एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

नमस्कार

*नमस्कारचे* सुद्धा आता
*तुकडे पडलेत...*

जय जिजाऊ,
जय भीम,
जय भगवान,
जय मल्हार,
जय रोहिदास,
जय राणा.
सकाळ सुद्धा आता
जात घेऊनच उगवते...
शिवसकाळ,
भिमसकाळ,
लहूसकाळ.

*समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन,*
*हातात लेखणीची मशाल घेऊन, क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा  आता जात सांगून टाकतात...*

शिवकवी,
भीमकवी,
मल्हारकवी.

*वादळं* सुद्धा आता
*जात* घेऊन येतात

भगवं वादळं,
निळं वादळं,
हिरवं वादळं,
पिवळं वादळं.

*रंगात* विभागलेत आता
पाऊस,वारा,वादळं,
शहरातली दुकाने
अन्...
गावच्या वेशीसुद्धा

पण ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*रक्ताचा रंग मात्र*
*अजूनही लालच...*💥💥🙏🏼
*कडू आहे पण सत्य आहे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा