यात बदके असायची
अन् कोपऱ्यात संयम शिकवणारी
वाघाची गुहा असायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
मलमपट्टीची चांदणी
तुळईतून बाहेर यायची
उंच आकाश पाहून नंतर
माळ्याला आभाळ समजायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
लक्ष्मीपूजनाला पाटावर
चिल्लरीची रास असायची
लक्ष्मीलाही त्यावेळी
नोटांची आस नसायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
पाडव्याच्या साडीला आई
सगळा पगार घ्यायची
अन् पगाराची घडी मोडून
सारी बिले भागवायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
भाऊबीजेला टिकल्यांच्या डबीत
ताई खूष असायची
दादाला औक्षण करून
पुन्हा स्वतःला ओवाळून घ्यायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
वाढत्या अंगाची चड्डी
करगोटयात असायची
दिवाळी टू दिवाळी
ती आरामात टिकायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
रेडिओवर दिवाळीची गाणी
आणि हलकेच सनई वाजायची
आतासारखी एफ्.एम्.वर
रॅप डंख अन् मिरची नसायची
आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
एक पणती रात्रभर दारातल्या
दिवळीत तेवायची, अन
उद्याच्या फ्लॅटच्या कल्पनेनं
आतल्याआत रडायची. आमच्यावेळी दिवाळीत मज्जा असायची
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 ******

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

ब ळी चा इतिहास

*" बळिराजाचा खरा इतिहास "*

*ईडा पीडा जाउ दे बळिचे राज्य येऊ दे* ……आम्ही सर्व बहुजन म्हणतो पण कोण हा बळी...?  का वाट बघतोय आम्ही त्याच्या राज्याची.... *तो ईतका चांगला होता तर वामनाने त्यास का मारले व  त्याच्या मरणाचा दिवस आम्ही दिवाळी म्हणुन का साजरा करतोय* तर बळी हा नाग राजा होता त्याचे राज्य महाराष्ट्रावर होते एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार निट चालावा म्हणुन राज्याचे नऊ विभाग केले त्यास *नउ खंड* म्हणतात नउ खंडाचे त्याने नउ आधिकारी नेमले होते त्याना *खंडेराव* असे म्हटले जाई जेजुरीचा त्यापैकिच एक खंडोबा खंडोबाने(जेजुरिच्या) ब्राम्हण मल्लाना हारवले होते त्यास *मल्हारी* म्हनत व तो दुश्मनावर समोरुन हल्ला करी पाठमोर्या शञुवर तो हल्ला करत नसे म्हणुन त्यास *मार्तंड* असेही म्हटले जाई त्याच्या हाताखाली महसुल आधिकारी असायचा त्यास हिंदुनी *म्हसोबा* बनवल तसेच सेतसारा वसुल करनार्या आधिकार्यास सातीआसरा आसा अपभ्रंश केला तर अशा गुणी राजाचा बळिराजाचा कारभार अतिशय सुरळित होता त्यामुळे त्यास हरवने आर्याना अशक्य झाल्याने त्यानि चाल खेळली त्यानी वामनास पुढे करुन आश्रमास जागा मिळवली बळिराजाचा विश्वास वामनाने संपादित केला आश्रमात शिष्यांना विद्या शिकवीन्याच्या नावाखाली सैन्याची जमवा जमव केली नंतर बळिराजाचे सर्व सैन्य मोहिमेवर राज्या बाहेर गेल्याचा डाव साधला साधुंच्या वेश्यातील सैनिकानी बळिराज्याच्या महालावर हल्ला केला तरि कमी सैन्यानिशी बळिने 20 दिवस झुंज दिली अखेर विरगती प्राप्त झाली तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा ब्राम्हणानी मोठा ऊत्सव साजरा केला घरावर रोषनाई केली आतिषबाजी केली पण त्यानंतर बाहेर गेलेलं बळिचं सैन्य परत आलं वामनाला माञ पळती भुई थोडि झालि तो पळुन डोंगरावर लपुन बसला तरी त्यास ठार मारले

        *( संदर्भ - गुलामगिरी )*
     
 *गुलामगीरी - जोतीराव गोविंदराव फुले*

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

Officer the great

भारतातून परदेशात गेलेला मुलगा शिकला.
मोठा आँफीसर झाला.
आणि भारतात आला.
घरी जायची ओढ होती.
पण कंपनीच्या लोकांनी विमानतळावरच घेरले
आणि भव्य सत्कार केला.
सजवलेल्या गाडीत बसवले.
आणि भव्य मिरवणूक निघाली.
एका फाइव्ह स्टार हाँटेल समोर थांबले.
साहेब आज इथ थांबा.
सगळ्यांचा आग्रह.
साहेब गाडीतून उतरले.
आजूबाजूचे लोक फुले उधळत होते.
काय सांगाव ते कौतुक.......
साहेब दरवाजा पर्यत आले.
दरवाजा जवळ एका डोअरकिपर म्हाताऱ्याने नेहमी येणाऱ्या लोकांना मुजरा करतो तसा मान खाली घालून मुजरा केला. ..
दरवाजा उघडला. साहेब आत शिरले..
आणि .
विजे चमकावी तसे चमकले....
आणि
तक्षणी माघारी फिरले. ...
दरवाजा जवळ आले...
डोअर किपरने खालची मान वर केली ...
साहेबांची आणि त्याची नजरा नजर झाली.
आणि आणि ...
दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. .
साहेब अश्रू ढाळीतच त्या डोअरकिपरच्या पायावर झुकला.
आणि नकळतच तोडांतून शब्द बाहेर पडले....
बाबा.......बाबा
तुम्ही इथे.....
आणि बराच वेळ बापलेक गळ्यात गळा घालून रडत राहिले.
बाजुच्या लोकांना ही गहीवरून आले.

आपल्या मुलाने परदेशी जावे.
मोठे व्हावे यासाठी हा बाप नोकरी करत होता.
ओव्हर टाईम करत होता.
पोटाला पोटभर खात नव्हता पण मुलासाठी पैसे पाठवत होता.
तो रिटायर झाला.
पैसा कमी पडू लागला.
म्हणून या हाँटेलमधे डोअर किपरची नोकरी करायला लागला.

दरवाजात कोणीही आले तरी मान खाली घालून मुजरा करायचा.
आणि दरवाजा उघडायचा हा त्याचा नियम ठरला.
आणि आज तोच मुजरा त्याच्या मुला साठी होता.
आयुष्यभर दुसऱ्याला मुजरा करणाऱ्या हाताने त्याने मुलाला घडवले.

मला सांगा यात श्रेष्ठ कोण
तो साहेब की तो डोअरकिपर
तो आँफीसर की नोकर
तो मुलगा की बाप....

यशाची शिखरे चढणार्या प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या साठी यशाच्या प्रत्येक पायरीचा दगड हा बाप असतो.
तुमच्या जीवनाच्या आणि करिअरच्या इमारतीचा पाया हा बाप असतो.
पाया कधी दिसत नाही पण त्या शिवाय इमारत उभी राहू शकत नाही.
हा बाप घरात कायम
वेठबिगारी हमालासारखा जगतो.
राञन् दिवस कष्ट करतो.
कोणी शेतात.
कोणी आँफीसात.
कोणी रोजंदारीवर.
तो फक्त राबत असतो.
त्याच्या जीवावर मुलं शिकतात. मोठी होतात. पुढे जातात. आणि त्यालाच म्हणतात. तुमच्या पेक्षा आम्ही कतृत्ववान आहोत. काय केले तुम्ही ?
आपल्या बनियनला भोक पडू नये यासाठी स्वतःच्या बनियनची भोक विसरणारा तो बाप.
आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून स्वतः घामाने भिजनारा बाप.
आपल्याला चांगले बुट मिळावे म्हणून फाटक्या चपला वापरणारा बाप.
स्वतःची स्वप्न तुमच्या डोळ्यांत बघणारा तो बाप..
लहानपणी आजारी पडला तर पाठीवर घेऊन रात्री अपराञी दवाखान्यात नेणारा तो बाप..
तुमचे शिक्षण पुर्ण करणारा तो बाप..
पाहिजे तेव्हा पैसे देणारे ATM मशिन म्हणजे बाप...
ज्याला बाप आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळतात.
बाप आणि बापाच काळीज समजून घेतले पाहिजे.
बाप
बोलेल
मारेल
शिक्षा करेल
पण आपल्या चुका सुधराव्या म्हणून....
आई चुक पदरात घेईल पण बाप चुक सुधरायला लावेल.
ज्या घरात बाप आहे त्या घराकडं कोणी वाईट नजरेनं पाहत नाही
पण जिथे बापाची छाया नसेल त्या घरावर कोणीही दगड मारत.
माझ्या एका मिञाचे वडील गेले..
जिवंतपणी त्या बापलेकांच कधीच पटले नाही. पण जेव्हा काही दिवसांनी मी त्याला भेटलो त्या वेळी बापाच्या आठवणीने तो धायमोकलून रडला. दत्ताभाऊ, ज्या वेळी वडील होते तेव्हा त्यांची किंमत कळली नाही. मी कायम नावं ठेवत होतो. कधी ऐकल नाही . पण आता ज्या वेळी जगाच्या बाजारात जातो. टचके-टोमणे खातो. आज मला त्यांची उणिव भासते.
आज माझे वडील असते तर अस बोलले असते...
आज वडील असते तर हा मार्ग सांगितला असता.
वडीलांनी काही नको करू दे. पण घराला एक आधार होता .
मला जेव्हा विचारले जाते
जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो
जगात यशस्वी कोण ?
ज्याला आई बापाची कींमत कळाली तो
जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो
आणि
जगात नालायक कोण ?
ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.
मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात
खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.

.
.

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

जीवनकथा

दुपारी दुकान बंद करुन घरी जेवायला चाललोच होतो.

तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला , त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते.

मला आश्चर्य वाटले , मी लिस्ट मधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे त्या पिशवीत ठेवले .

कुत्रा ती पिशवी तोंडात घेऊन निघाला.

मी तो कुत्रा कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याच्या मागे निघालो.

कुत्रा बसस्टाॅपवर येऊन एका बसमध्ये चढला , मी ही त्याच्या मागे बसमध्ये चढलो .

पिशवीवर स्टाॅपचे नाव लिहले होते कंडन्टरने पिवशीमधील पैसे घेऊन एक तिकीट त्याच्या पिशवीत ठेवले .

 स्टाॅप आल्यावर कुत्रा बरोबर त्याच स्टाॅपला उतरला , मी ही त्याच्या मागे उतरलो .

थोडे पुढे चालुन गेल्यावर कुत्रा एका घराजवळ थांबला व त्या घराची बेल वाजवली.
 एका माणसाने दार उघडले त्याच्या हातात काठी होती .
त्या माणसाने सामान घेऊन त्या कुत्र्याला काठीने खुप मारले .
मी त्या माणसाला माझी ओळख सांगुन कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले.
तो माणुस म्हणाला साल्याने माझी झोपमोड केला चावी घेऊन गेला असता तर माझी झोपमोड झाली नसती.
जीवनाची ही खरी सच्चाई आहे
 लोकांच्या अपेक्षांचा अंत कधीच पुर्ण होत नाही
जिथे तुम्ही थोडे चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचे थांबवाला की तुम्ही मागे केलेली मदत ते विसरुन तेच लोक तुमची निंदा चालु करतात
त्याकरीता तुम्ही तुमचे कर्म करत चला , कोणाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करु नका कारण कोणीच तुमच्याकडुन कायमस्वरुपी संतुष्ट होणार नाही.......

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

कपालभाती प्राणायाम*

डॅा• घोसालळकर यांनी कपालभातीबद्दल खूपच चांगली माहिती।              🔔         *कपालभाती प्राणायाम*        🔔

कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.

कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता.

कपालभाती करणाऱ्यांची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हार्ट बंद पडल्याने मरतात.
   
कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझाॕल्व्ह होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.

कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो.
 
कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते.

कपालभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात १२% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात २६ ते १८ पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन १६ व् पुरुषांच्ं १८ असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.


कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एका महिन्यातच सामान्य होतात.


कपाभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते.  हे कपालभातीमुळे होते.

एवढंच नाही तर, कपालभाती करणारा ५ मिनिटात मनाच्या पलीकडे जातो. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. स्ट्रेस हामोंस गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहीसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही.

*किती विशेष आहे पहा.*

कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.
   
कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.

कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.

अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.

कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् ३ ते ९ महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.

लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज १०% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे.

विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.

*एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी गुरुकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते.*

*दररोज करा सूर्य नमस्कार कपालभातीयोग।*

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

संविधान म्हणजे भारताचा आत्मा

संविधान लिहिल्या नंतर आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु



संविधान  म्हणजे भारताचा आत्मा ;

1📘📖 - विश्वरत्न  डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 395 कलमाचे का लिहले ??  ;
394 किंवा 396 कलमाचे का लिहले नाहीत? तर त्याला कारण महात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत ते कसे ?? तर
2📘📖- महात्मा फुले यांनी  बहुजन समाजाला  शिक्षण  ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले ; शाळा चालू केले ; त्या शाळेचा क्रमांक 395 होता ; त्याची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान 395 कलमाचे लिहले

3 📘📖- संविधानाच्या या मसूदा समितीवर  सात लोकांची निवड करण्यात आली होती
त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला ; एकाचा मृत्यू झाला; एक विदेशात गेला ; एकाची तब्येत ठीक नव्हती;  एक राजकारणात अडकला

4📖- त्या मुळे मसुदा समिती अध्यक्ष या म्हणून  संविधान लिहण्याची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येवून पडलीय व ती त्यांनी समर्थपणे एकट्यानेच  पार पाडली म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे "संविधानाचे शिल्पकार" आहेत

5📘-संविधानाची सुरूवात कशी करावी ? यावरून वाद चालू होता
त्यात मौलाना हजरत मोहली म्हणून लागले की ;संविधान "अल्लाहच्या "नावाने सुरू करावे
पंडीत मालवीय म्हणाले की; "ओम नम शिवाय" यां नावाने सुरू करा
एच :पी :कामत म्हणाले की -"ईश्वर "नावाने सुरू करा

मग शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले " लोक" नावाने सुरू करा
 मग
  यावर मतदान झाले
मग बाबासाहेब आंबेडकर यांना 68 मते पडली
तर देवाच्या नावाने 41 मते पडलीय
संविधानाची सुरुवात  "आम्ही भारताचे लोक "
या नावाने झाली ;

पहिल्याच मतदानात दगडाचे देव हरले व माणूस जिंकला

6📘 - संविधानाचा कच्चा मसूदा बाबासाहेब आंबेडकर घरी लिहत बसले होते ;
त्या वेळी  बॅ: पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी आले

7📘- यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यां चे स्वागत केले ;
तसेच संविधानाचा लिहत असलेला कच्चा मसूदा  बॅ: पंजाबराव देशमुख  यांना दाखवून  म्हणाले ; "की दादा यावर थोडी नजर मारा व काही सूचना असतील तर सूचवा " मी थोडयावेळात येतो"
 असे म्हणून बाबासाहेब बाहेर गेले

8📘- परत आले तर बॅ :देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू पाहून बाबासाहेब  म्हणतात की दादा तुम्ही का रडताय ?
 यावर देशमुख यांनी सांगितले की  बाबासाहेब  " माझ्या मराठा कुणबी समाजाच्या आरक्षणाची तरतूद करा " हे सांगण्यासाठी बाबासाहेब मी तुमच्याकडे  आलो होतो;
पण तुम्ही किती महान आहात की मी येण्याच्या अगोदरच तुम्ही तो मसूदा तयार करून ठेवलाय ; यामुळे मला आनंदाश्रू आवरत नाहीत

9📕- महात्मा फुले यांनी असे भाकित केले होते की ज्या वेळी बहुजन समाज मनुवादी धर्मग्रंथ वाचेल ;त्यादिवशी तो जाळल्याशिवाय राहणार नाही ;
पहा बाबासाहेबानी मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ जाहीरपणे जाळला व फुलेचा विश्वास खरा केला व फुले यांनी म्हटले होते की दुसरा राजग्रंथ निर्माण करेल ;
मग तो राजग्रंथ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान  लिहून पूर्ण केला

10 📙- अमेरिकेतील कोलंबिया विदयापीठाने एक अहवाल तयार केला की त्या कालेजमधे शिकुन गेलेल्या 200 वर्षाच्या इतिहासात जगात सर्वात विदवान कोण ?  त्यांनी जाहीर केले होते की जगात  डाॅ :बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न ; विदवान आहेत ; father of modern India is Dr  ambedkar

11📕- कोलंबिया विद्यापीठाच्या मैदानात बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पुतळा बनविला आहे व त्यात खाली लिहले होते की    "SYMBOL OF KNOWLEDGE "

12-📙 तेथील  कुलगूरूच्या कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे
व खाली लिहिले आहे की "आम्हाला गर्व आहे की आमच्या काॅलेजमधे शिकून गेलेला आमचा विद्यार्थी एका देशाचा संविधान शिल्पकार ठरला  "

13-📙 नेल्सन  मंडेला म्हणतात की भारताकडून घेण्यासारखा एकच गोष्ट ती म्हणजे आंबेडकर यांनी लिहलेले संविधान

14 📕- संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर  एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की डाॅ बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संविधान लिहताना काही अडचण येत होती का ? यावर बाबासाहेब आंबेडकर यांनी लगेच उत्तर दिले, की माझ्या  डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते
म्हणून मला अडचण आली नाही  "

15📙-बाबासाहेब म्हणाले की संविधान कितीही चांगलेच असू दया पण राबवणारे हात वाईट असेल तर ते संविधान  कुचकामी ठरते  ; म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या हताश मनाचा मानबिंदू म्हणजे संविधान

16📕- संविधान  लिहून झाल्यावर  बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या वेळी तेथील पत्रकाराने विचारले की बाबासाहेब तुम्ही मनासारखे संविधान लिहून तुम्ही नाराज का आहात ? यावर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगितले की ;" मी बहुजनाच्या  कल्याणाचा जाहीरनामा लागू करण्यासाठी ज्यांच्या हातात देत आहे ते लोक माझे बहुजन नाहीत " ;
मला यांच्यावर विश्वास बसत नाही  की ते संविधान  जशाच्या तसे लागू करतील

संविधान  निर्मितीची वरील घडामोडी व कर्मकहाणी सगळी कडे पोहचवा व संविधान विषयी कृतज्ञता बाळगा

आरोग्यमं धनसंपदा

*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.*

१.]   *कोथिंबीर* :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.

२.]   *कढीलिंब* ;-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.

३.]   *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.

४.]  *माठ*  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.

५.]  *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

६.]   *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.

७.]   *अळू*  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.

८.]  *अंबाडी* :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.

९.]  *घोळ* :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.

१०.]  *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.

११.] *मायाळू* :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात.

१२.]  *तांदुळजा* :-  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.

१३.]  *मेथी* :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.

१४.]    *शेपू* ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.

१५.]    *शेवगा* ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.

१६.]     *सॅलड* :-  या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

 (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.



                    कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

ग्रामसभेचे महत्व

ग्रामसभा

जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात.

माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे.

ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.

जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल.

अनेक गावात प्रत्यक्षात ग्रामसभा होत नाहीत. ग्रामसभेच्या ८ दिवस आधी लोकांच्या सह्या घेतल्या जातात, किंवा खोट्या सह्या / अगन्ठे  घेतात. व सरपंच / ग्रामसेवक मनानेच खोटे ठराव घेवून पंचायत समितीत पाठवून देतात. यामुळे प्रत्यक्षात गावात फार मोठा भ्रष्टाचार होवूनही लोकांना माहिती असू शकत नाही.

वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ६ पेक्षा जास्त घेतल्या तर हरकत नाही. पैकी ४ ग्रामसभांच्या तारखाही फिक्स आहेत.

२६ जानेवारी            - प्रजासत्ताक दिन 
१   मे                       - कामगार दिन 
१५ ऑगस्ट              - स्वातंत्र्य दिन 
२   ऑक्टोबर           - गांधी जयंती 

या दिवशी ग्रामसभा भरविणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची नोटीस हि सभेच्या तारखेपूर्वी १० दिवस आधी बजावावी लागते. नोटीस हि ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सर्वाना पाहता येईल, व सहजपणे वाचता येईल अशा ठिकाणी लावून प्रसिद्ध करावी लागते. तसेच सभेच्या ८ दिवस अगोदर व सभेच्या एक दिवस अगोदर अश दोन वेळा प्रत्येक वार्डात, वाडीत सविस्तर दवंडी हि द्यावी लागते.

सभेचा अध्यक्ष

 आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो.

ग्रामसभेत कसे बोलावे ?

ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मतदारांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेवून बोलावे तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे.

सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देवू शकतात. इतरांना उत्तरे देण्याचा अधिकार नाही.

सभेचे कामकाज

ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसभेचे इतिवृत्त सचिव तयार करून व्यवस्थित ठेवतो. मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सारख्या शासकीय/ निमशासकीय / ग्रामपंचायत कर्मचारी तयार करील.

अत्यंत महत्वाचे -

पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे आपणास वाटते, त्याचे निवेदन तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या ८ दिवस आधी ग्रामपंचायतीत जमा करून त्याची पोच घ्यावी.

ग्रामसभेत ठराव मांडावा, त्यावर बहुमत घेण्यास भाग पाडावे. ठराव पास . नापास झालेला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिला कि नाही. ठराव जसा झाला तसाच लिहिला कि बदल करून लिहिला हे शिकलेल्या मुलाकडून मोठ्याने वाचून घ्यावे. अन्यथा ठराव होवूनही प्रोसिडिंग बुकात न लिहिणे किंवा चुकीचा लिहिणे हे प्रकार सर्रास घडतात.

ग्रामसभेत आपण रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, रोजगार, घरकुले, असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करू शकतो व त्यावर चर्चा घडवून आणू शकतो व ठराव करण्यास भाग पडू शकतो.

आपण जर नियमितपणे ग्रामसभेत उपस्थित राहिलो व ग्रामसभेत सहभाग दिला व ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला तर आपणास गावातील कोणत्याही अडचणीसाठी तालुका, जिल्ह्याच्या गावी जाण्याची गरज नाही.

आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेणे बंधनकारक आहे. तसेच उर्वरित ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या (अल्फाबेटिकल्स प्रमाणे) अद्याक्षरांप्रमाणे इतर वाडे, वस्तीवर घ्याव्यात.

आपण जर निवेदन दिले कि, अमुक तारखेला अमुक वाजता, अमुक या ठिकाणी ग्रामसभा घ्यावी, तर त्या प्रमाणे ग्रामसभा घ्यावी लागते.

आपण जर ग्रामसभेला गेलो तर आपला रोज बुडेल असे वाटत असेल तर आदल्या ग्रामसभेला पुढील ग्रामसभेची वेळ ठरवून घ्यावी. किंवा निवेदन देवून सांगावे.

संध्याकाळी किंवा सकाळी लवकर देखील मतदारांच्या सोयीच्या वेळेत ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.

जर ग्रामसभेच्या दिवशी लग्न / मयत किंवा महत्वाचे कार्यक्रम असतील तर निवेदन देवून नागरिकांच्या सोयीच्या दिवशी ग्रामसभा भरविण्यास सुचवता येवू शकते.

प्रत्येक  ग्रामसभेपुर्वी एक दिवस अगोदर महिलांची ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. त्या सभेमध्ये पारित झालेले ठराव जसेच्या तसे ग्रामसभेने मान्य करावे लागतात.

जर आपल्या ठरावाची नोंद इतीव्रूत्तात नसेल तर आपन ग्रामसभेचे विडिओ रिकोर्डिंग मागवुन तपासु शकतो.

सशक्त नागरीक सशक्त गाव .

👆👆लोकशाही मध्ये
वाघासारखे जगा..

💥अतिशय महत्वाची माहिती आहे प्रत्येकाला कळालीच पाहिजे💥
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

संयम

प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका, कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या.. "आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही"... हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देवू नका... 
"काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर , घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते"... 

                 - तथागत गौतम बुद्ध

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

शब्दांची ताकद

 आंधळा भिकारी रस्त्यावर
एका बाजूला बसलेला.
त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही.
तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.

एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला.
खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.

त्याची नजर त्या भिका-याकडे
आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.

त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी
आणि दोन-तीन खडू पडलेले.

हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो, "मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील नाही, पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?"

"साहेब" भिकारी म्हणतो,
"माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा."

तो लेखक त्या पाटीवर
काहीतरी लिहून निघुन जातो.

त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या - येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापुढ्यात पैसे टाकू लागलाय.

थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते.

तो भिकारी बेचैन होतो.
नाण्यांची रास वाढतच जाते.

तो एवढा अस्वस्थ होतो की
पैसे टाकणा-यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, "साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो."

तो माणूस पाटी उचलतो
आणि वाचायला लागतो.




"वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी
आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."




भिका-याच्या गालावरुन
अश्रू ओघळायला लागतात.

आयुष्य कुणी जास्त जाणलं?

या ओळी लिहीणा-या लेखकानं?
त्या ओळी वाचून पैसे
टाकणा-या लोकांनी?
कि इतक्या वर्षांनी रडणा-या
त्या भिका-यानं?

तुमचे डोळे चांगले असतील
तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल...

पण जर तुमची वाणी गोड असेल
तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल...

माणसाला बोलायला शिकण्यास
(किमान) २ वर्ष लागतात...

पण "काय बोलावे?"
हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते...

ओढ म्हणजे काय?
हे जीव लावल्याशिवाय कळत नाही...

प्रेम म्हणजे काय?
हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही...

विरह म्हणजे काय?
हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही...

जिंकण म्हणजे काय?
हे हरल्याशिवाय कळत नाही...

दुःख म्हणजे काय?
हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही...

सुख म्हणजे काय?
हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही...

समाधान म्हणजे काय?
हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही...

मैत्री म्हणजे काय?
हे ती केल्याशिवाय कळत नाही...

आपली माणस कोण?
हे संकटांशिवाय कळत नाही...

सत्य म्हणजे काय?
हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही...

उत्तर म्हणजे काय?
हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही...

जबाबदारी म्हणजे काय?
हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही...

काळ म्हणजे काय?
हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही...




सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

समाज

ज्या दिवशी आपला समाज प्रतिक्रियाच्या ऐवजी क्रिया करेल तेव्हा समजून जायचे प्रगती करतोय.

रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

महात्मा बुद्धांचे विचार

*किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा❓*

याचे फार छान उत्तर भगवान गौतम बुध्दाने दिलेले आहे,

""नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडीलां ची काळजी घेता यावी.
इज्जतीने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. ""
          

आजचा शेती सल्ला: भाजीपाला काळजी*




_★ रब्बी हंगामात वाटाणा, कोबी, फुलकोबी, लसूण, टोमॅटो पिकांची लागवड करण्यासाठी जमिनीची तयारी करून लागवड करण्यास सुरवात करावी._
_★ ज्या भागात भाजीपाला पिकांची लागवड झालेली असेल तिथे सध्याच्या वातावरणामुळे बऱ्याचशा भाजीपाला पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे._
_★ कांदा पिकावर फुलकिडे व करपा यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील १५ मिली अधिक मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २५ ग्रॅम अधिक स्टिकर १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._
_★ टोमॅटो पिकावर लागवडीनंतर रस शोषणाऱ्या किडीसाठी इमिडाक्‍लोप्रीड ५ मिली किंवा थायामेथॉक्‍झाम ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारणी करावी._
_★ टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी प्रथम पाने खाते. नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरत आत शिरून गर खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) १० मिली किंवा क्विनॉलफॉस २० मिली किंवा डेल्टामेथ्रीन १टक्के + ट्रायझोफॉस  १० टक्के हे संयुक्त कीटकनाशक २० मिली अधिक मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बन्डाझीम १० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार अधूनमधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी._
_★ वांगी पिकावर शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करावे._
_★ कीडग्रस्त शेंडे दर आठवड्यातून खुडून टाकावे आणि नष्ट करावेत._
_★ तोडणीवेळी कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत._
_★ ल्युसील्युर कामगंध सापळे एकरी ४० या प्रमाणात वापरावेत. त्यातील ल्यूर दोन महिन्यांनी बदलावा._
_★ अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१० टक्के प्रवाही) १० मिली किंवा  डेल्टामेथ्रीन १ टक्के + ट्रायझोफॉस ३५ टक्के कीटकनाशक २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी._
_★ गरजेनुसार अधून-मधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी._
_★ वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर  वातावरणामुळे केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. त्यासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने फवारावे._

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

राजाचा कुत्रा



       एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता.कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.
       त्याचा सह-प्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच, पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल.
        राज्याच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.
       हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राज्याला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."
     राज्याने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.
      कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली.
       थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला.
       त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला   " पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."
   प्रवाशी हसून म्हणाला " महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज."
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
      ⚡बोध-जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही,तोपर्यंत इतरांच्या त्रासाची कल्पना येत नसते.
    त्यामुळे असे वागावे की,दुसऱ्याना त्रास होऊ नये

महात्मा बुद्ध के विचार



.... जो गुजर गया उसके बारे में मत सोचो और भविष्य के सपने मत देखो
केवल वर्तमान पे ध्यान केंद्रित करो ।
                   – गौतम बुद्ध

.... आप पूरे ब्रह्माण्ड में कहीं भी ऐसे व्यक्ति को खोज लें जो आपको आपसे ज्यादा प्यार करता हो, आप पाएंगे कि जितना प्यार आप खुद से कर सकते हैं उतना कोई आपसे नहीं कर सकता।
                   – गौतम बुद्ध

.... स्वास्थ्य सबसे बड़ा उपहार है, संतोष सबसे बड़ा धन और विश्वास सबसे अच्छा संबंध।
                  – गौतम बुद्ध

.... हमें हमारे अलावा कोई और नहीं बचा सकता, हमें अपने रास्ते पे खुद चलना है।
                    – गौतम बुद्ध

.... तीन चीज़ें ज्यादा देर तक नहीं छुपी रह सकतीं – सूर्य, चन्द्रमा और सत्य
                   – गौतम बुद्ध

.... आपका मन ही सब कुछ है, आप जैसा सोचेंगे वैसा बन जायेंगे ।
                   – गौतम बुद्ध

.... अपने शरीर को स्वस्थ रखना भी एक कर्तव्य है, अन्यथा आप अपनी मन और सोच को अच्छा और साफ़ नहीं रख पाएंगे ।
                   – गौतम बुद्ध

.... हम अपनी सोच से ही निर्मित होते हैं, जैसा सोचते हैं वैसे ही बन जाते हैं। जब मन शुद्ध होता है तो खुशियाँ परछाई की तरह आपके साथ चलती हैं ।
                    – गौतम बुद्ध

.... किसी परिवार को खुश, सुखी और स्वस्थ रखने के लिए सबसे जरुरी है - अनुशासन और मन पर नियंत्रण।
अगर कोई व्यक्ति अपने मन पर नियंत्रण कर ले तो उसे आत्मज्ञान का रास्ता मिल जाता है
                   – गौतम बुद्ध

.... क्रोध करना एक गर्म कोयले को दूसरे पे फैंकने के समान है जो पहले आपका ही हाथ जलाएगा।
                    – गौतम बुद्ध

.... जिस तरह एक मोमबत्ती की लौ से हजारों मोमबत्तियों को जलाया जा सकता है फिर भी उसकी रौशनी कम नहीं होती उसी तरह एक दूसरे से खुशियाँ बांटने से कभी खुशियाँ कम नहीं होतीं ।
                   – गौतम बुद्ध

.... इंसान के अंदर ही शांति का वास होता है, उसे बाहर ना तलाशें ।
                  – गौतम बुद्ध

.... आपको क्रोधित होने के लिए दंड नहीं दिया जायेगा, बल्कि आपका क्रोध खुद आपको दंड देगा ।
                  – गौतम बुद्ध

.... हजारों लड़ाइयाँ जितने से बेहतर है कि आप खुद को जीत लें, फिर वो जीत आपकी होगी जिसे कोई आपसे नहीं छीन सकता ना कोई स्वर्गदूत और ना कोई राक्षस ।
                  – गौतम बुद्ध

.... जिस तरह एक मोमबत्ती बिना आग के खुद नहीं जल सकती उसी तरह एक इंसान बिना आध्यात्मिक जीवन के जीवित नहीं रह सकता ।
                 – गौतम बुद्ध

.... निष्क्रिय होना मृत्यु का एक छोटा रास्ता है, मेहनती होना अच्छे जीवन का रास्ता है, मूर्ख लोग निष्क्रिय होते हैं और बुद्धिमान लोग मेहनती ।
                   – गौतम बुद्ध

.... हम जो बोलते हैं अपने शब्दों को देखभाल के चुनना चाहिए कि सुनने वाले पे उसका क्या प्रभाव पड़ेगा,
अच्छा या बुरा ।
                  – गौतम बुद्ध

.... आपको जो कुछ मिला है उस पर घमंड ना करो और ना ही दूसरों से ईर्ष्या करो, घमंड और ईर्ष्या करनेवाले लोगों को कभी मन की शांति नहीं मिलती ।
                   – गौतम बुद्ध

.... अपनी स्वयं की क्षमता से काम करो, दूसरों निर्भर मत रहो ।
                – गौतम बुद्ध

..... असल जीवन की सबसे बड़ी विफलता है हमारा असत्यवादी होना ।
                –  गौतम बुद्ध