एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

एकीचे बळ

काल एका फळ विक्रेत्याकडे थांबलो होतो. मी विचारले, "आज काय भाव आहे द्राक्षांचा..?" तो म्हणाला, "साठ रूपये किलो." जवळच सुट्टी द्राक्षे ठेवलेली होती. मी त्याला विचारले, "ह्यांचा काय भाव आहे..?" तो म्हणाला, "पंचवीस रूपये किलो." मी त्याला विचारले, "इतका कमी का..?" तो म्हणाला, "साहेब, ही खुप चांगली द्राक्षं आहेत. पण आपल्या घडातुन तुटलेली आहेत."  मी समजून गेलो.. आपल्या जवळच्यांपासून वेगळे झाल्यावर आपली 'किंमत' अर्ध्याहून कमी होऊन जाते..

म्हणून एकसंघ रहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा